आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अमेरिकेतील एका चर्चचा अध्यक्ष असलेल्या डेनिस राडर या एका व्यक्तीने तब्बल ३० वर्षे आपली दहशतवादी वाटचाल सुरू ठेवत दहा लोकांचा बळी घेतला व तो ‘बीटीके किलर’ या नावाने प्रसिध्दीस आला.
एक सर्वसामान्य सोज्वळ व्यक्तिमत्त्व असलेल्या डेनिसने हे दहशतवादी कृत्य कसे व का केले, याबाबत आपण या लेखात अधिक माहिती जाणून घेऊ.
डेनिस राडर हा तसा एक प्रेमळ व्यक्ती. तो चांगला पती व वडील देखील होता. डेनिसचा जन्म ९ मार्च १९४५ ला कॅनडातील पिटस्बर्ग येथे झाला. विल्यम एल्विन राडर आणि डोरोथा मे कुक यांच्या चार मुलांमध्ये डेनिस मोठा होता. तो एका नम्र परिवारात लहानाचा मोठा झाला.
तो एका स्थानिक क्युब स्काउटचा प्रमुख व एका चर्चचा नेता होता.
पण डेनिस हा दुहेरी आयुष्य जगणारा व्यक्ती ठरला. एकिकडे तो एक प्रेमळ व्यक्ती होता पण दुसरीकडे डेनिसची एक बाजू होती जी त्याला अस्वस्थ करणारी होती, त्या बाजूला त्याने ‘फॅक्टर एक्स’ म्हटले आहे व हीच बाजू त्याला दहशतवादी म्हणून ओळख देणारी ठरली.
डेनिस राडर हा १९६० च्या दशकाच्या मध्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून वायुसेनेत भरती झाला. त्यानंतर त्याने १९७१ मध्ये विचिता येथे येऊन पाॅला नावाच्या मुलीशी विवाह केला. पण वायुसेनेतील नोकरी सोडून त्याने एका कंपनीत आऊटडोअर सप्लायरचे काम केले.
त्यानंतर १९७४ मध्ये तो एका सुरक्षा सेवा कंपनीत काही काळ कार्यरत होता.
जानेवारी १९४७ पासून डेनिस “बीटीके किलींग”कडे वळला. त्याची लैंगिक इच्छा हेच त्याच्या या हत्याकांडाचे प्रमुख कारण ठरले, त्याने १५ जानेवारी १९७४ ला ओटेरो हे कुटूंब हत्या करण्यासाठी निवडले.
त्यांच्या घरात प्रवेश करून त्याने ओटेरो कुटूंबातील आई-वडील व दोन मुलांना ठार केले. त्यात जोसेफिन व जुली आणि त्यांची मुलगी जोसी व मुलगा जोसेफ यांना त्याने ठार केले व मुलगी जोसी हिच्या मृत्यूवेळी तिची अंतर्वस्त्रे काढून टाकत हस्तमैथुन केले तसेच त्या दृष्याचे छायाचित्रही काढून घेतले.
या घटनेमुळे आपल्याला लैंगिक सुख प्राप्त झाले, असे डेनिस म्हणाला होता.
त्यानंतर काही महिन्यातच त्याने आणखी दोन बळी घेतले. एका महाविद्यालयाच्या इमारतीत त्याने कॅथ्रीन ब्राईट या तरूणाला डांबून ठेवले व संपवले.
त्यानंतर त्याने स्वतःचा भाउ केव्हीनवर देखील गोळीबार केला. राडर हा आपल्या गुन्हेगारी कृत्यांबदृल बाहेर बोलू लागला होता. विचिता येथील एका सार्वजनिक वाचनालयात अभियांत्रिकीच्या पुस्तकात त्याने ओटेरो कुटूंबाच्या हत्येबाबत लिहून ठेवलेली टिप्पणेही समोर आली होती.
डेनिस राडर ने बीटीके या तीन अक्षरांचा उलगडा केला होता ती म्हणजे ‘बाईंड, टाॅर्चर अॅण्ड किल’. त्यावेळी राडरची गरोदर असलेली पत्नी पाॅलाला बीटीके किलींगची कुणकुण लागली होती.
पण त्यानंतर काही काळ नोकरी व बाळाच्या आगमनाने शांततेत गेला तोच १९७७ मध्ये राडरने सातवा बळी घेतला.
शर्ली व्हियान नावाच्या महिलेला मारहाण करून तसेच तिच्यावर बलात्कार करून तिचा खुन करण्यात आला. त्यावेळी तेथे सापडलेल्या एका मसुद्यात ‘तु कुशनवर झोप आणि आपल्या मृत्यूबाबत विचार कर’ असा संदेश राडरने शर्लीला आधीच दिल्याचे समोर आले.
