आव्हाड साहेब, जनाची नाही मनाची तरी लाज वाटू द्या?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
काही वर्षांपूर्वी गुरमेहेर कौर नावाच्या मुलीचा एक बाष्कळ व्हिडियो आला होता. दुश्मनी कशी वाईट, अमन शांती कशी चांगली असं कसलं कसलं विचारधन मांडलं होतं त्यात. मध्येच तिचा एक फोटो प्रसिद्ध झाला, युद्धाने माझे वडील मारले पाकिस्तानने नव्हे.
या फोटोवर वीरेंद्र सेहवागने दिलेलं उत्तर तडाखेबंद होतं, स्वतःचा फोटो ट्विटरवर टाकत सेहवागने ‘माझ्या बॅटने त्रिशतकं केली मी नव्हे’ असं सेहवागने मांडलं.
रातोरात गुरमेहेर कौर पुरोगाम्यांची लाडकी मानसकन्या झाली, सर्वांनाच तिचा पुळका आला होता.
एखाद्या स्त्रीला बलात्काराच्या धमक्या मिळणं नक्कीच वाईट पण आपल्याकडे पुरोगाम्यांचा भयानक पक्षपातीपणा पाहता गुरमेहेरला मिळालेली सहानुभूती ही तिने फडकावलेल्या ट्विटरवरच्या फोटोमुळे होती हे जगजाहीर होतं.

प्रश्न गुरमेहेर कौरला सेहवागने उत्तर का दिलं हा नाहीच. सेहवागलाही तिच्यासारखाच अभिव्यक्ती अधिकार होता हेच सर्वजण विसरले कारण गुरमेहेर ‘युद्ध करू नका’ वगैरे सुनावून गेली होती.
एक गोष्ट मान्य करायला हवी ते म्हणजे भारतवर्षात फार कमी लोकांना आपल्या देशाने इतरांवर आक्रमण करून गोष्टी संपवाव्यात असं वाटत असतं.
भारताच्या सुरवातीच्या काळापासून भारताची अवस्था ही शांत आणि सहनशील हत्तीसारखी झालेली आहे.
कधीकधी हत्तीला आपलं हत्तीपण दाखवावं लागतं. पण आपल्या देशातले पुरोगामी अत्यंत हळवे असतात त्यामुळे ते हत्तीलाच आपलं शांतता राखण्याचं कर्तव्य निभवायला सांगत असतात.

या प्रकारच्या लोकांना पाकिस्तानबद्दल इतकं प्रेम असतं की निव्वळ यांच्या मताप्रमाणे विचार केला तर वाटेल की जणू पाकिस्तान हे एक शांतताप्रिय राष्ट्र असून या देशातल्या हिंदुत्ववाद्यांनाच पाकिस्तानशी संहारक युद्ध हवं आहे.
खरंतर भारतातल्या बहुसंख्य हिंदूंच्या अपेक्षा साध्या आणि सरळ आहेत. मुसलमानांचे लाड कमी व्हावेत (संदर्भ शाहबानो खटला आणि ट्रिपल तलाकवरचा काँग्रेसचा पवित्रा आणि अनेक प्रकरणे) आणि त्यांची संख्या मर्यादित राहावी.
आज या पुरोगाम्यांची कार्यपद्धत काय आहे?
हे पुरोगामी नरेंद्र मोदींची यथेच्छ टिंगलटवाळी करण्यात गुंतले आहेत. २६/११ सारखा हल्ला झाला तेंव्हा कोणी मनमोहनसिंगांची एवढी टवाळी नव्हती केली. १९९३ चे स्फोट असोत, कारगिल युद्द असो कि संसदेवरचा हल्ला, प्रत्येकाने केंद्र सरकारच्या मागे ठामपणे उभं राहण्याचीच वृत्ती दाखवली होती. पण आज ही मानसिकता एका माणसाच्या द्वेषाला शरण गेली आहे.
पुरोगाम्यांनी नरेंद्र मोदींची जिरली या आनंदाने फक्त फटाके फोडायचे बाकी ठेवले आहे. जितेंद्र आव्हाड यांना या हल्ल्याला मोदी सरकारची मुस्लिम विरोधी शासन नीती जबाबदार असल्याचा शोध लागला आहे.

