Site icon InMarathi

या भारतीय फुटबॉल संघाने इंग्रजांना हरवून घेतला भारतीयांवरील अन्यायाचा बदला

football team

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खेळाविषयी भारतीयांच्या मनात असणारे प्रेम हा एक संशोधन करण्याजोगा विषय आहे. भारत पाकिस्तान मॅच असल्यावर सर्व कामधंदे सोडून टीव्हीसमोर बसणारे प्रेक्षक आजही अस्तित्वात आहेत.

यातच आपल्याकडे मागच्या काही दशकांपासून भर पडली आहे ती फुटबॉल प्रेमाची. क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलच्या चाहत्यांची संख्याही दिवसेंदिवस झपाट्याने भारतामध्ये वाढताना दिसत आहे.

ही कथा त्या काळातील आहे आहे जेव्हा आपल्यावरती परकीयांचं साम्राज्य होतं. भारताला नुकताच इंग्रजांच्या जाचक आणि दमणशास्त्राची जाणीव होऊ लागली होती.

एका अर्थाने एकोणिसाव्या शतकातील या प्रारंभीच्या काळामध्येच स्वातंत्र्याबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ठिणगी पेटायला सुरूवात झाली होती.

 

theguardian.com

 

सशस्त्र क्रांतीची सुरुवातही याच कालखंडामध्ये झाली आणि लोकमान्य टिळक, लाला लजपत राय व बिपिन चंद्र पाल काँग्रेसचं नेतृत्व करत होते. स्वातंत्र्यासाठी जनमाणसांमध्ये प्रबोधनाचं बीज पेरत होते.

यातूनच प्रत्येक सामान्य माणसाने स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढण्याची तयारी दाखवली होती. मग यात कोणीच मागे नव्हते. शेतकरी, मजूर आणि अगदी खेळाडूसुद्धा!

ही कथा अशाच काही खेळाडूंची आहे. ज्यांनी आपल्या देशबांधवांच्या व्यथांचा प्रतिशोध घेण्यासाठी अत्यंत कमी सोयीसुविधा उपलब्ध असतानाही नेत्रदीपक असा विजय प्राप्त केला आणि इतिहासातून पुढच्या अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श घालून दिला.

१९११ मध्ये मोहन बागान या फुटबॉल पटूने अनवाणी पायाने शेवटच्या पाच मिनिटांमध्ये दोन गोल केले होते. हा खेळाडू ईस्टन याँर्कशीप रेजिमेंट विरुद्ध खेळत होता.

 

premier-inmarathi

 

या मॅच सोबतच या खेळाडूने अशी दैदीप्यमान खेळी केली की त्याचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर करण्यात आलं. फुटबॉलचे त्या काळातील ६०,००० भारतीय प्रशंसक ती मॅच बघताना आनंदाने भारावून गेले होते. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती झळकत होता.

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील विविध वर्तमानपत्रांमध्ये मोहन बागान यांच्या या ऐतिहासिक खेळाविषयी छापलं जाऊ लागलं. त्यांचं नाव सन्मानाने घेतंलं जाऊ लागलं.

मोहन बागान यांच्याविषयी लिहिताना एका वर्तमानपत्राने असे लिहिले की,

“मोहन बागान हे फक्त फुटबॉल खेळाडू नसून, त्यांच्यामुळे आज देश गर्वाने आपली मान उंचावताना दिसून येत आहे.”

त्यांच्या स्मरणार्थ मोहन बागान एथलेटिक क्लब ची स्थापना १५ ऑगस्ट १८८९ रोजी करण्यात आली.

 

penguinindia.com

 

हा क्लब भारताचा राष्ट्रीय क्लब म्हणून ओळखला जातो. एवढेच नव्हे तर हा क्लब आशिया खंडातील सर्वात जुना क्लब म्हणूनही ओळखला जातो.

हा क्लब स्थापनेपासूनच यशस्वी ठरत आला आहे. १९११ मध्ये IFA कडून या संघाला खेळण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं होत.

मग काय, या टीमने जनसामान्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच खेळण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांच्या फुटबॉल खेळातून त्यांच्यामधील विद्रोह दाखविण्याचा निर्धार केला.

कोलकत्ता मधील या ऐतिहासिक खेळाला बघण्यासाठी लोक खूप लांबून आले होते. एवढंच नव्हे तर, ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय फुटबॉल चाहत्यांना आणण्यासाठी एका विशेष रेल्वेची मागणीही याच संघातर्फे करण्यात आली होती.

 

bagan.com

 

अनवाणी पायाने खेळणाऱ्या मोहन बागान यांच्यासोबत ११ खेळाडूही अनवाणीच खेळत होते आणि त्यांचा सामना ईस्ट याँर्कशीप सारख्या सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त असलेल्या संघासोबत होत होता.

पण मोहन बागान यांच्यासोबतच्या संघाला या गोष्टीचा कुठलाही फरक पडला नाही.

सुरुवात मोहन बागान संघासाठी चांगली नव्हती, पण हळूहळू संघाने खेळा मध्ये गती साधली आणि इंग्रजांच्या संघासोबत त्यांनी बरोबरी साधली होती.

मग या संघाचे नशीबच चमकले. अभिलाष घोषने शेवटचा गोल करत या संघाला विजय प्राप्त करून दिला आणि याच पद्धतीने या संघाने देशाला ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिला.

 

Wikipedia

 

हा क्षण सर्व देशवासीयांसाठी अजरामर बनवला आणि स्वातंत्र्यानंतर खेळामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मोहन बागान रत्न क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले गेले.

एवढेच नव्हे तर या संघाच्या यशाच्या स्मरणार्थ बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अरुप रॉय यांनी २०११ मध्ये The immortal 11 या नावाने चित्रपटही प्रर्दशीत केला होता.

भारतीयांच्या असंतोषाचे प्रतिक म्हणून जजो विजय गौरवला गेला तो सामना आणि ते खेळाडू सदैव स्मरणात राहतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version