' दहशतवाद संपवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारण्याची गरज – InMarathi

दहशतवाद संपवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारण्याची गरज

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखक : जयेश मेस्त्री 

===

काश्मीरमधल्या पुलवामामध्ये दिनांक १४ फेब्रुवारीला आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान हुतात्मा झाले. काश्मीरमध्ये हा इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातोय. काकापोरामधला दहशतवादी अदिल अहमद स्फोटकांनी भरलेली गाडी घेऊन आला. बसमध्ये सीआरपीएफच्या ७६ बटालियनचे जवान होते. अदिलने गाडी बसला धडकवली.

जैश-ए-मोहम्मदने नावाच्या इस्लामी अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आता आपले सैन्य याचा प्रतिशोध नक्की घेतील. भारतीयांना आपल्या सैन्य दलावर विश्वास आहेच.

पुन्हा एकदा सर्जीकल स्ट्राईक होणार आहे हे नक्कीच. अनेकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. विरोधक राजकारण करण्यात मसगुल आहेत. पण कुणीही अदिलने हे का केले याचा विचार करत नाही.

या हल्ल्यानंतर लगेचच जैशकडून आदिल अहमद दारचा व्हिडिओ रीलीज केला गेला. हा व्हिडिओ दारने केलेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या काही वेळ आधीचा आहे.

यात तो काश्मीरी मुस्लिमांवरील अत्याचाराबाबत बोलत आहे. जैशच्या बॅनरसमोर उभा राहून हातात रायफल घेतलेल्या पोझमध्ये आदिलने हा व्हिडिओ शूट केला आहे.

 

adil-ahemad-inmarathi
Scroll.in

“आपण गेल्यावर्षी जैश-ए-मोहम्मद संघटनेत दाखल झालो आणि वर्षभरानंतर आपल्याला या हल्ल्याची मोहीम देण्यात आली. जेव्हा हा व्हिडिओ रिलीज होईल तेव्हा मी जन्नत (स्वर्गात) असेन” असं तो या व्हिडिओत म्हणाला आहे.

या व्हिडिओ संदर्भातली अशी बातमी काही वृत्तपत्रांमध्ये वाचण्यात आली.

ही बातमी वाचल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की अदिल जन्नतमध्ये असणार आहे म्हणजे नेमके कुठे असणार आहे? त्याला काश्मिरी मुस्लिमांवरील अत्याचार म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे.

उलटपक्षी काश्मिरमधून काश्मिरी पंडतांना नेसत्या कपड्यानिशी हाकलले होते. पण एकही काश्मिरी पंडीत आतंकवादाकडे वळला नाही. पण पण मग हा अदिलला कोणत्या अत्याचाराबद्दल बोलायचे आहे? त्याला स्वतंत्र काश्मिर हवे आहे का? की काश्मिरमध्ये सैन्य सुरक्षा त्याला नकोय? नेमके काय हवे आहे?

आणि तो मेल्यानंतर जन्नतमध्ये जाणार हे त्याला कोणत्या मुर्खाने सांगितले? मुळात अदिलचा हा व्हिडिओ म्हणजेच सबंध मुस्लिम जगताला किंवा इतरांना मुस्लिमांबद्दल पडलेला प्रश्न आहे.

२०१२ साली रझा अकादमीच्या गुंडांनी मुंबईत “आम्ही असंस्कृत राक्षसी प्रवृत्तीचे आहोत आणि आम्ही हैदोस घालणारच” याची शास्वती दिली होती. त्यांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या, दंगल घडवली, महिला पोलिसांची विटंबना केली.

 

azad maidan riots marathipizza

हे सर्व त्यांनी इस्लामच्या नावावर केलेलं आहे. हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीचा खात्मा केल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ इस्लामचे दावेदार पुढे आले आणि त्यांनी काश्मीरमध्ये हैदोस घातला.

इसिससारख्या संघटना जगभरात राक्षसी प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अशा बर्‍याच घटना आहेत.

या नुसत्या घडलेल्या घटना जरी लिहून काढल्या तरी खंड प्रकाशित होतील. एवढा हिंसाचार जगात झालेला आहे. पण या घटनांचा उल्लेख तुम्ही करु शकत नाही, कारण यामुळे चांगले मुस्लिम दुखावले जातात, असं म्हटलं जातंय.

