Site icon InMarathi

पुलवामा हल्ल्याची रात्र प्रत्येक भारतीयाने तळमळत काढली पण ‘ह्या’ प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाहीत

Latestly.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : नचिकेत शिरुडे

===

आजचा दिवस ह्या वर्षभराच्या सुरुवातीपासूनचा सर्वात वाईट दिवस म्हटला गेला पाहिजे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात सुट्टी साठी निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद ह्या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी IED बॉम्बचा हल्ला केला ज्यात भारत भूमीच्या ३७ सुपुत्रांनी आपले प्राण मातृभूमीसाठी अर्पण केले.

अनेक जवान गंभीर जखमी झाले असून इस्पितळात उपचार घेत आहेत.

आज देशभरात व्हॅलेंटाईन डे निमित्त उत्साहाचे वातावरण असतांना अचानक आलेल्या ह्या दुःखद बातमीने सर्वांना हादरवून सोडलं आहे.

देशभरात ह्या भिकार हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला जातो आहे, जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आहे, संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला आहे.

 

tfi.com

ह्या इतक्या दुःखद प्रसंगात देखील भारतातील प्रमुख राजकीय पक्षांनी व काही नेत्यांनी आपल्या असंवेदनशीलतेचा आणि नैतिकता शून्यतेचा परिचय करून दिला आहे. पुलवामा मध्ये झालेला हा हल्ला गेल्या पाच वर्षातला सर्वात भीषण हल्ला होता.

ह्या कठीण प्रसंगात देशाच्या लोकशाही यंत्रणेचा भाग म्हणून ज्या राजकीय पक्षांकडून सर्वोच्च नैतिकता, समंजसपणाची अपेक्षा होती त्यांनी आपल्या निर्लज्जपणाच्या सर्व पातळ्या सोडत, राजकारण एके राजकारण करायचा चंग बांधला आहे.

ह्यात दुर्दैवाने काही प्रमुख नेत्यांचा ही समावेश आहेत जे एका वर्गाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

पुलवामा येथे हल्ला झाला, इतकी दुःखद बातमी आल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यास सुरुवात झाली, पंतप्रधानांसकट देशभरातील सर्व प्रमुख राजकिय पक्षाच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण करायला सुरुवात केली.

पण असं असतांना देखील ह्या वाईट प्रसंगात काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या रणदीप सुरजेवालानी पत्रकार परिषद घेत

“हा हल्ला दुःखद असून, हे मोदी सरकारचे अपयश आहे” अश्या आशयाची प्रतिक्रिया दिली.

एकिकडे देश शोकसागरात बुडालेला असताना, देशावर संकट असताना सुरजेवालांनी परिस्थितीचं भान न बाळगता कुठलाच मागचा पुढचा विचार न करता सरळ मोदींवर आरोप लावले.

 

dnaindia.com

मुळात आरोप करण्यात गैर काही नाही पण एक राष्ट्रीय पक्ष्याच्या प्रवक्त्याला काळप्रसंगाचे भान नसणे हे सर्वात जास्त वाईट आहे .

जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी ह्या भीषण हल्ल्यावर प्रसार माध्यमाशी बोलतांना म्हटलं की

“हा मुसलमानांवर दबाव टाकण्याचा आणि त्यांना जबरदस्तीने आतंकवादी कारवायात गुंतवण्याचा प्रकार सरकार करते आहे. हा हल्ला मुस्लिमविरोधी राजकारणाचा परिपाक आहे.!”.

मुळात हा हल्ला करणाऱ्या जैश ए मोहम्मद ह्या संघटनेचा आणि भारतीय मुस्लिमांचा काय संबंध आहे?

हा प्रश्न तर उरतोच सोबतच महत्वाचा अजून एक प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळी देशातील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, अश्या वेळी असल्या राजकीय मानसिकतेच्या प्रतिक्रिया देणं एका जेष्ठ नेत्याला शोभतं का?

