आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
सोशल मीडिया हा आता आपल्या सर्वांचाच जीव की प्राण झाला आहे. त्याचा वापर न करणारा क्वचित एखादाच सापडतो. लहानथोर सर्वांच्याच पसंतीस उतरलेला प्रकार म्हणजे इन्स्टाग्राम, फेसबुक वगैरे!
फेसबुकवर जशा गंभीर चर्चा चालतात, तशा अनेक हलक्याफुलक्या, मिश्किल गोष्टीही चालू असतात.
काही दिवसांपूर्वी आलेलं ‘मॅनेकीन चॅलेंज’ तुम्हाला आठवत असेल. त्यात एखादा क्षण सगळे जागच्या जागी स्तब्ध झाले की फोटो काढून तो अपलोड केला जायचा.
अनेक फुटबॉल टिम्सच्या खेळाडूंनी हा प्रकार फेमस केला होता. त्यानंतर आलेला असाच पण काहीसा घातक प्रकार म्हणजे ‘किक्की चॅलेंज’.
गाडीत ते गाणं लावून दरवाजा उघडून रस्त्यावर डान्स करायचा आणि त्याचा व्हिडीओ अपलोड अस काहीतरी प्रकार होता.
सध्या अशाच एका चॅलेंजने फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. ते म्हणे “#10yearschallange”.
सध्या नेटकऱ्यांमध्ये याच चॅलेंजची चर्चा असून इतरही अनेक लोक या चॅलेंजला सीरियसली घेत आहेत. आता तुम्ही गोंधळला असाल की, हे चॅलेंज नक्की आहे तरी काय? हे चॅलेंज अगदी सोपं आहे.
हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपला १० वर्षांपूर्वीचा फोटो आपल्या सध्याच्या फोटोसोबत कोलाज करून शेअर करायचा.
तुमच्यापैकी अनेक जणांनी देखील या चॅलेंजमध्ये भाग घेतला असेलच. पण तुम्हाला माहीती आहे का? या आगळ्यावेगळ्या चॅलेंजची खरी सुरुवात कुठून झाली?
खरं तर सोशल मीडियावर या चॅलेंजची अनेकांनी खिल्ली उडवलेली पाहायला मिळते. इतकचं नाही तर अनेक सेलिब्रिटीही या चॅलेंजपासून स्वतःला दूर ठेवू शकलेले नाहीत. सेलिब्रिटी पासून तरूणाईपर्यंत सगळ्यांना या चॅलेंजने वेड लावलं आहे.
पण फेसबुकच्या “#10yearsChallenge” मागचं तुम्हाला माहित नसलेलं गौडबंगाल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केट ओ’नील यांनी याआधारित एक ट्विट केलं आहे. यात असे म्हटले आहे की यामुळे नेटकऱ्यांना धोका पण पोहचू शकतो.
ते ट्विट असे आहे की,
“Me 10 years ago: probably would have played along with the profile picture aging meme going around on Facebook and Instagram
Me now: ponders how all this data could be mined to train facial recognition algorithms on age progression and age recognition”
Me 10 years ago: probably would have played along with the profile picture aging meme going around on Facebook and Instagram
Me now: ponders how all this data could be mined to train facial recognition algorithms on age progression and age recognition— Kate O’Neill (@kateo) January 12, 2019
यातून त्यांना मेमे मूळात धोकादायक असल्याचा दावा करण्याचा त्याचा हेतू नाही. तर त्या सर्वांना सावधगिरी पाळण्याची दक्षता देत आहे.
मुळात आपला वैयक्तिक डाटा यामुळे पुन्हा नव्याने बाहेर पडू शकतो. फेसबुककडे आपला आधीच बराच डाटा सेव्ह असतो.
दैनंदिन जीवनातील आपण प्रत्येक गोष्ट फेसबुकवर शेअर करत असल्याने आपले फोटो आणि इतर डाटा फेसबुक जतन करून ठेवतो.
