३ तासात मुघलांना धूळ चारून, कोहिनूर हिरा लुटून नेणाऱ्या राजाची कहाणी, वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भूतकाळात भारतात अनेक लढाया झाल्या, त्यातील काही लढाया लक्षात राहण्यासारख्या विशेष आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत एका अश्या युद्धाबद्दल, जे फक्त तीन तास चालले.
ह्या युद्धात मुघलांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांना पराभव तर पत्करावा लागलाच, ह्याशिवाय मुघलांची “शान” असलेला कोहिनुर हिरा सुद्धा त्यांना ह्या युद्धात गमवावा लागला.
ह्या युद्धात दिल्लीवर होत्याची नव्हती अशी परिस्थिती झाली इतका संहार ह्या तीन तासांच्या युद्धामुळे झाला. मुघल सैन्याला पर्शियन सेनेने अक्षरश: धूळ चारली. ह्या युद्धात त्यांचे जवळजवळ ३० हजार सैनिक मारले गेले.
हे युद्ध म्हणजे इसवी सन १७३९ मध्ये झालेले करनाल युद्ध होय.
पर्शियन सम्राट नादिरशाह व मुघल बादशाह मुहम्मद शाह ह्यांच्यात उत्तर भारतातील करनाल ह्या गावात २४ फेब्रुवारी १७३९ रोजी हे युद्ध झाले. १७३६ साली नादिरशाह पर्शियाचा सम्राट झाला.
त्यानंतर १७३८ साली त्याने कंदहारचा ताबा घेतला आणि नंतर हिंदुकुश पर्वताच्या अलीकडे असलेल्या भारताकडे त्याची नजर गेली.
–
हे ही वाचा – उन्हाची काहिली घालवणारी कुल्फी सुद्धा थेट मोघलांच्या काळापासून अस्तित्वात आहे…
–
हा प्रदेश तेव्हा मुघलांच्या अधिपत्याखाली होता. इकडे औरंजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कमजोर पडू लागले होते. मराठ्यांनी मध्य भारत आणि उत्तर भारत काबीज केला होता.
आणि मुघल बादशहा मुहम्मदशाह संपूर्ण भारतावर आपले अधिपत्य राखण्यास कमी पडत होता. त्याचे प्रशासन भ्रष्ट आणि कमकुवत झाले होते. असे असले तरीही त्या काळी आपल्या देशात खूप संपन्नता होती.
नादीरशाहने मुहम्मदशाहला आदेश दिले होते की काबुल मधील मुघल सीमा बंद करून टाकावी कारण नादिरशाह विरुद्ध लढा देत असलेले काही अफगाणी विद्रोही लोक तेथे येऊ शकतील. पण मुघल बादशाह ने ह्याकडे दुर्लक्ष केले.
आणि काहीही कारवाई केली नाही. नादिरशाहला ह्यातून युद्धाचा संदेश गेला आणि त्याने आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या देश काबीज करण्याची नादिरशाहची इच्छा असल्याने त्याने आक्रमण केले. नादिरशाहची मोठी फौज बघून भयभीत झालेल्या मुहम्मदशाहने ८० हजारांची फौज घेतली व निजामुलमुल्क, कमरुद्दीन आणि खान ए दौरा ह्यांच्यासह नादिरशाहच्या फौजेला तोंड देण्यासाठी निघाला.
शहादत खान सुद्धा ह्यांना मिळाला. दोन्ही फौजा एकमेकांपुढे येऊन ठाकल्या. दुपारी एक वाजता हे युद्ध सुरु झाले आणि अवघ्या तीन तासांतच नादिरशाहच्या सैन्याने मुहम्मदशाहच्या जवळजवळ तीस हजार सैनिकांना ठार मारले.
ह्याच वेळी खान ए दौरां सुद्धा युद्धात मारल्या गेला आणि शहादत खान पकडला गेला आणि त्याला बंदी बनवण्यात आले.