जितेंद्र आव्हाड ह्यांनी वेळोवेळी अश्या भूमिका घेतल्या आहेत, ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत, ह्या भूमिकेमुळे त्यांच्यावर तशीच परिस्थिती ओढवणार हे मात्र नक्की आहे.

 

facebook.com

भारतातल्या राजकीय परिघात ह्या दुर्दैवी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अश्या अनेक केविलवाण्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या आहेत. ह्यामुळे संपूर्ण देशभरातील जनतेच्या जखमेवर मीठ टाकण्याचा प्रकारच समजला गेला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राजकीय टीका करण्यात चूक काहीच नाही, ह्यात सरकार निर्दोष आहे असं देखील नाही, त्यांचा वर टीका करणे हे विरोधी पक्षाचे नैतिक कार्य आहे.

विरोधी पक्ष सामान्य जनतेचा आवाज आहेत, पण कुठलीही गोष्ट करतांना एक प्रसंगावधान राखणं गरजेचं असतं, ह्या ठिकाणी मात्र अनेकां आपल्या असंवेदनशीलतेचे प्रदर्शन भरवत आपण नैतिक दृष्ट्या शून्य आहोत हे दाखवून दिलं आहे.

ह्यात जेवढे विरोधी पक्ष व त्यांचा समर्थकांकडून बेजबाबदारपणाचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे तितकाच बेजबाबदारपणा सरकार समर्थक असणाऱ्या काही गटांकडून केला जातो आहे.

पुलवामा संबंधितल्या बातम्यावर मूर्खासारख्या रिएक्शन देणाऱ्या लोकांचे स्क्रीनशॉट काढत ते पसरवले जात आहेत व त्यांचा धर्म अधोरेखित करत, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा देखील प्रयत्न होत आहेत. इतकंच नाही तर अत्यंत क्षुल्लक शब्दात ह्या दुर्दैवी हल्ल्याला धर्माचा रंग देण्यात येत आहे. त्यात उत्साही नेत्यांचा प्रतिक्रियांनी भर घातली आहे.

 

 

ज्या दुःखाच्या प्रसंगात, जेव्हा आपल्या देशाचे ४४ सुपुत्र आपल्यासाठी शहीद झाले आहेत त्यावेळी आपल्या राजकीय महत्वकांक्षा घेऊन काम करणारे हे लोक जास्त विघातकी ठरत आहेत.

ज्यावेळी देश एका प्रचंड गंभीर संक्रमणावस्थेतून जात असतो, त्यावेळी मनी संवेदनशील भाव असणे सर्वाधिक गरजेचे असते, मुळात जबाबदार पदावर असणाऱ्या आणि जनतेचं नेतृत्व करणाऱ्या लोकांकडुन अशी अपेक्षा जास्त असते.

पण जर तेच लोक एक सामंजस्याची भुमिका न घेता, आपल्या विचारधारा वगैरे गोष्टींना घेऊन एकमेकांवर टीका करण्यातच धन्यता मानू लागले तर ह्या देशातील सामान्य भारतीय नागरिकाने कोणाकडे डोळे लावून बसायचं?

हे लोक जे आज आपले राजकीय फायदे बघत आहेत ह्यांच्यापैकी बरेच लोक अशे आहेत जे ह्या आतंकवादी संघटनेच्या तरुणांना भरकटलेले म्हणतात, नक्षल्याना गरीब आदिवासी म्हणत पाठीशी घालतात.

 

patriotsforum.org

आतंकवाद्याची शिक्षा रद्द करावी ह्यासाठी रात्री बेरात्री कोर्टाचे दरवाजे वाजवतात पण ज्यावेळी गोष्ट देशावर ओढवलेल्या वाईट प्रसंगाची येते, जवानांच्या मृत्यूची येते, अश्यावेळी मात्र आपल्या असंवेदनशीलतेच प्रदर्शन भरवतात.

मग नेमका प्रश्न पडतो ह्या स्वतला सामान्यांचा आवाज म्हणवून घेणारे, लोकशाही, मानव अधिकारांचा गप्पा मारणारे हे लोक बांधिलकी नेमकी कोणाशी जपतात?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version