Site icon InMarathi

भारताच्या संविधानातील या १४ महत्त्वाच्या गोष्टी आपण इतर देशांच्या संविधानातून घेतल्या आहेत..

constitution-of-india-inmarathi

i0.wp.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारताची राज्यघटना ही सर्वार्थाने एक परिपूर्ण राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ ला करण्यात आला आणि २६ जानेवारी १९५० ला ही राज्यघटना अमलात आणण्यात आली.

भारतीय राज्यघटनेत भारताच्या संस्थनात्मक रचनेबरोबरच भारतीय व्यक्तींच्या मूलभूत अधिकार व कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे.

कायदा व सुप्रशासन व्यवस्थेसाठी अनेक नियम व तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या लोकशाही रचनेला पूर्णतः पूरक अशी आपली राज्यघटना आहे.

परंतु आपल्याला माहिती आहे का आपल्या देशाची राज्यघटना जरी स्वायत्त असली तरी आपल्या राज्यघटनेचा मूलभूत अंग असलेल्या व संसदीय लोकशाहीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टींचा स्वीकार आपण इतर देशातील व्यवस्थेतून केला आहे?

 

scienceabc.com

आपल्या देशाच्या लोकशाही व्यवस्थेत असलेल्या अनेक रचना आणि आपल्या संविधानाचा मुलभुत गाभा असलेल्या अनेक गोष्टी ह्या इतर देशातील व्यवस्थेला बघून अंगीकारण्यात आल्या आहे. होय !

अशी १४ प्रमुख संविधानिक, संसदीय व प्रशासनिक मूल्ये आहेत ज्यांचा स्वीकार भारताने इतर देशांच्या अभ्यासातुन केला आहे अथवा सरळ त्यांचाकडूनच ती तत्वे स्वीकारली आहेत. यात संविधाननिर्मात्यांनी प्रेरणा घेतली असेल.

त्या कोणत्या १४ गोष्टी आहेत ज्यांचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने परकीय राज्यघटनेतून केला?

१) मूलभूत कर्तव्ये :

 

youtube.com

भारतीय संविधानात भारतीय नागरिकांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही मूलभूत कर्तव्ये भारतीय नागरिकाला पार पाडावी लागत असतात.

ह्या मूलभूत कर्तव्यांची प्रेरणा ही रशियन राज्यघटना होती. रशियन राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार करण्यात आला आहे.

२) भारतीय संविधानाचा जाहीरनामा :

 

india.com

अर्थात Preamble , ज्यातून भारतीय राज्यघटनेचे मुलभूत स्वरूप स्पष्ट होते त्याचा स्वीकार हा अमेरिकन राज्यघटनेतून करण्यात आला आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध जाहीरनामा त्यासाठी प्रेरणा आहे.

३) निवडणूक आयोग :

 

Scroll.in

भारतातील राजकीय व्यवस्थेचे संचलन करण्यासाठी आणि निवडणूक सुव्यवस्थितपणे पार पाडत, लोकशाहीचे संचलन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.

भारतातील निवडणूक आयोगाची निर्मिती ब्रिटनच्या घटनेतून प्रेरणा घेत करण्यात आली आहे.

४) संघराज्य पद्धती :

 

AspirantForum.com

भारताच्या संघराज्य पद्धतींचा स्वीकार हा कॅनडाच्या घटनेतून करण्यात आला आहे. देशात वेगवेगळी घटकराज्ये व त्यांचे एक संयुक्तिक राष्ट्र ही संकल्पना कॅनडाच्या घटनेतून स्वीकारण्यात आली आहे.

५ )सुप्रीम कोर्ट :

हे भारतातील न्यायदान व्यवस्थेचं तसेच घटनात्मक संचलनाचं महत्वपूर्ण केंद्र आहे. भारतीय लोकशाहीचा पाया आहे.

 

www.ndtv.com

भारतीय सुप्रीम कोर्ट व त्याचा रचनेची प्रेरणा ही अमेरिकन कोर्टाच्या व न्यायव्यस्थेच्या रचनेतुन अंगिकरण्यात आली आहे.

