या महात्म्याने जपानमध्ये बौद्ध पंथाची स्थापना केली आणि व्यवस्थेला खडबडून जागे केले
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तेराव्या शतकात जपानमध्ये निचरेन या महात्म्याने बौध्द धर्माची स्थापना केली. आपल्या कृती व उपदेशाच्या माध्यमातून ते भ्रष्ट व दडपशाहीच्या संरचनेचे विरोधक बनले होते.
अत्यंत छळ सहन करत त्यांनी जपानमधील सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे तेथील व्यवस्था खडबडून जागी झाली.
निचरेन या महात्म्याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊ.
निचरेन डेशोनिन हे बौध्द धर्माचे रूप धारण करणारे एक पुजारी होते ज्यांना जपानी सामाजिक व धार्मिक इतिहासात महत्वाचे तत्त्वज्ञ मानले गेले आहे.
निचरेन यांचा जन्म जपानमधील एका मासेमारी करणाऱ्या कुटूंबात झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी सिचो-जी नावाच्या स्थानिक मंदिरामध्ये शालेय शिक्षण घेतले आणि वयाच्या सोळाव्या वर्षी बौध्द धर्माचे पुजारी म्हणून धार्मिक कार्याला सुरुवात केली.
बौध्द धर्माच्या माध्यमातून सामान्य लोकांचे दुःख दूर करण्याचे काम निचरेन यांनी केले. त्यांनी एका पत्रात केलेल्या उल्लेखानुसार,
‘जेव्हापासून निचरेन हे लहान मुल होते तेव्हापासूनच त्यांनी जपानमधील सर्वात बुध्दीमान व्यक्ती होण्यासाठी प्रार्थना केली होती.’
मुळात निचरेन यांना धार्मिक मार्गाकडे नेण्यास तेथे असलेली तेव्हाची परिस्थिती कारणीभूत ठरली. कारण त्यावेळी शासनाच्या भ्रष्ट व दडपशाही धोरणांमुळे सामान्य जनता त्रासलेली होती. परिणामी, निचरेन हे या धोरणाच्या विरोधात होते.
पण जनतेला जर या समस्यांमधून मुक्त करायचे असेल तर आधी त्यांना योग्य शिक्षण द्यावे लागेल, असा विचार त्यांनी केला.
बौध्द धर्मातील विविध शाळांचा त्यांनी अभ्यास केला तसेच प्रमुख बौध्द केंद्रांना भेटी दिल्या. वयाच्या ३२ व्या वर्षी ते सेचो-जी येथे परतले. त्याठिकाणी त्यांनी २८ एप्रिल १२५३ ला एक प्रसिध्द व्याख्यान दिले.
ते म्हणाले की, शक्तीमुनींचे ज्ञान हे कमळ या सूत्रामध्ये सापडले आहे. ज्यामध्ये गौतम बुध्दांनी सांगितलेला कायदा व वचनांचा अंतर्भाव आहे.
निचरेन यांनी हा कायदा ‘नाम-मायोहो-रेन्गे-केयो’ म्हणून घोषित केला आणि प्रमुख बौध्द शाळांना त्याबाबतचे ज्ञानार्जन करण्यासाठी तो एकमात्र शैक्षणिक मार्ग आहे, असे जाहीर केले.
त्यामुळे बौध्द शाळांमध्ये दिले जाणारे पारंपारिक शिक्षण न देता निचरेन यांनी सांगितलेला मार्ग अवलंबण्याचे प्रयत्न सुरू झाले पण शाळांच्या प्रशासनांनी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे शाळा व निचरेन यांच्या अनुयायांमध्ये संघर्ष निर्माण झाला.
तेथून पुढे निचरेन यांच्यासह त्यांचे शिष्य व अनुयायी यांना सतत छळ सहन करावा लागला.
१२६० मध्ये निचरेन यांनी ‘देशातील शांततेसाठी योग्य शिक्षण स्थापित करणे’ या विषयावर प्रसिध्द ग्रंथ लिहिले. त्यामध्ये त्यांनी केवळ विचारांचा आत्मविश्वास वाढवून विचार केला व कमळ या सुत्रावर विश्वास ठेवून मानवी जीवनाचे पावित्र्य आणि परिपूर्णता प्रस्थापित केली जाऊ शकते ज्यामुळे शांतता व सुव्यवस्था निर्माण होईल, असे विचार मांडले.
शिवाय धर्मातील चुकीच्या बाबींचा आपण कसा धिक्कार केला याचा संदर्भही त्यांनी दिला. त्यांनी हा ग्रंथ जपानच्या उच्चतम अधिकाऱ्यांना सादर केला व बौध्द धर्मासह इतर शाळांच्या प्रतिनिधींसह सार्वजनिक वादविवाद आयोजित करण्याची विनंती केली.
