Site icon InMarathi

कोणत्याही आधाराशिवाय उभ्या असलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रूसचं रहस्य ठाऊक आहे का?

worlds-tallest-cross InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रूस म्हणजे काय हे तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये या क्रूसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या प्रतिकृती ख्रिस्ती धर्मियांच्या घरामध्ये आणि चर्चमध्ये हमखास पाहायला मिळतात. परंतु हे झाले लहान क्रूस !

जगामध्ये असे अनेक भलेमोठे क्रूस आहेत जे खालून वर पर्यंत संपूर्ण न्याहाळण्यासाठी मान आणि डोकं पाठीला टेकवावचं लागतं, तेव्हा कुठे आपली नजर क्रुसच्या सर्वोच्च टोकावर जाऊन स्थिरावते.

आता आम्ही तुम्हाला जगभरातील या उंच क्रूसपैकी सर्वात उंच क्रुसाबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या बद्दल माहिती देखील असेल. ज्या ज्या चित्रपटांमध्ये स्पेन दाखवले जाते ते चित्रपट हा क्रूस दाखवल्याशिवाय राहत नाहीत.

 या क्रूसचे आकर्षण म्हणजे या क्रूस कोणत्याही आधाराशिवाय आकशाला गवसणी घालत उभा आहे.

 

स्रोत

या क्रुसची उंची आहे तब्बल ५०० फुट इतकी !

स्पेनची राजधानी माद्रिद जवळील व्हॅली ऑफ फालन येथे स्पेनमधील यादवीमध्ये बळी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ क्रूसची ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

स्रोत

हा क्रूस पूर्णत: दगडाने बनवण्यात आला आहे. हा क्रूस तीस किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट नजरेस पडतो. स्पेनचे स्थापत्यतज्ज्ञ जुआन डी अॅव्हलास यांनी या क्रूसची रचना केली आहे.

स्रोत

या क्रुसची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे हा क्रूस जगातील सर्वात लांब चर्चावर उभा आहे. हे चर्च ८५३ फुट लांब आहे. राजा फ्रान्सिस्को फ्रान्सोच्या आदेशानुसार १९४० ते १९५८ या काळामध्ये हे चर्च उभारण्यात आले होते.

स्रोत

त्याकाळी हे चर्च उभारण्याकरिता २२ कोटी ९० लाख डॉलर इतका खर्च आला होता. चर्चबद्दल अजून एक खास गोष्ट म्हणजे हे चर्च भूमिगत आहे आणि त्यावर उभा आहे कोणत्याही आधाराशिवाय बांधलेला सर्वात उंच क्रूस !

स्रोत

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version