६) पंचवार्षिक योजना :

 

examvisa.com

भारतात आधी अस्तित्वात असलेली पंचवार्षिक योजना व नियोजन आयोग जे भारताचे पंचवार्षिक धोरण ठरवायचे, आता त्याची जागा नीती आयोगाने घेतली असून १ वर्षाचे धोरण नीती आयोग ठरवत असते.पण त्या पंचवार्षिक योजनेचा स्वीकार भारताने रशियन राज्यघटनेतून केला होता.

७) निवडणूक प्रक्रिया :

 

indiatoday.com

संसदीय निवडणूक ही भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. जनप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया हाती घेतली जात असते. भारतीय निवडणूक प्रक्रियेचा स्वीकार आणि प्रेरणा ही ब्रिटिश राज्यघटनेतून करण्यात आला आहे.

८) सुप्रीम कोर्टाच्या नियमनासाठी तत्वे :

 

hindustantimes.com

सुप्रीम कोर्टाकडे अमर्याद अधिकार नसतात. ती जरी एक मोठी व्यवस्था असली तरी तिच्या संचलनाचे, अधिकारांचे नियमन केलेले असते, काही कायदे व तरतुदी असतात ज्यांचा आधारावर सुप्रीम कोर्टाचे संचलन होते.

भारतीय राज्यघटनेत सुप्रीम कोर्टाच्या नियमनासाठी जी तत्वे घालुन देण्यात आली आहेत त्यांचा स्वीकार जपानच्या घटनेचा अभ्यास करून करण्यात आला आहे.

९) आणीबाणी :

 

businessworld.in

जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात येते त्याप्रसंगी कोणत्या मुलभूत अधिकारांवर गदा आणायची, कोणत्या अधिकारांना कायम करायचे, त्याची पद्धत काय असेल, यासाठीच्या तरतुदी ज्या संविधानात केल्या गेल्या आहेत. त्यांची प्रेरणा ही जर्मन राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

१०) लोकसभा अध्यक्ष :

 

loksabhatv.com

लोकसभा स्पीकर अर्थात लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेतील महत्वपूर्ण पद आहे. लोकसभेच्या संचलनाची जबाबदारी ही लोकसभा अध्यक्षांवर असते. लोकसभा अध्यक्ष ह्या पदाची निर्मिती ब्रिटिश संसदेच्या प्रेरणेतून करण्यात आली आहे.

११) समावर्ती सूची : 

 

patsariya.com

भारतीय राज्यघटनेचा महत्वपूर्ण भाग असलेल्या समावर्ती सूचीच्या निर्मितीची प्रेरणा ही ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

१२) मुलभूत अधिकार :

 

mpscguide.com

संविधानात समाविष्ट असलेले मुलभूत अधिकार हे भारतीय नागरिकाच्या मूलभूत स्वातंत्र्यासाठी अत्यावश्यक आहेत. ह्या मूलभूत अधिकारांची प्रेरणा देखील अमेरिकन राज्यघटनेतून घेण्यात आली आहे.

१३) लिखित स्वरूपातील संविधानाची प्रेरणा :

 

 

लिखित संविधान हे भारताचे वैशिष्ट्य आहे. भारताचे संविधान हे लिखित स्वरूपात असून त्याची एकदम साचेबद्ध मांडणी करण्यात आली आहे. ह्या लिखित स्वरूपातील संविधानाची प्रेरणा ब्रिटीश संविधानातून घेण्यात आली आहे.

अश्याप्रकारे भारतीय राज्यघटनेतील अनेक मूलभूत मूल्यांचा व लोकशाही रचनेतील मूलभूत अंगांचा स्वीकार हा परकिय राज्यघटनेच्या अभ्यासातून करण्यात आला आहे. परंतू असं असून देखील भारतीय राज्यघटना ही तिचं वेगळं वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप जपून आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version