Site icon InMarathi

या चित्रपटाची निर्मिती तब्बल पाच लाख शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली होती!

smita patil inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हल्ली सिनेमांचे बजेट आणि कमाई म्हंटल की दोन्हीचा आकडा थेट कोटींच्या घरात असतो. मग त्यात आशय असो वा नसो. दर्जा असो वा नसो. मनोरंजन हा एकमेव निकष लावला जातो आणि बहुधा त्याचा दर्जाही सुमारच असतो.

अगदी बोटावर मोजण्या इतके सिनेमे असतात ज्यात दर्जा राखला जातो आणि जे प्रेक्षकांची माने जिंकण्यात यशस्वी होतात.

पण ही झाली आताची परिस्थिती. पूर्वी सिनेमाचे अतैतके वेड नव्हते. आशयपूर्ण आणि दर्जेदार सिनेमांच्या निर्मितीसाठी संघर्ष करावा लागायचा. तेव्हाच्या अनेक कलाकृती इतिहासात आजरामर झाल्या आहेत.

अशाच एका दर्जेदार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या निर्मिती मागची रंजक माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

 

 

सुमारे ४३ वर्षांपूर्वी, सुप्रसिध्द चित्रपट निर्माते श्याम बेनेगल ह्यांनी पाच लाख शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि बनवला एक पुरस्कार विजेता चित्रपट.

हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्यासाठी अशा प्रकारे निधी गोळा केल गेला. ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वैयक्तिक गुंतवणूकदारांनी गुंतवणुक केली होती.

तो काळ होता १९७६ चा. गुजरातमधून अगदी ट्रक भरभरून शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन हा चित्रपट पाहायला गेले होते.

केवळ हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्याकथेवर आधारित होता म्हणूनच नव्हे तर चित्रपटात नसीरुद्दीन शाह, स्मिता पाटील, अमृती पुरी आणि गिरीशकर्नाड यांसारखी महान अभिनेते मंडळी होती.

परंतु यावेळी, ते फक्तप्रेक्षकच नव्हते तर ह्या चित्रपटाचेनिर्मातेही होते!  हा चित्रपट होता श्याम बेनेगल यांच्या “मंथन”. जो डॉ. वर्गीस कुरियन यांनी बेनेगल सोबत लिहिलेला आणि पाच लाख शेतकऱ्यांनी निर्मित केला होता.

कुरिअनच्या ‘व्हाईट रेव्होल्यूशन’म्हणजेच “धवल क्रांती”  या संकल्पनेवर आधारित हा चित्रपटजगातील पहिला चित्रपट होता ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर क्राउड फंडिंग केले गेले होते.

 

india.com

 

आता बघुया ह्याची सुरुवात कशी झाली ?

स्वातंत्र्यानंतर, स्वतंत्रता सेनानी त्रिभुवदास पटेल यांनी गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील शेतकर्यांबरोबर काम करण्यास सुरवात केली आणि ‘केरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’नावाची पहिली सहकारी संस्था स्थापन केली.

अमेरिकेतील एक तरुण पदवीधर असूनही, १९४९ मध्ये वर्गीस कुरियन यांनी भारतात येऊन देशातील सहकारी क्रांतीची सुरुवात करण्यासाठी त्रिभुवादास ह्यांच्या संस्थेत प्रवेश केला.जेणेकरून  भारत जागतिक नकाशावरयेईल. ही क्रांती म्हणजेच “धवल क्रांती” होय.

कुरियन जेव्हा १९४९ मध्ये गुजरातमध्ये “आनंद” येथे आले तेव्हाते केवळ २८ वर्षांचे होते. लवकरचत्यांनी सतत काम करून ह्या उदयोन्मुख सहकारी संस्थेच्या वाढीस मदत केली. त्यांच्या मते, दुग्धशाळेचे शेतकरी हेच दूध व्यवसायाचे खरे मालक होते.

१९५५ पासून ही सहकारी संस्था आशियातील सर्वात मोठी दुग्धशाळाबनली जी दररोज २०,००० लिटरपेक्षा जास्त दूध उत्पन्न करू लागली.

आशियातील सर्वात जास्त दुधाचे वितरण करणारा  ब्रँड “अमुल” चाजन्म तेव्हाच झाला. आता आनंद एक लहान खेडेगाव न राहता देशाचे “ मिल्क कॅपिटल बनले होते.

