' भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न बनलेल्या ‘अम्बेसिडर’ कारची रोचक कथा – InMarathi

भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं स्वप्न बनलेल्या ‘अम्बेसिडर’ कारची रोचक कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदुस्तान मोटर्सची अम्बेसेडर आठवते का ?

अनेक वर्षे आपण ही गाडी भारताच्या रस्त्यांवर पहिली आहे, संस्थानिक मंडळीह ह्याच गाडीने प्रवास कारण पसंत करीत. सधन कुटुंबात दिसून येणाऱ्या ह्या गाडीचा वापर राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी ह्यांनी जास्त केला.

त्यामुळे त्याकाळी शासनाची गाडी म्हणजे अम्बेसिडर असे एकूण गणित होते. आजही आपल्याला राजकारणावर आधारित चित्रपटात ही गाडी दिसून येते.

तर भारतात आपली कारची पहिली आठवण म्हणजे हिंदुस्थान मोटर्सची अम्बेसिडर कार किंवा प्रीमियर पद्मिनी. किंवा मारुती सुझुकी ८००. 

दरम्यान या  तीन भागांच्या सीरिजमध्ये असणारी ही गाडी वेगळी पडत गेली असली तरी एकेकाळी तिने कसा काळ गाजवला ते पाहूया.

 

hindustan-inmarathi

हिंदुस्थान मोटर्स इंडिया द्वारे उत्पादित पहिले उत्पादन होते हिंदुस्थान अम्बेसेडर कार. ह्या कारचा उत्पादन कार्यकाल होता १९५८ ते २०१४. ह्या दरम्यान या कारमध्ये बरेच बदल आणि सुधारणा करण्यात आल्या.

अम्बेसेडर कारचं मॉडेल मोरिस ऑक्सफोर्ड सीरीझ च्या तिसऱ्या मॉडेलवर आधारित होतं, जे १९५६ ते १९५९ या काळात प्रथम इंग्लंडच्या ऑक्सफर्डमधील काउले येथे मोरिस मोटर्स लिमिटेडने तयार केलं होतं.

ब्रिटिशांनी बनवली असली तरी ह्या गाडीला भारतीय कार मानल जातं आणि भारतीय रस्त्यांची राणी अशी तिची ओळख आहे.

हिंदुस्तान मोटर्स लिमिटेड (एचएम), हा बिर्ला ग्रुपचा भाग होता, ती भारताची अग्रगण्य कार निर्मिती कंपनी आणि नंतर सीके बिर्ला ग्रुपची प्रमुख कंपनी होती. 1 9 42 मध्ये बीएम बिर्ला यांनी भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ही संस्था स्थापन केली होती.

स्वदेशी ऑटोमोबाईल उद्योगाचा प्रचार करण्याच्या १९५४ सालच्या सरकारी धोरणाअंतर्गत तेव्हाच्या सरकारने काही कार्स तयार केल्या. त्यापैकी एक गाडी म्हणजे ही अम्बेसिडर होय.

 

ambassador-inmarathi

त्या काळच्या प्रीमियर पद्मिनी आणि स्टँडर्ड १० सारख्या प्रतिस्पर्धी गाड्यांच्या तुलनेत आकाराने मोठी असलेल्या अम्बेसिडर कारचे बाजारात विशेष प्रभुत्व होते.

परंतु ८० च्या दशकाच्या मध्यात मारुती सुझुकीने आधुनिक डिझाइनची ८०० हॅटबॅक आणली तेव्हा हिचे वर्चस्व कमी झाले.

नंतर १९९० च्या दशकाच्या मध्यात ग्लोबल ऑटोमेकर्सने भारतात आपल्या कामची सुरुवात केली आणि त्यावेळच्या आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानासह नवे मॉडेलची बाजारात आणावे अशी ऑफर दिली.

मध्यंतरी कार विश्वात आणखी बदल झाले परंतु अम्बेसिडरने आपल्या मॉडेल मध्ये जास्त सुधारणा केल्या नाहीत आणि उत्पादन तसेच सुरु ठेवले.

कलकत्ता आणि चेन्नई इथला हिंदुस्थान मोटर्सच्या शाखा मागणी कमी झाल्याने आर्थिक अडचणीत आल्या आणि बंद पडल्या. पण भारतातील काही शहरात टॅक्सी म्हणून अम्बेसिडर कार अजूनही वापरात आहे.