ह्या दरम्यान निज़ामुलमुल्कने शांतिदूतांची भूमिका वठवली. मुहम्मदशाहला हरवल्यानंतर नादिरशाहने आपले सैन्य मागे घेतले आणि युद्ध शांत करण्यासाठी निज़ामुलमुल्कचे आभार मानले.
सम्राट मुहम्मदशाह निज़ामुलमुल्कवर खुश झाला आणि त्याने त्याला मीर बख्शीचे पद दिले. ख़ान-ए-दौरांच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त झाले होते. परंतु शहादत खानला मीर बख्शीचे पद हवे होते.
त्याला हे पद मिळाले नाही म्हणून चिडून त्याने नादिरशाहला धनाचे आमिष दाखवून दिल्लीवर आक्रमण करण्यास प्रवृत्त केले. धनाच्या आमिषाने नादिरशाहने दिल्लीवर २० मार्च १७३९ रोजी आक्रमण केले.
–
हे ही वाचा – मुस्लिमांना ‘यवन’ हे नाव पडण्यामागची रोचक कथा जाणून घ्या…
–
दिल्लीत पोचल्यानंतर नादिरशाहच्या नावावर “खुतबा” म्हणजे प्रशंसात्मक रचना वाचल्या गेल्या. तसेच त्याच्या नावाची नाणी सुद्धा काढली.
२२ मार्च १७३९ रोजी नादिरशाहने त्याच्या एका सैनिकाच्या हत्येच्या अफवेवरून संपूर्ण दिल्लीत नृशंस हत्येचे सत्र सुरु केले. त्याने कत्तलीचे आदेश दिले. अशा रीतीने दिल्लीचे स्वरूप होत्याचे नव्हते झाले. नादिरशाहने दिल्ली लुटली.
दिल्लीत त्या दिवशी फक्त सहा तासांत भयंकर कत्तल झाली. नादिरशाहच्या सैनिकांनी जवळजवळ २० ते ३० हजार भारतीय पुरुष, स्त्रियांची अमानुष हत्या केली. लहान मुलांनाही त्यांनी सोडले नाही.
इतकी भयंकर कत्तल झाली की लोकांचे अंत्यसंस्कार करणे सुद्धा अवघड झाले. खरोखर किती लोक ह्यात मारले गेले हा आकडा अज्ञातच आहे.
ह्याशिवाय ह्या सैन्याने त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दहा हजार स्त्रियांना व लहान मुलांना आपल्याबरोबर गुलाम म्हणून नेले.अशी माहिती त्याकाळी दिल्लीत असलेल्या डच ईस्ट इंडिया कंपनीतील एका व्यक्तीने दिली होती.
कुठलेही युद्ध झाले तरी त्यात निष्पाप स्त्रिया व निरागस लहान मुले भरडली जातात हे अतिशय जळजळीत वास्तव आहे.
नादिरशाहने दिल्लीत ५७ दिवस मुक्काम केला. परत जाताना त्याने अपार धन संपत्ती, बादशहाचे (‘तख़्त-ए-ताऊस’) मयूरसिंहासन व कोहिनुर हिरा सुद्धा आपल्याबरोबर नेला.
नादिरशाहने भारतात इतकी लूट केली की तो परत गेल्यावर तीन वर्ष त्याने आपल्या जनतेकडून कर घेतला नाही. त्यानंतर त्याने आपला मोर्चा पश्चिमेकडे ऑटोमन साम्राज्याकडे वळवला.
तर अशा प्रकारे फक्त तीन तासांत नादिरशाहने मुघल साम्राज्याचे कंबरडे मोडून त्यांचे राज्यच खिळखिळे करून टाकले.
===
हे ही वाचा – खिलजी आणि मुघल – दोघेही “मुस्लिम” शासक, पण दोघांमध्ये हे महत्वाचे ८ फरक होते!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.