हे चांगले मुस्लिम अतिरेक्यांना किंवा अशाप्रकारे हैदोस घालणार्‍यांना खरे मुस्लिम मानत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं की अतिरेक्यांना खरा इस्लाम कळलेला नाही. खरा इस्लाम वेगळा आहे, तो शांतीप्रिय आहे.

जिहाद म्हणजे काफिरांना मारणे नव्हे तर जिहाद म्हणजे तुमच्या आतमध्ये जी वाईट प्रवृत्ती आहे, त्या वाईट प्रवृत्तीशी संघर्ष करणे म्हणजे जिहाद, वगैरे वगैरे. असा अहिंसात्मक प्रकारचा पंथ म्हणजे इस्लाम, असा बचाव खरे किंवा चांगले मुसलमान करत असतात.

पण हे चांगले मुस्लिम या अतिरेक्यांच्या विरोधात फतवा काढताना दिसत नाहीत किंवा त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कृती करत नाही.

 

terrorism-inmarathi
img.theweek.in

मागे एकदा जगभरातील मुस्लिमांचे पवित्र स्थान म्हणजे मदिना येथे पैगंबर मशिदीबाहेर दहशतवाद्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट केले. रमजान महिन्यातील इफ्तारचा रोजा सोडण्यासाठी मुसलमानांनी गर्दी केलेली होती व तेव्हा ते सर्व खरे मुसलमान खोट्या मुसलमानांच्या अतिरेकी कृत्याचे शिकार झाले.

बांगलादेशची राजधानी ढाका येथे दहशतवाद्यांनी एका रेस्टॉरंटवर हल्ला केला. इराकची राजधानी बगदाद येथे रमजानमध्येच इसिसने बॉम्बस्फोट घडवून आणला.

सीमाभागातील मुस्लिम तरुणांचा प्रताप आपण बातम्यांमध्ये पाहत असतो, वर्तमानपत्रांत वाचत असतो. आता ईदच्या मुहूर्तावर श्रीनगरमधल्या ईदगाह, पुलवामा आणि अनंतनागमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यात आले. काश्मीरच्या तरुणांनी पाकीस्तानचे झेंडे हातात घेत सैन्यावर दगडफेक केले.

महत्वाची बाब म्हणजे ईदचा नमाज संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात फुटीरतावादी रस्त्यावर उतरले होते. नौहट्टा परिसरातील मशिदी बाहेर मोहम्मद अयूब पंडित या पोलिस अधिकार्‍याला क्रूरपणे ठेचून मारलं होतं.

हे खोटं इस्लामी संकट मुसलमानांनाच भोगावं लागत आहे. म्हणून अतिरेकी हे खोटे आहेत, त्यांना इस्लाम कळलेला नाही, असं म्हणून मुसलमान समाजाला आपली जबाबदारी झटकून टाकता येणार नाही.

या खोट्या अतिरेकी मुसलमानांवर तोडगा कसा काढावा या विषयी आता खर्‍या मुसलमानांनी चिंतन करायला हवे. मुस्लिम समाजातील स्त्रीयांसमोरही अनेक प्रश्न आहेत. तीन तलाकसारखे भयानक कायदे आज स्त्रीयांना सतावत आहेत.

 

talaq-marathipizza01
dnaindia.com

तीन तलाकबद्दल सांगताना अनेक मुस्लिम विद्वान कुराणात काय लिहिलं आहे, याचा दाखला देतात. कुराणानुसार कशाप्रकारे तीन तलाकची अंलबजावणी करावी, याचे स्पष्टीकरण देतात. पण एकही मुस्लिम विद्वान असं म्हणत नाही की ही प्रथा त्या काळी जरी श्रेष्ठ असली आता मात्र ती बदलायला हवी.

असा विचार एकाच्याही मनात येत नाही. विद्यमान सरकार हा कायदा आणू पाहत आहेत. कारण या सरकारला मुसलमान मूळ प्रवाहात येणे अपेक्षित आहे.

परंतु कॉंग्रेसची एक नेता राहूल गांधीसमोर म्हणते की कॉंग्रेस सत्तेत आली तर तीन तलाक कायदा होऊ देणार नाही आणि राहूलजींना याचे खंडन करावेसे वाटत नाही.

