' रेहमानच्या मुलीचा हिजाब घातलेला फोटो – शिक्षणाने देखील मुस्लीम कट्टरता कमी होत नाही का? – InMarathi

रेहमानच्या मुलीचा हिजाब घातलेला फोटो – शिक्षणाने देखील मुस्लीम कट्टरता कमी होत नाही का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतातील गैर मुसलमान जनतेचा साधारण पणे असा समज आहे की जे सुशिक्षित मुसलमान असतात ते कट्टर नसतात. तळागाळातल्या गरीब मुस्लिम जनतेला शिक्षण मिळत नाही त्यामुळे ते अजूनही त्यांच्या जुन्या रूढी आणि परंपरांमध्ये अडकले आहेत.

त्यांना शिक्षण मिळत नाही म्हणून ते अजूनही प्रचंड कट्टरतेने आपल्या धर्माचे पालन करतात.

पण खरेच असे आहे का? कितीतरी सुशिक्षित घरांतल्या स्त्रिया हिजाब घालतात. नियमितपणे कट्टरपणे रोजे ठेवतात. त्यांच्या धर्मातल्या सर्व रुढींचे, नियमांचे शिस्तीत पालन करतात.

फार कमी असे मुस्लिम लोक आहेत जे त्या धर्मातील नियम मानत नाहीत किंवा त्यांचा उघडपणे विरोध करतात. परंतु आजही बहुसंख्य मुस्लिम घरांत आजही त्यांच्या आहारविहाराचे, नियमांचे कट्टरपणे पालन होताना दिसून येते.

 

muslim-women-inmarathi

 

ए आर रहमान ह्यांचा व त्यांच्या मुलीचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. त्या फोटोत रहमान व त्यांची मुलगी एका मंचावर माईक घेऊन उभे आहेत व काहीतरी चर्चा करताना दिसत आहेत.

ऑस्कर विजेत्या स्लमडॉग मिलियनेर हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्ष झाली. मुंबईतल्या धारावी ह्या सर्वात मोठ्या झोपडपट्टी बहुल भागात ह्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते.

त्याच धारावीमध्ये चित्रपटाला दहा वर्षे झाल्याबद्दल एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला अनिल कपूर, गीतकार गुलझार, महालक्ष्मी अय्यर, सुखविंदर सिंग, इला अरुण ह्यांनी हजेरी लावली होती.

चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी हा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ह्या कार्यक्रमात घडलेली एक खास गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाला संगीत देणारे आणि त्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारे ए आर रहमान सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांची मुलगी सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित होती.

एआर रहमान ह्यांची सर्वात मोठी मुलगी खतिजा ह्या कार्यक्रमाला उपस्थित होती आणि तिने तिच्या वडिलांची ह्या कार्यक्रमात मुलाखत घेतली. आणि ह्या मुलाखतीचाच फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे.

 

glen-inmarathi

 

मुख्य म्हणजे त्या फोटोत खतिजा संपूर्णपणे बुरख्यात आहे. म्हणजेच ए आर रहमान सारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तीच्या घरी सुद्धा इस्लामच्या नियमांचे कट्टरपणे पालन केले जाते, तिथे शिक्षणाचा संबंध नाही.

हा फोटो बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात भर म्हणजे रहमान ह्यांनी त्यांच्या मुलीच्या हिजाब घालण्याचे समर्थनच केले.

ह्या मुळे एका नव्या वादाला तोंड फुटले. रहमानकडून अशी जुन्या प्रथांची अपेक्षा नसताना,

“हिजाब घालणे हा निर्णय घेण्याचा अधिकार मुलीला आहे, प्रथा पाळणे किंवा न पाळणे हा मुलीचा निर्णय आहे” असे त्याने हिजाबचे समर्थन केले.