 

HungryForever.com

 

कुरियन ह्यांना देशभर चालविलेल्या चळवळीचा प्रसार करायचा होता आणि त्याच्यासाठी दोन डॉक्युमेंटरी बनवण्याचा त्यांचा विचार होता. त्यासाठी त्यांना बेनेगलला भेटले.

तीन टप्प्यांमध्ये ‘ऑपरेशन फ्लड’ या डॉक्युमेंटरीचे काम केले गेले आणि बेनेगल ह्या चळवळी  संबंधी माहिती मिळवण्यासाठी घेण्यासाठी गुजरातभर फिरले. ह्या प्रवासादरम्यान, त्यांनी एकही मिनिट वाया घालवला नाही.

श्याम बेनेगल म्हणतात,

“मी ऑपरेशन फ्लडवर अनेक वृत्तचित्र तयार केले होते. कुरियन म्हणाले की त्यांना माझे काम आवडले आहे, पण मला पुरेसा आनंद मिळाला नव्हता मी समाधानी नव्हतो. मला असे वाटले की, आम्हाला मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे जेणेकरुन त्यांना जगातील सर्वांत मोठ्या, सर्वात यशस्वी सहकारी चळवळीबद्दल माहिती मिळेल.”

म्हणून ते या विषयावर प्रकाश टाकणारा चित्रपट तयार करण्यासाठी कुरियनकडे आले.

आणि अशाप्रकारे मंथन” चा जन्म झाला.

 

indiatoday.com

 

पण आता एक नवा प्रश्न बेनेगल ह्यांच्या पुढ्यात उभा होता. तो म्हणजे,

शेतकर्यांच्या गटावर आधारीत एखादी फिल्म ज्यात त्यांनी हि संस्था स्थापन करताना केलेला संघर्ष मांडण्यासाठी ची केलेली धडपड आहे ह्या साठी का म्हणून कोणी आर्थिक सहाय्य करेल ?

कुरियन यांनी बेनेगलना विचारले की त्यांना किती पैशांची गरज आहे,  तेव्हा बेनेगल ह्यांनी आकडा सांगितला तो होता १०-१२ लाख रुपये. आकडा मोठा होता. एवढी मोठी रक्कम जमवणे कठीण होते.

तेव्हा कुरियन ह्यांनी एक उपाय सुचवला ज्यामुळे पुढे इतिहास घडला.

त्यावेळी,  गुजरातमधील अर्ध्याहून अधिक शेतकरी कुरियनच्या सहकारी संस्थेचे सदस्य बनले होते. दुध विक्रीसाठी दूध घेऊन शेतकरी दररोज सकाळी आणि संध्याकाळी गोळा होतात. ते दूधच्या प्रत्येक पॅकेटसाठी ८ रुपये आकारत.

कुरियन यांनी सर्व सहकारी संघांना एक संदेश पाठवला आणि त्यांना विचारले की दुधाच्या एका पिशवीसाठी शेतकऱ्यांना फक्त एका सकाळीसाठी  रु. ८ ऐवजी ६ रुपये दिले तर चालतील का ? उरलेले २ रुपये देऊन ते एका चित्रपटाचे निर्माते बनू शकतील ज्यात शेतकऱ्यांच्या स्वतःच्या  संघर्षाची कहाणी सांगितली जाईल.

 

Dailymotion.com

 

प्रत्येक शेतकर्याने या प्रस्तावास मान्यता दिली आणि अशा प्रकारे ५,००००० शेतकरी फक्त रू. २ प्रत्येकी भरून ह्या चित्रपटाचे निर्माते झाले.

“मंथन” चित्रपटांनी यशस्वीरित्या आपला निर्मितीचा खर्च काढून वर थोडाफार नफाही कमावला. हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेत,  दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका तसेच चीनमध्ये परदेशात वितरित केलेल्या निवडक भारतीय चित्रपटांपैकी एक होता.

त्यानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी सोव्हिएत युनियनच्या माजी अध्यक्षांना या चित्रपटाची एक प्रत सादर केली. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये महासभा येथे न्यू यॉर्क येथे देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

१९७७ साली ह्या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आणि हिंदीमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version