पण बौध्द व इतर शाळांच्या टीकांमुळे तसेच सरकारी अधिकाऱ्यांमुळे त्यांना अनेक छळांचा सामना तत्सुन्नोक्ची याठिकाणी करावा लागला. त्यात सशस्त्र हल्ले, निर्वासनाचा समावेश होता.
त्यानंतर निचरेनला सडो बेटावर निर्वासित करण्यात आले त्याठिकाणी त्यांनी आपली शिकवणी, लेखन व अनुयायांना प्रोत्साहनपर पत्रे लिहिली.
तत्सुन्नोक्ची येथे झालेल्या छळानंतर निरचेन यांनी एक महत्त्वाचे सत्य समोर आणले. ते म्हणजे निरचेन जरी सामान्य राहायचे तरी त्यांची खरी व मुळ ओळख बुध्दांचीच होती.
ती ‘नाम-मायोहो-रेन्गे-केयो’च्या शिकवणीचा प्रसार करण्याच्या मोहिमेसह लोकांनी स्वतःला दुःखापेक्षा मुक्त करण्याचे साधन प्रदान करीत आहे.
१२७४ मध्ये निचरेन यांना हद्दपार करण्यात आले आणि जपानच्या राजकीय केंद्रातील कामाकुरा येथे ते आले. त्यांनी पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांना चुकीच्या शिक्षणावर अवलंबून न राहण्यास सांगितले पण पुन्हा त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
त्यामुळे त्यांनी कामाकुरा सोडण्याचे ठरवले व शिष्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला.
आयुष्याच्या अभिव्यक्तीच्या आश्चर्यकारक विविधतेच्या अंतर्गत दहा सामान्य घटक आहेत. बौध्द धर्माने त्यांना जीवनाचे दहा घटक असे संबोधले आहे. त्याकाळी निरचेन यांच्या अनुयायांनी केलेल्या प्रयत्नामुळे अनेक लोकांनी निरचेनच्या शिकवणींचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संबंधित नागरिकांचाही छळ झाला.
१३ आॅक्टोबर १२८२ ला वयाच्या ६१ व्या वर्षी नैसर्गिक कारणामुळे त्यांचे निधन झाले. एकूणच आपल्या जीवन काळात निरचेन यांनी जपानमध्ये बौध्द धर्म स्थापित करून व्यवस्थेला खडबडून जागे केले.
निरचेन यांनी आपल्या नाम-मायहो मंत्र अध्यापनाच्या माध्यमातून सर्व लोकांचे मुक्ती मिळवण्याचे मार्ग व रेन्गे-केयोच्या माध्यमातून मानवी पप्रतिष्ठेचे व त्याचे सशक्तीकरण यांचे तत्वज्ञान मांडले आहे.
त्यातूनच एसजीआय (सोको गक्काय इंटरनॅशनल) यांसारख्या संघटनांना पुढे प्रेरणा मिळाली.
निचरेन बौध्द हे महायान परंपरेतील जपानी बौध्द आंदोलन आहे. हे आंदोलन पश्चिमेकडील देशांमध्ये तसेच युकेमध्ये लोकप्रिय झाले असून आंदोलनातील सदस्यता दिवसेंदिवस वाढत आहे.
या आंदोलनाकडे जरी अति-केंद्रीत धर्म म्हणून पाहिले जात असले निचरेन बौध्द धर्माचे अनुयायी मानतात की स्वतंत्र सशक्तीकरण आणि आंतरिक परिवर्तन हे एक चांगले आणि अधिक शांतीपूर्ण योगदान देणारे तत्त्वज्ञान निरचेन बौध्द धर्मात आहे.
गायिका टीना टर्नर या निरचेन यांच्या सर्वात प्रतिष्ठित अनुयायांपैकी एक आहे. १९९३ मध्ये आलेला चित्रपट ‘व्हाॅट्स लव्ह गाॅट टु डू विथ इट’ मध्ये टर्नरचा वाढदिवस आणि तिच्या पतीशी आलेले अपमानास्पद संबंध या विषयावरील आत्मचरित्रात्मक चित्रपटात त्यांनी बौध्द नावाचे मायहो रेन्गे क्यो मंत्र म्हटले होते.
निचरेन बौध्द धर्मातील एक प्रमुख तत्व आहे जे ज्ञान प्रत्येकासाठी उपलब्ध आहे असे शिकवते.
तसेच निचरेन बौध्द हे नरक, भुकेलेपणा, पशुत्व, क्रोध, शांतता, आनंदोत्सव, शिकणे, अवशोषण, बोधिसत्व, बौध्दहुड या दहा मुलभूत तत्वांवर विश्वास ठेवतात.
—
- “ट्रेनच्या” डब्यांवर पिवळ्या – पांढऱ्या रंगांचे पट्टे असण्यामागचं कारण जाणून घ्या…
- धावती ट्रेन “रूळाचे ट्रॅक” इतक्या सहजतेने कशी बदलते? एक जबरदस्त यंत्रणा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.