कितीतरी बोहरा मुस्लिम घरांत आजही मुलांची सुंता केली जाते. मुसलमान व्यक्ती कितीही उच्च शिक्षित असली तरीही तिच्या मनात स्वतःच्या धर्माविषयी प्रचंड आदर असतो आणि त्या धर्माने घालून दिलेले नियम मोडायला तो धजावत नाही.

किंबहुना त्या नियमांचाच आदर करून स्वखुशीने ही माणसे ते नियम कट्टरपणे पाळतात. त्यामुळे ह्या लोकांचा कट्टरपणा कमी होण्यासाठी त्यांना शिक्षण देणे हा इतकाच उपाय नाही.

 

muslim-women-india-marathipizza

 

जिथे ए आर रहमानसारखी मोठी व्यक्ती सुद्धा कितीही जुनाट असलेली हिजाबची परंपरा कट्टरपणे पाळण्याचे समर्थन करते तिथे ही कट्टरता बोथट करण्यासाठी मुळातूनच प्रयत्न होणे गरजेचे आहे.

खरे तर भारतीय मुस्लिम आणि इस्लामबहूल देशातले मुस्लिम ह्यांच्यात खूप फरक आहे. जगात कुठेही नसलेल्या पीर आणि मझार वर केवळ आपल्याच देशात हार आणि चादर चढवण्यात येतात.

मुळात इस्लाम धर्मात एकेश्वरवाद मानला जातो आणि इस्लाममध्ये व्यक्तिपूजा किंवा मूर्तिपूजा निषिद्ध आहे. त्यामुळे बाहेरच्या जगात कुठेही पीर आणि मझार मानणारे मुस्लिम नाहीत. पण हे सगळे भारतीय मुस्लिम अत्यंत श्रद्धेने करतात. मूर्तिपूजा ही हिंदू धर्मातील पद्धत आहे.

भारतातील मुसलमान हा जगातील इतर ठिकाणी चालणारी कट्टरता आणि देशात चालणाऱ्या पद्धती ह्यात कुठेतरी अडकला आहे.

त्यामुळे त्यांना जर त्यांची कट्टरता सोडून समाजातील मूळ प्रवाहात सामील करून घ्यायचे असेल तर त्यांना उच्चशिक्षण देणे हा इतकाच उपाय करून काही उपयोग होणार नाही.

त्याबरोबर त्यांना हिंदूंबरोबर अधिकाधीक मिसळण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.

 

muslimindia1-inmarathi

 

त्यांना त्यांच्या पारंपरिक मदरसा आणि उर्दू शाळांतून शिक्षण घेण्याऐवजी इंग्लिश किंवा हिंदी माध्यम असलेल्या शाळांतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करायला हवे. उर्दू शाळांमध्ये केवळ मुसलमान मुले-मुलीच जातात. इतर धर्मातील लोक त्या शाळांत सहसा आपल्या मुलांना पाठवत नाहीत.

त्यामुळे अश्या शाळा जिथे सर्व धर्मातील मुले शिकत असतील तिथे ही मुले लहानपणापासूनच शिकली तर त्यांचा कट्टरपणा कमी होऊ शकेल. त्यांना इतर धर्मातील मुलांबरोबर मिसळण्याची संधी मिळेल.

शिक्षण हा मुस्लिमांची कट्टरता कमी करण्यासाठी योग्य असलेल्या काही उपायांपैकी एक असून तो केवळ एकमेव उपाय नाही, फक्त शिक्षण देऊन मुलतत्ववाद कमी होणार नाही हे मुळात आधी समजून घेण्याची गरज आहे.

जावेद अख्तर, नसिरुद्दीन शाह यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद वगळले तर त्यातले तथ्य आपल्या दिसून येते.

एकदा हे वास्तव मान्य केले की त्यानंतर हा कट्टरवाद कसा संपवायचा या चर्चेकडे वळता येईल. पण हे मान्य न करता आपण मुळ समस्याच नाकारतो आहोत ज्याने मुस्लिमांच्याच प्रगतीत बाधा येणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?