याचाच अर्थ त्यांची तीन तलाक कायदा रद्द करण्याला मूक संमती आहे. मुसलमान समाजासमोर अशा कित्येक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पण एकही मुस्लमान सुशिक्षित तरुण या समस्या सोडवायला पुढे येताना दिसत नाही. असे का होत असेल?

याचे उत्तर अदिलच्या त्या व्हिडिओमध्ये आहे. त्या मुर्ख अदिलला लहानपणापासून कुणीतरी सांगितले असावे की इस्लामसाठी जर तू मेलास तर तू जन्नतमध्ये जाशील. हिंदूमध्येही अशा काही कथा आपण लहानपणी ऐकत असतो.

 

Jihad-in-Islam-inmarathi
urdumania.net

चांगले काम केले की माणूस स्वर्गात जातो आणि वाईट काम केले की माणूस नर्कात जातो किंवा देवदेवतांच्या अनेक कथा लहानपणी आपल्या मनावर बिंबवल्या जातात.

पण जेव्हा आपण मोठे होते तेव्हा आपल्याला कळतं की या सर्व रुपक कथा असतात. आपल्यावर संस्कार व्हावे म्हणून अशा कथा मुद्दामून कुणीतरी रचलेल्या असतात. त्या कथांमध्ये अडकून न राहता त्यातला गर्भितार्थ लक्षात घ्यायचा असतो.

पण अदिल, कसाब किंवा अनेक मुस्लिम अतिरेकी तरुणांना पाहिलं की आपल्या लक्षात येतं की या तरुणांचे ब्रेन वॉशिंग करणे किती सोपे आहे.

केवळ धर्मासाठी मरावे आणि मेल्यावर जन्नत मिळाली म्हणून ईश्वराने दिलेलं सोन्यासारखं आयुष्य (मग ते स्वतःचं असो वा दुसर्‍याचं) मातीमोल करुन टाकतात. अदिलच्या या मुर्ख समजूतीमुळे भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

हा मुर्खपणा मुळात कट्टरतेतून येतो. ही कट्टरता आता मुस्लिम समजाला सोडावी लागणार आहे. नाहीतर असे कितीतरी अदिल जन्नतमध्ये जाण्यासाठी दुश्कृत्य करत राहतील आणि त्यांचे आई-वडील काहीच करु शकणार नाहीत.

तुम्ही जगा आणि दुसर्‍याला जगवा हा संदेश मुस्लिमांनी आपल्या मुलांना दिला पाहिजे. ज्या ज्या प्रथा आजच्या काळाशी सुसंगत नसतील त्या प्रथा केवळ कुराणात लिहिल्या आहेत म्हणून बाळगून ठेवू नये तर त्या मुक्त मनाने झिडकारुन लावल्या पाहिजेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंमधील वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनी हिंदूंमधील जाती व्यवस्थेवर सडकून टीका केली व त्यासाठी कार्यही केले.

हिंदुंना त्यांनी पोथीनिष्ठा सोडून द्यायला सांगितली. त्याचप्रमाणे पोथीनिष्ठेचा त्याग त्यांनी मुस्लिमांनाही करायला सांगितला… त्यांनी काळाप्रमाणे वागण्याचा सल्ला दिला आणि यामुळेच राहूल गांधी सतत सावरकरांवर खोटे आरोप करुन टिका करत असातात. कारण मुस्लिम समाज आधुनिक व्हावा असं त्यांना वाटत नाही…

 

muslim-women-inmarathi
seekershub.com

पण मुस्लिमांनी आता सावध झालं पाहिजे. सुरुवात तीन तलाकपासून करायला हरकत नाही. आणि जग चंद्रावर यान पाठवत असताना खोट्या जन्नतचे स्वप्न आई-वडीलांनी मुलांना दाखवूच नये.

किमान वयात आल्यावर तरी त्यांना या सगळ्या रुपक कथा होत्या असे ठणकावून सांगावे. कारण अदिल, कसाब सारख्या उदाहरणावरुन दिसते की मुसलमान तरुण त्या कथांमध्ये रमतो.

त्यामुळे आता स्वतःला चांगले म्हणवून घेणार्‍या मुस्लिमांची जबाबदारी वाढली आहे. निदान भारतीय मुस्लिमांनी तरी ही जबाबदारी स्वीकारावी. थोडक्यात मुसलमान तरुणांनी कट्टरता झिडकारुन आधुनिकता स्वीकारावी… नाहीतर पुढील काळ धोक्याचा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?