आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्याला बिहारच्या ग्रामीण भागातील दशरथ मांझी “the mountain man” ह्यांच्या विलक्षण कथेबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे, ज्यांनी फक्त एक हातोडा आणि छिन्नी वापरुन डोंगरातून मार्ग तयार केला. त्यावर नंतर चित्रपटही बनवला गेला होता.
परंतु भारतात केवळ हेच एक मांझी नाहीत ज्यांनी लोककल्याणासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशाच आणखी एका अवलिया मांझी बद्दल ज्यांनी २८ किलोमीटर च्या रस्त्याच्या बांधकामासाठी आपल्या आयुष्यभराची बचत आणि वडिलोपार्जित मालमत्ता अक्षरशः विकून टाकली.
“इतरांना वेदना सोसताना आणि आपल्या त्रासांशी झगडतांना पाहून मी हा रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला” असे ते म्हणतात, ७५ वर्षांचे वृध्द मेमे चोन्जोर ज्यांनी स्वकमाईचे५७ लाख रुपये खर्च केले फक्त हा रस्ता बनवण्यासाठी.
तर, लद्दाखच्या झांस्कर व्हॅलीमधीलस्तोंगच्या लांबच्या दुर्गम अशा गावातून आलेल्या मेमे चोंजोर नावाच्या ७५ वर्षीय माणसाची ही कथा आहे आहे. ही कथा आहे दृढनिश्चय आणि समर्पणाची .
काही माजी कर्मचारी जे १९६५ ते २००० पर्यंत राज्य हस्तशिल्प विभागात काम करत होते. ते भारताच्या मुख्य भागापासून लांब असणाऱ्या काहीशा दुमर्गम अशा भागात राहत होते.
परिणामतः झान्सकर चा संपूर्ण भाग जो कारगिल जिल्ह्यात आणि जो समुद्रसपाटीपासून ११,५०० ते २३,००० फूट उंचीच्या अंतरावर स्थित आहे, त्याकडे स्थानिक आणि राज्य प्रशासनाद्वारे काही दशकापासून दुर्लक्ष केले गेले होते.
नुकतेच सीमा रस्ते संघटनेने हिमाचल प्रदेशातील दारचा आणि पदम गावादरम्यान १४० किलोमीटर लांब रस्ता बांधण्याचे काम पूर्ण केले.
शंकुला पास मार्गे झांस्कर प्रशासकीय केंद्राकडे १६,५०० फूट उंचीवर, पद्म पासून, रस्ता लेह जिल्ह्यातील निमु गांवात जातो. जरी तिथून काही लहान वाहनेच ये जा करू शकतात तरी हा एनपीडी (निमु-पदम-दराचा) रस्ता पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा तुकडा आहे.
अलीकडच्या चिनी सैनिकी हल्ल्यांनंतर सैनिकांनी आणि सैन्याच्या नियमित हालचालीची खात्री करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांना या भागाशी जोडण्यासाठी प्रचंड महत्वाचा मानला गेला आहे.
सध्या ४७४ किमी लांब मनाली-लेह महामार्ग हा कारगिलपर्यंत पोहोचण्याचा एकमात्र मार्ग आहे.
परंतु शिंकु ला पाससह डार्का रोडच्या जोडणीमुळे हा मार्ग थेट कारगिल सेक्टरमध्ये पोहोचण्यासाठी पर्याय बनला आहे, त्यामुळे हा लष्कराच्या वाहनांसाठीचा सर्वात जवळचा मार्ग आहे.
त्यामुळे लोकांना सध्या मनाली-लेह महामार्ग द्वारे जाण्यास भाग पाडण्यात येते. असे बीआरओचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले.
जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या एका पत्रात इतिहासकार एच. एन. कौल यांनी असे लिहिले आहे की,
“लेह, लाहौल आणि पूर्वे पंजाबच्या संरक्षणासाठी झांस्सरची सुरक्षा देखील महत्त्वपूर्ण आहे… जोपर्यंत आपण लेह आणि झांस्कर यांना धरतो तोपर्यंत आम्ही संपूर्ण जिल्हा धरतो आणि कश्मीर, चंगथांग (पूर्वेकडील लडाख) आणि लाहौल यांना शक्य आक्रमणांपासून संरक्षण देतो.”