भारतीय कंपनी हिंदुस्तान मोटर्सने ब्रिटीशांद्वारे आयात केल्या गेलेल्या ह्या गाडीचा मॉरिस ऑक्सफोर्ड सीरीझ थ्री हा पुनर्जन्म घडवून आणला. १९५८ सालापासून पश्चिम बंगालच्या हिंदुस्तान मोटर्स उत्तरपारा कारखान्यात या गाडीची निर्मिती सुरू झाली आणि २०१४ पर्यंत चालू राहिली.

शेवटच्या काही वर्षांत ज्या भारतीय जनतेने आपले आयुष्य ह्या गाडीच्या सहवासात घालवले त्यांनी गाडीला चांगले दिवस आणले होते.

जे अम्बेसिडरच्या साथीने गाडी शिकले आणि टॅक्सी कॅबच्या कामात स्थिरावले त्यांना आता जपानी मॉडेलच्या आयात केलेल्या गाड्या खुणावत होत्या.

इतकं की सरकारी बाबुंनीही आपला मोर्चा ह्या गाडीकडे वळवला. आजही त्यांच्यातल्या काहींकडे छतावर बिकंस बसवलेल्या आणि खिडकीला पडदे लावलेल्या ह्या गाड्या आहेत.

रिझर्व्ह बँक नोट मुद्रण विभागात काम केलेले सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मंजुनाथ जानकीराम ह्यांचे म्हणणे आहे की, जरी निवृत्त झाल्यापासून ते आपल्या क्लासिक मर्सिडीज बेंज ई २५० डी मध्ये प्रवास करत असलो तरी मी आजही अम्बेसिडर कारच्या प्रेमात आहे. ह्या गाडीला माझ्या मानत खास स्थान आहे.

जानकीराम ह्यांना आपल्या वडिलांकडून १९६४ मार्क II अम्बेसिडर चा वारसा मिळाला, नंतर त्यांनी तिला आपल्या आवडत्या रंगात संगवून घेतेले.

 

ambessador-inmarathi

जानकीरामन आपली एक सुंदर आठवण सांगताना म्हणतात की, ‘

विद्यापीठाचा विद्यार्थी असतान मी एका प्रोजेक्ट साठी कारची इंधन वापरण्याची कर्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीने मी ह्या गाडीवर काही प्रयोग करून तिचे परीक्षण केले होते.”

जेव्हा त्यांनी ही आपली अम्बेसिडर विकली तेव्हा भावनावेगाने आपल्या काळजाचा ठोकाच चुकला असे ते सांगतात.

ह्या गाडीने त्याना अगदी व्यवस्थित सेवा दिली, कधीही ऐनवेळी अडून त्याना त्रास दिला नाही. आणि बरेचदा वाईट प्रसंगांतून वाचवलेही.

ते पुढे सांगतात, “एकदा आंध्रप्रदेशमधील कुर्नूल येथे रात्री बारा वाजता गाडीचा फॅनबेल्ट तुटला, आजूबाजूला काहीही नव्हते, फक्त एक ट्रॅक्टर स्टोअर होते, तिथे चौकशी केली ट्रॅक्टरचा बेल्ट मिळवला.

जवळच्या काही साध्या अवजारांचा वापर करून गाडी उघडून फ्लॅशलाइट च्या सहाय्याने पट्ट्याची आणि  दुरुस्ती केली. आणि पुढच्या प्रवासाला लागले, त्यात त्यांना कसलीही अडचण आली नाही.

 

ambassador_mk2inmarathi

अशी ही अँबेसिडर कितीही लाडकी असली तरी अखेर त्यांना आपल्या लाडक्या गाडीला निरोप द्यावा लागला. कारण आता त्यांचे वय झाले होते आणि पावर स्टीयरिंगची सुविधा नसल्याने त्यांना ही गाडी चालवणे कठीण झाले होते.

अशा अनेक भारतीयांच्या ह्या अँबेसिड गाडी बद्दलच्या सुखद आठवणी आजही ताज्या आहेत.

परिवर्तन संसाराचा नियमच आहे. काळाच्या ओघात जशा जशा नव्या गोष्ठी येत जातील तशा जुन्या गोष्टी मागे पडत जाणार पण भारतीयांच्या मनातलं ह्या गाडीवरचं प्रेम आणि तिचं स्थान तसंच अढळ राहील ह्यात शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?