आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय सैन्याचा इतिहासात आजवर फक्त दोनच अशे सैनिक होऊन गेले ज्यांना भारतीय सैन्याचा सर्वात मोठा “फिल्ड मार्शल” हा ‘किताब मिळाला आहे. ह्यात एक आहेत फिल्ड मार्शल के एम करिअप्पा आणि दुसरे आहेत फिल्ड मार्शल सॅम माणेकशा.
ह्या दोन विभूतीपैकी सॅम माणेकशा सर्वांना त्यांचा १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील पराक्रमामुळे परिचित आहेत पण फार थोडया लोकांना करिअप्पा यांच्याबद्दल माहिती आहे.
करिअप्पा आणि त्यांचं अद्वितीय कार्य ह्याबद्दल आपण आज जाणून घेऊया…
कोंडाडेरा मंडप्पा करिअप्पा यांचा जन्म २८ जानेवारी १८९९ ला एका ब्रिटिश दरबारी कारकून असलेल्या व्यक्ती कडे झाला. त्यांचं बालपण कुर्ग मध्ये गेलं. त्यांना लढाईच्या व युद्धाच्या कथा मध्ये विशेष रस होता. त्यांनी तेव्हाच सैन्यात नोकरी करण्याचा निर्धार केला होता.
मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजात शिकत असताना त्यांना भारतीय सैन्यात ब्रिटिशांनी भरणा चालू केला. त्यानंतर लगेचच त्यांनी त्या दृष्टीने तयारी करायला सुरुवात केली.
जेव्हा त्यांना सैन्यप्रशिक्षणासाठी महाविद्यालय सुरू होणार आहे अशी माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तत्काळ प्रवेशासाठी अर्ज केला. ७० पैकी ४२ जणांची निवड त्या महाविद्यालयात करण्यात आली त्यात करिअप्पांचा समावेश होता.
करिअप्पाचा मेहनती आणि समर्पित स्वभाव बघता त्यांचे सिनियर्स आणि इतर ब्रिटिश अधिकारी त्यांच्यावर प्रचंड खुश झाले.
पुढे त्यांनी करिअप्पांना रॉयल मिलीटरी कॉलेज, सॅण्डहर्स्ट येथे पुढील प्रशिक्षणासाठी पाठवलं. १९१९ मध्ये करिअप्पा द्वितीय श्रेणीतील सैन्य अधिकारी बनले. त्यांची पहिली पोस्टिंग म्हणून कर्नाटिक इन्फ्रन्ट्री वर तैनात करण्यात आलं.
पुढे जाऊन नेपियर रायफल आणि राजपूत लाईट इन्फ्रन्ट्रीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
१९३३ साली त्यांनी क्वेट्ट स्टाफ कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत करिअप्पा यशस्वी झाले. त्या कोर्सला प्रवेश घेणारे ते पहिले भारतीय होते.
१९४२ साली त्यांना ब्रिटिश सैन्याचा एका तुकडीची कमान देण्यात आली. ते पहिले असे भारतीय सैनिक होते ज्यांच्या खाली ब्रिटिश अधिकारी काम करायचे.
त्यानंतर तब्बल ४ वर्षानंतर १९४६ साली त्यांची ब्रिगेडियरऑफ फ्रॉन्टइयर ब्रिगेड ग्रुप ह्या पदावर बढती करण्यात आली. महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे याच काळात अय्युब खान जो पुढे जाऊन पाकिस्तानचा अध्यक्ष झाला होता तो करिअप्पांच्या ऑर्डर फॉलो करायचा !
ब्रिटिश सैन्यातील त्यांचा सेवाकाळात त्यांनी आझाद हिंद सेनेला दिलेल्या चांगल्या वागणुकी मुळे ओळखले जाऊ लागले.
त्यांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांचा तुरुंगातील वाईट अवस्थेबाबत वारंवार ब्रिटिश सरकार कडे पाठपुरावा केला. त्यांची तुरुंगातील परिस्तिथी सुधारावी म्हणून प्रयत्न केले.
इतकंच नाही तर ज्या आझाद हिंद सेनेच्या जवानांचा शिक्षा माफी साठी देखील प्रयत्न केले. त्यांचा प्रयत्नामुळे अनेक जवानांची सुटका करण्यात आली.
पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाले. करिअप्पा यांच्या इराक, सीरिया, म्यानमार आणि इराण येथील कामगिरीने ब्रिटिश शासनाने त्यांचा बहुमूल्य असा “ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर” हा पुरस्कार देऊन सन्मान केला.
