Site icon InMarathi

‘ना जात ना धर्म’ प्रमाणपत्र घेण्यासाठी ९ वर्षे संघर्ष करणाऱ्या महिलेबद्दल नक्की वाचा!

M A snegha InMarathi (1)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या देशामध्ये जातीपातीच्या नावाने उठवलेल्या थोतांडाने आपल्या देशाचे फार मोठे नुकसान केलेले आहे. “जात नाही ती जात” अशा पद्धतीने एका कालबाह्य प्रथेच समर्थन करणारी मंडळी आपल्या देशामध्ये पावलो पावली आपल्याला दिसतील.

देशामध्ये अनेक ठिकाणी जातीय तेढा मधून अनेक दंगली उसळतात, मग अशा दंगलींना रोखण्यासाठी जात घरामध्येच ठेवून घराच्या बाहेर भारतीय म्हणून एकत्र येण्याची गरज आज वाटत आहे.

अशा या पार्श्वभूमीवर एका निर्भिड महिलेने हे पाऊल उचलले आहे. त्या महिलेबद्दल आता आपण लेखात जाणून घेऊयात.

कुठल्याही प्रकारच्या जातीशी किंवा धर्माशी निगडीत नाही अशा प्रकारचा दाखला मिळवण्यासाठी आपल्या देशामध्ये नऊ महिने वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करायला लागतो, हेच आपल्या देशाचे दुर्दैव मानले पाहिजे.

 

newslaundry.com

या दाखल्यासाठी या महिलेने एक फार मोठा संघर्ष केलेला आहे. तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील तिरुपत्तुर या गावातील एम ए स्नेहा ज्या वकील आहेत यांनी अशा प्रकारचं एक सर्टिफिकेट मिळवलेलं आहे.

एका ३५ वर्षीय वकीलाला अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काय संघर्ष करायला लागला बघुयात..

त्यांनी अशा प्रकारचा एक दाखला मिळवल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून कौतुक होत होतं आणि तेव्हा त्यांना दक्षिणात्य सुपर स्टार कमल हसन यांनी फोन करून सांगितलं की,

“तुम्ही देशासाठी एक फार मोठं काम केलेला आहे. आपण सगळे मिळून अशा प्रकारच्या कुप्रथांना बंद करायला हवं. ज्या गोष्टीशी आपला संबंध नव्हता अशा गोष्टी दूर ठेवण्यातच भलाई आहे. आपण एकत्रपणे जातीनिर्मुलनासाठी काम करण्याची गरज आहे आणि तुमच्या या पावलामुळे देशाला एक उज्ज्वल भविष्य देऊ शकू.”

ज्यावेळी या सर्वांबाबत एम ए स्नेहा यांच्याशी संपर्क साधला त्या वेळेस त्या म्हणाल्या, “माझ्या पालकांनी माझ्या शाळेतील कागदपत्रांवर कधीच माझ्या जातीचा किंवा माझ्या धर्माचा उल्लेख केलेला नाही.

त्यांनी माझी ओळख नेहमीच एक भारतीय अशी सांगितलेली आहे. अशा प्रकारच्या संस्कारांमध्ये मी वाढलेली आहे.

 

indian.com

माझी बहीण जेनिफर, मुमताज आणि मी त्यांची नावही वेगवेगळ्या जाती धर्माशी निगडित आहेत. मी कुठल्याही जातीशी किंवा धर्माशी निगडीत नाही. मी श्री प्रतिभा राज यांच्याशी विवाह केलेला आहे जे क्रांतिकारी विचारांचे आहेत.

आम्ही कुठल्याही धार्मिक पद्धतीचा वापर न करता लग्न केलेलं आहे. आम्ही पारंपरिक पद्धतींचा त्याग केलेला आहे. या दांपत्याने त्यांच्या तिन्ही मुलींचे नाव असेच वेगळ्या धर्माची ठेवलेली आहेत.”

त्यांच्या वडिलांनी घालून दिलेल्या पाऊलवाटेवर त्यांनी पाऊल टाकल. आणि त्यांच्या मुलींच्याही धर्माच्या चौकटी त्यांनी रिकाम्याच सोडल्या अगदी त्यांच्या शाळेतील प्रवेश दाखला यामध्येही.

“ही माझी जगण्याची पद्धती आहे आणि सुरुवातीपासून मी असच जग आलेले आहेत. मग मला कुठल्या जाती धर्माशी निगडित नसल्याचे सर्टिफिकेट का मिळू नये.” असे त्या पुढे म्हणाल्या.

जात प्रमाणपत्रामुळे असे लक्षात येते की सदरील इसम हा कुठल्यातरी विशिष्ट दलित किंवा भटक्या जमातीशी निगडीत आहे. आणि अशा प्रकारचे प्रमाणपत्र राज्य शासनामार्फत दिले जाते.

 

thesentinel.com

स्नेहा पुढे म्हणाल्या की,

“मला अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नऊ वर्षे संघर्ष करायला लागला. तहसीलदारांना पत्रव्यवहार करत असे त्यांना अनेक वेळेस विनंती केली की मला अशा प्रकारचे एक प्रमाणपत्र देण्यात यावे, पण सुरुवातीला त्यांनी माझी विनंती फेटाळून लावली.

मी कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या एका नियमावलीअंतर्गत त्यांच्याकडे परत एक अर्ज केला आणि आता त्यांना उत्तर द्यायलाच लागणार होते कारण मी खूप मोठ्या संख्येत हे अर्ज दाखल केले होते.

सुरवातीला त्यांनी मला असे सांगितले की अशा प्रमानणपत्रासाठी कुठलाही नियम नाही, आणि तसंही तुम्हाला या सर्टिफिकेटचा काय फायदा आहे?”

