Site icon InMarathi

अचाट कल्पनाशक्तीचा वापर करून कायद्यावर ‘शिवराय’ साकारणारा चित्रकार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : दुष्यंत पाटील

===

राजा रविवर्मा हे भारतातल्या महान चित्रकारांपैकी एक. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची विलक्षण ओढ होती.

लहानपणी राजाच्या दरबारामध्ये एका पाश्चात्त्य चित्रकाराला पाश्चात्त्य चित्रकाराला चित्र रंगवताना पाहताना त्याच्या वास्तववादी शैलीचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव पडला. ही शैली नंतर त्यांनी आत्मसात केली.

समकालील लोकांच्या वास्तववादी व्यक्तिचित्रांमुळं ते प्रसिद्ध झाले. त्यांनी पुराणाकथांमधल्या प्रसंगांची कल्पनाशक्तीचा वापर करत खूप सारी चित्रं काढली.

raja-varma.com

त्यांनी भारतीय चित्रकलेला एका वेगळ्या उंचीवर नेलं. त्यांच्या या साऱ्या किर्तीमुळं त्या काळातले राजघराण्यातले बरेचसे लोक स्वतःची व्यक्तिचित्रं काढण्यासाठी त्यांना बोलवायचे.

कलेच्या क्षेत्रातलं त्यांचं एक महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी सामान्य लोकांपर्यंत चित्रकला पोहोचवली.

१८९४ मध्ये त्यांनी मुंबईमधल्या घाटकोपर इथं छापखाना सुरू केला. काही वर्षांनी हा छापखाना लोणावळ्याजवळ हलवण्यात आला.

यामध्ये राजा रविवर्मा यांच्या चित्रांच्या हजारो प्रती छापल्या जायच्या. यात प्रामुख्यानं रामायण, महाभारत आणि इतर पुराणकथा यातले प्रसंग रंगवलेली असायची.

त्यांचा छापखाना त्या काळातला सर्वोत्कृष्ट छापखाना मानला जायचा.

सोबत दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र हे त्यांच्या एका तैलचित्रावरून याच छापखान्यात छापलं गेलेलं एक चित्र. मुळ तैलरंगातलं चित्र त्यांनी १८९० मध्ये काढलं होतं.

राजा रविवर्मा यांनी महाराजांविषयी ऐकलं होतं. कल्पनाशक्तीचा वापर करून त्यांनी ही चित्रकृती बनवली.

India.com

शिवाजीमहाराज आपल्या निवडक सैनिकांसोबत घोड्यावरून जातानाचा हा प्रसंग या चित्रात सुंदररित्या रंगवलाय. पार्श्वभूमीला एक किल्ला दिसतोय.

ह्या चित्राचा पूर्वी लहान मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकासाठी मुखपृष्ठाचं चित्र म्हणून वापर झाला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version