काश्मिरी मुसलमानांना दिलेली वचने सरकारने पूर्ण केली नाही म्हणून हे स्फोट झाले असं आव्हाड म्हणाल्याचं वृत्त आहे. जर हे खरं असेल तर हे स्पष्टीकरण राजीव गांधींच्या हत्येला लावायचं काय? हेच स्पष्टीकरण इंदिराजींच्या हत्येला लावायचं काय?
कारण दोन्ही हत्यांच्यामागे प्रादेशिकता होतीच. म्हणजे आपल्याला मिळालेली वचने पूर्ण नाही झालीत तर तरुणाई, त्यातही काश्मिरी तरुणाई, सुसाईड बॉम्बर बनणार हे आव्हाडांनी गृहीत धरलं आहे का?
खरा जगाचा कर्करोग पाकिस्तानसारखा देश आहे. १९८० च्या दशकात पाकिस्तानचं झालेलं इस्लामीकरण. याचा जनक झिया उल हक.
अतिरेकी तयार करायचा कारखाना याच झियांनी निर्माण केला. अतिरेक्यांसाठी शांततेचा काळ म्हणजे बेरोजगारीचा काळ. यातला पहिला गट धर्मगुरूंचा. संपूर्णपणे इस्लामशी निष्ठा मानणारा. हा चेहरा वहाबी आहे.
नुसता कट्टर किंवा कडवा नव्हे तर इस्लामचे थेट पैगंबरकालीन रूप मानणारा आहे.

या वर्गाच्या मते इस्लाम धर्माला संगीत, चित्रकला, स्थापत्यशास्त्र, नृत्य आणि त्या सर्व गोष्टी निषिद्ध आहेत ज्यातून खरा मुसलमान म्हणजे इस्लाम वर श्रद्धा ठेवणारा एकाग्र चित्त गमावू शकतो.
तालिबानी इस्लाम याच्या सर्वात जवळ जाणारा. आणि सर्वच धर्मात अश्या प्रवृत्ती नांदतात.
इंग्रजी भाषा आणि त्यातून जे तुम्ही शिकताय ते विष आहे आणि त्याचा उतारा तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला अरबी भाषा आणि केवळ त्यातूनच कुराण वाचता आले पाहिजे अशी या वर्गाची भावना आहे.
कुराणाच्या लेखनाअगोदर जे जे घडले ते सर्व अपवित्र असून पाकिस्तान हा इस्लामसाठी तयार झालेला देश आहे आणि या देशावर इस्लामचे वर्चस्व हवे आणि तीच त्याची ओळख, अशी या वर्गाची भावना आहे या गटाचा म्होरक्या म्हणजे हाफिज (धर्मगुरू) सईद.
पाकिस्तानवर सांस्कृतिक प्रभुत्व याच गटाचे. भारतीय मुसलमान यांच्याहून बराच वेगळा असून त्यामुळे यांच्यासाठी नापाक आहे.

प्रचंड गुंतागुंतीचा असलेला देश आहे हा. याचा द्वेष करणं अजिबात योग्य नाही. पण या सापाला बिनधास्त गळ्यात घालून घेणं हे सुद्धा योग्य नाही.
आपला देश दहशतवादाने होरपळला आहे. घरून निघाल्यानंतर परत येऊ की नाही अशी अनिश्चित अवस्था या देशातल्या नागरिकांनी अनुभवलेली आहे.
पाकिस्तानबद्दल चीड आहे ती त्या कारणामुळे. अर्थातच आंधळे झालेल्या पुरोगाम्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. लाज हा प्रकारच माहित नसल्याने जनाची, मनाची हा भेदभाव इथे नाहीच.
“अहो पण तो पूर्वी आपलाच भाग असे ना, मग त्याचा द्वेष का बरे करायचा?” असा प्रश्न पडणाऱ्या लोकांना स्वतःच्या तोंडातलं शेण हे आईसक्रीम वाटत असेल तर कोकणी भाषेत “देव बरे करू”
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.