तेथील अधिकारी स्नेहा यांना असे सांगत होते की ते त्यांना कुठल्यातरी जात किंवा धर्माशी निगडित असल्याचे प्रमाणपत्र देऊ शकतात पण असे कुठलेही प्रमाणपत्र ते देऊ शकत नाहीत ज्यामुळे हे सिद्ध होतं की स्नेहा कुठल्याही जाती धर्माशी निगडीत नव्हत्या.

त्यांनी स्नेहा यांना अनेक कारणं दिली पण स्नेहा यांचा निर्धार पाहून त्यांना नमतं घ्यायला लागलं.

 

News18.com

शेवटी स्नेहा यांनी अधिकाऱ्यांनी हे पटवून दिलं की या प्रमाणपत्राच्या आधारे त्या कुठलाही फायदा उचलणार नाही आहेत किंवा शासनाकडून कुठलेही अधिक अधिकार मिळवणार नाहीत.

“या प्रमाणपत्राद्वारे मी कुणाच्याही अधिकारांवर गंडांतर आणणार नव्हते हे प्रमाणपत्र माझी ओळख आहे.” असेही स्नेहा पुढे म्हणाल्या.

त्यांच्या उत्तराने त्यांनी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना अशा प्रकारचा प्रमाणपत्र साठी तयार केले त्यांना अशा प्रकारचं प्रमाणपत्र पाहीजे होतं ज्याने हे सिद्ध होईल की त्या कुठलाही जाते किंवा धर्माशी निगडित नाहीत.

“आम्हाला हे जाणून घेणे गरजेचं होतं की त्या जे म्हणत आहेत ते खरं आहे का? आम्ही त्यांच्या शाळेतील आणि महाविद्यालयातील सर्व प्रमाणपत्रे तपासली असता ते दोन रकाने रिकामे असल्याचे लक्षात आले.हे सर्व खरं असल्यामुळे आम्ही त्यांना अशा प्रकारचे प्रमाणपत्र द्यायला तयार झालो पण त्यांना अशी अटही घातली की या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही कोणाच्याही संधी हिरावून घेऊ शकणार नाहीत.”

द हिंदू या वर्तमानपत्राशी संवाद साधताना तिरुपत्तुर च्या उपजिल्हाधिकारी बी प्रियांका पंकाजाम असं म्हणाल्या.

स्नेहा यांच्यासाठी कुठल्याही जाती धर्माशी निगडित नसणे हा एक आदर्श संस्कार होता. जो त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील मार्क्स यांच्या विचारांना मानणारे होते तर आई सर्वसामान्य कुटुंबातून आलेली होती.

 

chennaimemes-inmarathi

जेव्हा स्नेहा यांची आई शाळेत होत्या तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, पेरियार अशा काही प्रगतिशील लेखकांचे विचार वाचण्यास सुरुवात केली होती.

स्नेहा यांचे पालक चेन्नईच्या लाँ कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होते. ते एकत्र शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांनी विवाह केला. त्यांनी त्यांचं आयुष्यात जातीनिर्मुलनासाठी काम करण्याचं ठरवलं होत.

त्यांना काही कम्युनिस्ट विचारधारेच्या मित्रांचाही यासाठी पाठिंबा होता. हेच कारण होतं ज्यामुळे त्यांनी त्यांच्या तिन्ही मुलींचे नाव वेगवेगळ्या धर्माशी निगडित ठेवले होते.

स्नेहा यांच्या मते या प्रमाणपत्रासाठी झालेल्या संघर्षाचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे त्यांचे पती होते. या सर्व संघर्षामध्ये त्यांनी त्यांना खंबीर साथ दिली होती. स्नेहा यांना त्यांचे पती नेहमीच प्रोत्साहित करत असत.

मग आपल्याला प्रश्न पडतो अशा प्रकारचं प्रमाणपत्र भारतातील इतर कुठल्याही सामान्य नागरिक मिळवू शकते का? याबद्दल स्नेहा यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की,

“माझा भूतकाळ कुठल्याही जाती किंवा धर्माशी निगडित कधीच नव्हता. ज्यांनी माझ्याप्रमाणेच जात आणि धर्म या गोष्टींना तिलांजली वाहिली असेल त्यांना अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळायला कुठलीही अडचण येणार नाही. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार सारख्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यांना या गोष्टीसाठी नेहमीच न्यायव्यवस्थेकडे दाद मागावी लागेल.”

अनेक जणांनी स्नेहा यांच्याकडे याबाबत चौकशी केली आहे की त्यांनाही कुठल्याही जाती धर्माशी निगडीत नसल्याचे प्रमाणपत्र कसे मिळवता येईल. त्यांनी याबाबत काही वकिलांशी चर्चा करून याबाबत तोडगा काढण्याचे ठरवले आहे.

 

telegraph.co.uk

“मी माझ्या संघर्षातून अशा प्रकारच प्रमाणपत्र मिळविण्यात यश प्राप्त केलेले आहे आणि या सर्व मार्गामध्ये उपजिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांचे मार्गदर्शन मला मोलाचे राहिलेले आहे.

पण असं प्रत्येक वेळी होणे शक्य नाही की अधिकारी तुम्हाला मदत करतीलच किंवा प्रत्येकच तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी तुम्हाला या गोष्टीसाठी प्रोत्साहन देतील हे आवश्यक नाही.

जरी जाती आणि धर्मासारखे काही घटक तुम्हाला एक सामाजिक ओळख देत असतील तरी या घटकांचा मुख्यत्वे वापर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी केला जातो.” असं त्यांचं मत आहे.

स्नेहा यांनी कदाचित फार मोठा विजय प्राप्त केलेला असेल तरीही संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी एक फार मोठा संघर्ष करण्याची गरज आज भासत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version