त्याच वर्षी भारत हा एक स्वतंत्र देश म्हणून उभं राहत होता त्यावेळी करिअप्पा पहिले भारतीय सेनानि ठरले ज्यांनि इम्पेरियल डिफेन्स कॉलेज , कॅम्बरले, युके येथील प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले.
जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांची कडे कमांडर -इन- चीफ ऑफ वेस्टर्न कमांड ह्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
१५ जानेवारी १९४९, करिअप्पानी भारतीय सैन्याचा ताबा रॉय बुंचर कडून हाती घेतला आणि भारतीय सैन्याचा उभारणीसाठी स्वतला झोकून दिलं. त्यांनी भारतीय सैन्याचं वर्गीकरण केलं.
ब्रिगेड ऑफ गार्डस, पॅराशूट रेजिमेंट आणि टेरिटोरियल आर्मीची निर्मिती केली. एनसीसीच्या जडणघडणीत देखील करिअप्पा यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
१९४७ साली काश्मीर प्रश्नांवर युद्ध छेडले गेले होते. त्यामुळे काश्मीरमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. अश्यावेळी अन्नाचा प्रचंड तुटवडा त्या भागात निर्माण झाला होता. ह्या वेळी बारामुल्ला आणि उरी क्षेत्रातील नागरिकांनी करिअप्पांकडे अन्नाची मागणी केली.
क्षणाचाही विलंब न करता करिअप्पानी दुसऱ्या दिवशी त्या लोकांसाठी अन्नाची व्यवस्था केली.
सोबतच कश्मीर मध्ये भारतीय सैन्याचे वर्चस्व निर्माण करत तिथे आपले अधिकार क्षेत्र निर्माण केले. करिअप्पाच्या स्मरणार्थ तिथे जनतेने स्मारक उभारले आहे.
१९६५ च्या इंडो पाक युद्धात लेफ्टनंट कर्नल नंदा करिअप्पा ( करिअप्पाचे पुत्र) यांना पाकिस्तानी सैन्याने अटक केली होती. अय्युब खानने फिल्ड मार्शल करिअप्पाना फोन केला आणि म्हटले,
“जर तुम्हाला तुमचा मुलगा परत हवा असेल तर मी सांगतो त्या अटी मान्य करा, तुमच्याशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत.”
त्यावर फिल्ड मार्शल करिअप्पा ताडकन म्हणाले होते,
“तो जरी माझा मुलगा असला तरी आता त्याने देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करून माझ्याशी असलेलं नातं भारत भूमीशी जोडलं आहे. त्यामुळे त्याला तीच वागणूक द्या जी तुम्ही इतर भारतीय सैनिकांना देता आहात. जर सोडायचे असेल तर सर्वांना सोडा नाहीतर कोणालाच सोडू नका.”
१९५३ साली लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये राजदूत म्हणून काम केलं. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध सुधारण्यात त्यांनि मोलाचा वाटा उचलला होता.
त्यांचा असामान्य कामगिरीसाठी अमेरिकन सरकारकडून “ऑर्डर ऑफ चीफ कमांडर ऑफ लेजन मेरिट” हा किताब अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
त्यांनी ऑस्ट्रेलियात काम करत असताना त्या सरकारद्वारे माजी सैनिकांसाठी असलेल्या योजना भारत सरकारला पाठपुरावा करत भारतात ही सुरू करून घेतल्या होत्या.
करिअप्पांनी निवृत्तीनंतरही भारतीय सैन्याचा उभारणीत लक्ष घातले. १९६२, १९६५ , १९७१ च्या युद्धात पण त्यांनी उत्स्फूर्तपणे सैन्याचा कार्यात सहभाग नोंदवला होता.
करिअप्पा हे एक उत्तम खेळाडू हो होते, विविध शारीरिक तसेच बौद्धिक खेळात त्यांना विशेष प्राविण्य प्राप्त होते.
करिअप्पा हे उत्तम राजकीय मुत्सद्दीपण होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा विशेष दबदबा होता. त्यांचा भारतीय सैन्यातील दीर्घकालीन सेवेचा गौरव म्हणून १९८६ साली सर्वोच्च अशी पंचतारांकित फिल्ड मार्शल ही पदवी बहाल करण्यात आली.
ही पदवी मिळवणारे ते सॅम माणेकशा नंतर दुसरे भारतीय सेनानी होते. १९९४ साली दीर्घ आजारपणामुळे बंगलोर येथील निवासस्थानी त्यांचं निधन झालं.
फिल्ड मार्शल करिअप्पाचे सर्व आयुष्य हे राष्ट्राला व राष्ट्राच्या सैन्याला समर्पित होते. त्यांना देण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीचे त्यांनी अत्यंत निष्ठेने कार्यवहन केले होते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.