मध्यंतरी फेसबुकवर काही गेम येत होते की आपण काही वर्षांनंतर कसे दिसू… आपण म्हातारपणी असे सू असे आपल्याला त्या गेमवर प्रोफाइल फोटोवरून आपले बदलेलं रूप दिसतं.
म्हणजे यावरून लक्षात येते की आपली सर्व फोटो आणि माहिती फेसबुक जतन करत आहे. आपण कधीपण आपले प्रोफाइल फोटो कधी सेव्ह केले आहेत हे पाहू शकतो. त्याआधारे तारीख आणि वार किंवा EXIF डाटा सर्वकाही फेसबुककडे जतन केलेला असतो.
उदाहरणार्थ, आपण एखादा फोटो अपलोड केल्यावर आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीची नावे आपोआप दिसतात.
आपल्यालाकडे हे #10YearChallenge आलेल चॅलेंज हे फेसबुकने तयार केललं नसून कोणत्यातरी माणसाने पहिल्यांदा वापरलं आणि मग व्हायरल झालं. हे एक आधीचा डाटा काढण्यासाठीचे प्रकरण असू शकते.
केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण हे सर्वांना माहिती असेल की २०१४ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून २ कोटी ७० लाख लोकांनी कोगन फेसबुक अॅप इन्स्टॉल केले.
जे अॅप पर्सनॅलिटी क्विझ असल्याचं भासवण्यात आले होते. यात क्विझ खेळून पैसे मिळत असत आणि त्यातून कंपनीला एका व्यक्तीच्या खेळण्याने १६० युजर्सचा डेटा मिळत होता, वैयक्तीक माहितीचाही अॅक्सेस कोगनला मिळत होता.
या जोरावर २ कोटी ७० लाख लोकांनी सहभाग घेत कंपनीला ५ कोटी लोकांची वैयक्तिक माहिती मिळायला मदत झाली.
माहिती मिळवलेल्या युजर्सपैकी बहुतांश लोक हे अमेरिकन होते.
त्यामुळे आपला पण चेहरा ओळखण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. यासाठी अल्गोरिदम प्रणालीचे प्रशिक्षण देखील देण्यात येऊ शकते.
संगणकाला एखादे कार्य करावयाला दयायचे असल्यास त्याने ते काम कोणत्या क्रमाने करावे जेणेकरून हवे ते उत्तर तो योग्य आणि अचूक देईल याची यादी म्हणजे अल्गोरिदम असे म्हणता येईल.
याद्वारे व्यक्तिची माहिती, फोटो, एकूण डाटा शोधण्यासाठी मदत होऊ शकते. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये पोलिसांनी चार दिवसांत जवळपास यांच्यासाहाय्याने ३००० गहाळ मुलांचा मागोवा घेतला.
त्यामुळे अल्गोरिदम असे खरोखरच उपयुक्त ठरू शकते. परंतु याचा दुरूपयोग देखील आहे.
आपण जो डेटा सोशलमिडीवर शेअर असतो, तो डेटा सेव केला जातो. जसे की जाहिराती विश्वात आपले फोटो शेअर होऊ शकतो. याआधारित प्रकरणे याआधी देखील बाहेर आली आहेत.
२०१६ मध्ये अमेरिकेच्या सिव्हील लिबर्टीज युनियनने अमेझॉनला एक सेवा विक्री थांबविण्यास सांगितली. अँमेझॉनने रीयल टाइम नावाची सेवा सुरु केली होती.
त्याद्वारे गोपनीय माहिती फोटोच्या साहाय्याने शोधणे शक्य झाले होते. पण यात गोपनीयतेची जास्त चिंता भासू लागली.
पोलीस जे गुन्हेगार नाहीत त्यांचा देखील वापर करू शकतात त्यामुळे जनतेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे जशा नाण्याच्या दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या #10yearsChallenge दोन बाजू समोर येत आहेत.
लोकांनी याचा कसा वापर करावा हे लोकांच्याच हातात आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.