या सिरीयल किलींगची वृत्तपत्रांवर छाप पडली होती व त्यामुळे या प्रकरणाला वृत्तपत्रांकडून मोठया प्रमाणात प्रसिध्दी दिली जात होती.
ती वाचल्यानंतर पाॅलाच्या लक्षात आले की बीटीकेने पोलिसांना लिहिलेल्या पत्रांमधील मजकूर व संदर्भ हे आपल्या पतीकडून मिळणाऱ्या संदर्भांशी मिळतेजुळते होते. त्यावेळी ती राडरला म्हणाली की
“तुम्ही बीटीकेसारखेच शब्दलेखन करता”. पण राडरने घरी आणून ठेवलेल्या एका गुढ पेटीबद्दल मात्र पाॅलाने कधीही विचारले नाही. त्या पेटीत राडरने केलेल्या गुन्हेगारी कृत्यांमधील मृत स्त्रियांची अंर्तवस्त्रे, छायाचित्रे ठेवली होती.
“मी घेतलेल्या बळींची अंतवस्त्रे शोधून ठेवत होतो”, असे राडरने एका मुलाखतीत सांगितले होते. तरी देखील त्याची पत्नी पोलिसांना सांगत असे की राडर हा चांगला माणूस व महान पिता होता, तो कुणालाही दुखवू शकत नाही.
डॅनिस राडरने केलेल्या कृत्यांची शंका कधीही आपल्या मुलांना येऊ दिली नाही. पण आपल्या वडीलांच्या चेहऱ्यावर तीव्र राग दिसायचा असे त्याची मुलगी केरी राॅसन ही सांगते.
राडरने आठवा बळी घेतला तो ५३ वर्षीय मरीन हेगे यांचा होता. त्याने तिला मारहाण केली, ठार केले व ‘काळजी करू नकोस’, असे स्वतःचेच सांत्वन केले होते.
पण खुनाचे प्रकरण न्यायदंडापर्यंत पोहचले होते. १९८६ मध्ये राडरने नववा बळी घेतला. विक्की वेगेरेल हा २८ वर्षीय तरूण त्याचा शिकार झाला होता. त्यानंतर मात्र राडर पुन्हा एकदा आपल्या घरगुती जीवनात व्यस्त झाला.
दुसरीकडे या खुन प्रकरणांचा तपास सुरू होता. १९९१ मध्ये पार्क सिटीच्या विचिता उपनगरासाठी अनुपालन पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास त्याने सुरूवात केली, तो एक कर्तव्यदक्ष अधिकारी होता. पण त्याचवर्षी त्याने दहावा व अंतिम खुन केला.
३२ वर्षांच्या आजी डोलोरस डेव्हीस यांना त्याने संपविले. त्यानंतर त्याने एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जगत असतांना स्थानिक वर्तमानपत्रात एक कथा लिहिली जी ओटेरो खुनाला ३० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लिहीली होती.
शिवाय त्याने पोलीस व माध्यमांना सुमारे एक डझन पत्रे व काही संदर्भ पाठविले होते जे नंतर बीटीकेसाठी आत्मचरित्रात्मक कादंबरीसाठी उपयोगी आले. अखेर राडरवरील खुनाचे गुन्हे सिध्द झाल्यामुळे त्याला २५ फेब्रुवारी २००५ ला स्वतःच्या कुटूंबासमोर नेण्यात आले.
त्यावेळी त्याने आपल्या मुलीला अखेरचे आलिंगन दिले व आता सर्व संपेल असे आश्वासनही दिले.
राडरने न्यायालयात सर्व १० गुन्हे कबुल केल्याने त्याला १७५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. डेनिस राडरने केलेले कृत्य सिध्द होऊन जगासमोर आल्यानंतर त्याची पत्नी पाॅलाने त्याच्या घरी पुन्हा पाऊल ठेवण्यास नकार दिला व त्याला घटस्फोट दिला.
त्यानंतर माध्यमांनी राडरच्या कुटूंबाकडे जाउन अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याची मुलगी केरी हिने “ए सिरीयल किलर्स डाॅटर” या नावाने पुस्तक लिहिले व आपल्या भावना व्यक्त केल्या.
जेव्हा आपण “बीटीके किलर”ची माहिती घेतली तेव्हा कळले की तो आपला बाप होता ज्याने नेहमीच आपली काळजी केली, असे त्यात तिने म्हटले होते.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.