ह्यात सर्वात महत्वाच्या मुद्द्यांमधील एक भाग म्हणजे योग्य रस्ते कनेक्टिव्हिटीची उणीव जी उर्वरित भागाशी ह्या दुव्याला जोडेल. आणि म्हणून २००१ मध्ये २९२ किलोमीटर दराचा-शिंकुला-पडम-निमू रस्त्याची योजना आखण्यात आली. त्याबद्दल अधिकार्यांकडे वारंवार अर्ज येत असले तरी प्रत्यक्ष मात्र काहीच कारवाई होत नव्हती.
पण एक माणूस असा होता ज्याला वाट पहायची नव्हती – त्याचं नाव मेमे चॉंजोर. त्याने आपल्या प्रयत्नांनी न केवळ आपल्या गावातील तर सबंध शेजारी गावातल्या लोकांचेही आयुष्य बदलून टाकले.
मे २०१४ ते जून २०१७ पर्यंत शिंकुला पासच्या जम्मू आणि काश्मीरच्या बाजूला असलेल्या रामजाक येथून २८ किलोमीटरचा रस्ता बांधण्यासाठी त्यांनी एकट्याने झांसर क्षेत्रातील पहिले गाव वसवण्यासाठी प्रयत्न केले.
त्यासाठी मेमे चोंजोर ह्यांनी आपली आयुष्यभराची कमाई आणि त्यांच्या पूर्वजांच्या मालमत्तेची विक्री करूनस्वत: च्या खिशातून ५७ लाख रुपये खर्च करून जेसीबी मशीन आणि पाच गाढवांच्या मदतीने रस्ता बांधण्याचे काम पूर्ण केले.
नंतर सीमा पट्टी संघटना (बीआरओ) ने या विस्तारावर रस्ते बांधण्याचे काम सुरू केले. त्यांना इतरही काही स्थानिक लोकांकडून पैसे मिळाले, ज्यांना रस्ता बनवायची इच्छा होती.
स्थानिक नगरसेवकांकडून ५ लाख रुपये आणि स्थानिक लोकांकडून २.५ लाख मिळाले.
मेमे चॉंजर म्हणतात,
“इतरांच्या वेदना व दुःखाने मला या रस्त्याचे बांधकाम करण्यास प्रेरणा मिळाली.”
बांधकाम प्रक्रिया सुरू असताना त्यांच्यासमोर काही प्रारंभिक आव्हाने होती. तेथे राहणाऱ्या सुरक्षा दलांनी या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी कुठून मिळाला ह्याबद्दल सखोल चौकशी केली. जेव्हा त्यांना मेमे चोंजोर ह्यांचाकडून संपूर्ण माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी हा रस्ता बांधण्याच्या कामात हरकत घेतली नाही.
वातावरणातील काही बदल मात्र आव्हानात्मक होते. जरी त्याचे अर्धेअधिक आयुष्य झान्स्कर सारख्या गावात गेले होते तरी सुरुवातीस, समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर (11,500 फूट) च्या उंचीवर रस्ता बांधून झाला तेव्हा मेम् चोंजोर यांच्या आरोग्यावर त्याचा त्याचा परिणाम झाला.
इतरवेळी फक्त चार ते पाच महिनेच काम करता यायचे कारण तिथले तापमान -३० अंशांनी खाली येत असल्याने तिथे कसलेही काम करणे अशक्य होते. त्यामुळे ते अस्वस्थ व्हायचे.
आता मेमे चोन्जोर ह्यांनी आपली संपूर्ण मिळकत रस्ता बांधण्यात घालवल्यानंतर आपली उपजीविका कशी चालवली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?
तर मेमे चोन्जोर ह्यावर म्हणाले की,
“मला साधी राहणी आवडते, म्हणून मला मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्याची गरज नाही. आपल्याला खरोखर किती गरज आहे? मी सरकारकडून मिळणा-या नियमित मासिक पेंशनवर आनंदाने जगतो, “.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, लद्दाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट काउंसिल, कारगिल आणि जिल्हा प्रशासनाने त्यांना “पदम ते दरचा दरम्यान रस्ता तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावल्याबद्दल सन्मानित केले. आणि सार्वजनिक कल्याणासाठी दिलेल्या भरीव योगदानासाठी त्यांची प्रशंसा केली.
मेमे चोंजोर ह्यांच्या ठायी असलेली Meme-Chonjor-inmarathi
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.