दारूबंदीच्या निषेधार्थ जेव्हा अमेरिकन नागरीक रस्त्यावर उतरतात…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
जगामध्ये सर्वात पहिल्यांदा तथाकथित व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणारा देश म्हणजे संयुक्त अमेरिका, पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की व्यक्तिस्वातंत्र्याचे गोडवे गाणाऱ्या या देशांमध्ये कधी दारू बंदी केली होती तर!
पण संयुक्त अमेरिकेने हे ईतिहासात करून दाखवले आहे. अमेरिकेने हे का केले होते या गोष्टीची पार्श्वभूमी काय याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

जगामध्ये अनेक देश आहेत जे विरोधाभासी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे “युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका”.
व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने जगामध्ये गळे काढत फिरणारा हा देश, याच देशाने एकोणिसाव्या शतकामध्ये नागरिकांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत पूर्ण देशावर दारू बंदी लादली होती.

ही बंदी अमेरिकेमध्ये तब्बल तेरा वर्षे होती. १६ जानेवारी १९२० पासून ते ५ डिसेंबर १९३३ पर्यंत संपूर्ण देशामध्ये दारूबंदी लादली गेली होती.
हा काळ अमेरिकेच्या इतिहासातील प्रसिद्ध काळ म्हणून ओळखला जातो, पण यामागे देशामधील दारूचे उत्पादन कमी करणे हा उदात्त हेतू होता.
जनतेचा रेट्यापुढे शासकांना त्यांचा हा विचार रद्द करावा लागला. या कालखंडामध्ये अमेरिकेने अनेक यशस्वी तसेच अयशस्वी सामाजिक व राजकीय प्रयोग केले होते.

अमेरिकेच्या या प्रयोगाबद्दल सांगायचं झालं तर खरं पाहता अमेरिकेचा हा प्रयोग मात्र हवा त्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही, कारण सरकारच्या या निर्णयाविरुद्ध एक फार मोठे जनआंदोलन उभे राहिले होते.
या प्रयोगातून एक गोष्ट मात्र लक्षात आली की सरकार प्रत्येकाच्या गरजा पुरवण्यासाठी असमर्थ असते.
या बंदीच्या कालखंडामध्ये गुन्हेगार, दारूडे तसेच काही दारू दुकानांचे मालक यांनी एकंदरीतच या परिस्थितीमध्ये एक फार मोठ सामाजिक जाळं प्रस्थापित केलं होतं. जेणेकरून त्यांना काही काळाने आंदोलन उभा करण्यासाठी मदत होईल.

सुरुवातीला मात्र जनसामान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी हा निर्णय मान्य केला होता पण शेवटी मात्र या आंदोलनामध्ये सामान्य माणसांच्या आक्रोशाचा भडका उडाला होता.
ही बंदी अमेरिकन कायद्याच्या अठराव्या तरतुदीनुसार घालण्यात आली होती. ज्या दिवशी याबद्दल प्रस्ताव पारित करण्यात आला त्या दिवशीचा हा शेवटचाच प्रस्ताव होता.
त्यादिवशी बंदी शिवाय कुठलाही इतर प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नव्हता.
:टेम्परन्स चळवळ:
टेम्परन्स चळवळ अमेरिकेच्या राजकारणामध्ये या बंदीच्या काळामध्ये चालविण्यात आलेली होती. या चळवळीचा उद्देश नागरिकांनी दारू पिण्याचे प्रमाण कमी करावे हा होता.
या चळवळीअंतर्गत प्रत्येक नागरिक दारू न पिण्याची शपथ घेत होता. किंबहुना सरकार प्रत्येक नागरिकाला दारू न पिण्याची शपथ घ्यायला लावत असे.
ही चळवळ पहिल्यांदा १८४० मध्ये काही धार्मिक दांभिकतावादी संघटनांकडून चालविण्यात आली होती.
सुरुवातीला या चळवळीलाही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पाठिंबा दर्शविला होता.

ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात आणली गेली होती, पण हळूहळू १८५० मध्ये या चळवळीची धार आणि शक्ती नागरिकांच्या दारू पिण्याच्या इच्छाशक्ती पुढे कमी पडू लागली.
पुढे १८८० मध्ये ड्राय चळवळीने या टेम्परन्स चळवळीला जीवनदान दिले.
या दशकात या चळवळीला सामान्य जनतेने परत मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला. यावेळी मात्र महिलांनी “क्रिस्टियन टेम्परन्स युनियनची” स्थापना करून दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला होता.
याच काळामध्ये देशामधून सलून म्हणजेच कटिंगची दुकाने हद्दपार करण्यात यावेत यासाठीही काही माथेफिरू लोकांनी आंदोलन केलं होते, पण या आंदोलनाची कुठेही दखल घेतलेली दिसत नाही.
केरी नेशन या सर्व आंदोलनाच्या प्रणेत्या होत्या. त्यांनीच या सर्व संघटनांची स्थापना करून सरकारवर दबाव बनवण्याचे काम केले होते. कॅरी अत्यंत उंच होत्या आणि त्यांना स्त्रियांनी पार्लरमध्ये जावं ही गोष्ट मान्य नव्हती.
कॅरी यांचे निधन १९११ मध्ये झालं आणि यामुळे त्यांना दारूबंदी ही अनुभवायलाच भेटली नाही.
या मागणीसाठी काही नेत्यांनी एकत्र येऊन एका पक्षाची स्थापना केली. या पक्षाला ड्राय पार्टी असे संबोधले जायचे.

या पक्षाची स्थापना १८६९ मध्ये अमेरिकेच्या राजकारणामध्ये झाली होती. यातील उमेदवार हे केरी यांच्या दारूबंदीच्या निर्णयाची मागणी संसदेमध्ये मांडण्यासाठीच राजकारणात उतरलेले होते आणि हे सर्व उमेदवार त्यांच्या मागणीला पाठिंबा देत असत.
या पक्षाची अशी विचारधारा होती की दारूबंदी हे रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅटिक पक्ष्यांच्या नेतृत्वामध्ये घडूच शकत नाही.
या पक्षाचे उमेदवार स्थानिकांना त्यांच्या मागण्या पटवून देण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करू लागले होते. त्यांनी सामान्य जनतेमध्ये त्यांच्या मागणीबाबत प्रबोधन केलेले होते. १८८८ आणि १८९२ मध्ये या पक्षाला दोन टक्के मतदान मिळाले.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या प्रत्येक संघ राज्याने दारूबंदीसाठी प्रस्ताव पारित करण्यास सुरुवात केली.
या प्रस्तावामुळे स्थानिक स्तरावरती या निर्णया ची अंमलबजावणी होऊ लागली. सुरुवातीला दक्षिणेतील काही संघराज्यांनी या निर्णयासाठी घाई दाखवली होती.
कारण या काळामध्ये दारू पिऊन त्यांच्या संघराज्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या लोकांचा त्रास वाढला होता.

काही संघराज्य मात्र संस्कृतिक जपणुकीसाठी ही पावले उचलत होती, ज्यामुळे अमेरिकेची येणारी पिढी सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असेल.
पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाने या चळवळीला अधिकच हवा दिली होती. एक असा गैरसमज पसरला होता की दारू निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमुळे अमेरिकेमध्ये अन्न आणि मजुरांचा तुटवडा पडत आहे.
जर्मनांना विरोध करन्याच्या भूमिकेमुळे या काळामध्ये बीयर चे खूप मोठे नुकसान झाले. कारण या काळामध्ये अमेरिकेतील सैनिक जर्मनीतील सैनिकांशी लढा देत होते.
काही काळानंतर मात्र संयुक्त राष्ट्रसंघाने दारूबंदीचा निर्णय संपूर्ण देशामध्ये लागू केला.
सुरुवातीला याबाबतीत लोकांनी सरकारलाही पाठिंबा दाखवला, पण काही काळाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली काही संघटनांनी या बंदीच्या विरोधात आंदोलन केले.

आणि मग मात्र सर्वसामान्य नागरिकांमधील आक्रोशित लोकांनीही याला पाठिंबा दर्शवला आणि काही काळाने या छोट्याशा आंदोलनाचे रूपांतर एका भव्य अशा जनआंदोलनांमध्ये झाले.
जनतेपुढे सरकारला नमते घेऊन दारुबंदीचा नियम मागे घ्यायला लागला.
कुठल्याही देशाने जर अशी विरोधाभासी भूमिका घ्यायचा प्रयत्न केला तर तेथील सामान्य जनता अशाच प्रकारचा उठाव करेल आणि त्यांच्यासाठी अमेरिकेतील हे आंदोलन नक्कीच आदर्श ठरेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.