Site icon InMarathi

मदर तेरेसांच्या कितीतरी पट जास्त काम करूनही अज्ञात असणारा महात्मा!

kalam and Shivkumar Swami

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक थोर मानवतावादी समाजसेवक कोण? असे विचारल्यावर मदर तेरेसा हे नाव प्रत्येकाच्या तोंडून येतं.

पण मदर तेरेसांच्या कितीतरी पट अधिक कार्य भगव्या कपड्यातील एका महान व्यक्तीचे आहे. ते एक थोर मानवतावादी समाजसेवक, आध्यात्मिक गुरु तसेच शिक्षक होते.

लिंगायत समाजाचे सर्वोच्च मठाधिपती म्हणून त्यांची ओळख होती. कर्नाटकातील राजकारणात शिवकुमार स्वामी त्यांचा बराच दबदबा होता.

 

newsstate.com

 

शिवकुमार स्वामी कोण आहेत, २१ जानेवारी २०१९ ला, त्याच्या मृत्यूनंतर लाखो लोक इतके दुःखी का आहेत?”हा प्रश्न तुम्हाला पण पडला असेल ना. पण या महात्म्याचे कार्य महान असून देखील अज्ञात राहिले.

त्यांचे कर्नाटकात ३० जिल्ह्यात ४०० पेक्षा जास्त मठ आहेत. लिंगायत समुदायाच्या या स्वामींना चालते-फिरते भगवान असं म्हटलं जात असे. कर्नाटकामध्ये लिंगायत समुदायाचा प्रभाव आहे. त्या समाजासाठी शिवकुमार स्वामी हे वंदनीय गुरू होते.

लिंगायत धर्माची स्थापना करणारे १२ व्या शतकातील संत बसवेश्वर किंवा बसवण्णा यांच्या विचारधारेनुसारच शिवकुमार यांचं वर्तन होतं, असं म्हटलं जात असे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या धर्माचे अधिकतम लोक कर्नाटक राज्यात आहेत. महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूत या धर्माचे बरेच लोक आहेत. हा एकेश्वरवादी धर्म आहे. लिंगायत धर्म: समता, बंधुभाव, नैतिक, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक! अनंतकाळचे जीवन शांतीचा मार्ग.!

जन्मामुळे मानवांना उच्च नीच असा विभाग करते ती जात. जनमल्यापासून सर्व समान आहोत अशी घोषणा करून कोणतीही जात, वर्ग,वर्णभेद न मानता जातीरहित धर्माचा आसक्ती असणात्या सर्वाना दीक्षा संस्कार मिळविता येतो असे सांगणारा तो धर्म.

 

samaja.com

या धार्मिक संस्कारामुळे व्यक्तिने मिळविलेली योग्यता, पात्रता, यामुळे तो श्रेष्ट अगर कनिष्ट मानला जातो असे सांगतो तो धर्म. यांचे लिंगायत समाजाचे गुरु म्हणजे श्री.शिवकुमार स्वामी यांची ओळख आहे.

श्री. शिवकुमार स्वामी यांचा जन्म १ एप्रिल १९०७ रोजी रामनगर जिल्ह्यातील विरापुर येथे झाला. घरची परिस्थिती तशी बेताची पण त्यांच्यावर पहिल्यापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले होते.

गंगाम्मा आणि होनगौडाच्या तेरा मुलांपैकी हे सर्वात मोठे होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण तुमकूर जिल्ह्यातील नागावल्ली या आवी इंग्रजी भाषेतील प्राथमिक शिक्षण झाले. 

१९२२६ साली ते मॅट्रिक पास झाले. त्याच काळात सिध्दगंगा मठातील एक निवासी-विद्यार्थीही होते. त्यांनी भौतिकशास्त्र आणि गणित या विषयातील अभ्यास पूर्ण केल्यानंतर कला विषयातील अभ्यास करण्यासाठी बंगलोरच्या सेंट्रल कॉलेज मध्ये गेले.

परंतु पदवी मिळविण्यास असमर्थ होते कारण त्यांना सिद्दागंगा मठाचे नेतृत्व करण्यासाठी उडना शिवयोगी स्वामीचा उत्तराधिकारी म्हणून नामांकित करण्यात आले होते.

 

twitter.com

शिन्नाना कन्नड, संस्कृत आणि इंग्रजी भाषेत त्यांची बरीच कुशलता होती. जानेवारी १९३० मध्ये श्री मरुलाध्याय सिद्दागंगा मठाचे नेतृत्व करण्यासाठी आपला मित्र आणि वारस गमावल्यानंतर शिवनांच्या जागी प्रमुख शिवयोगी स्वामी यांची निवड झाली.

शिवन्ना, त्यानंतर शिवकुमाराचे नाव बदलले, त्या वर्षी ३ मार्च रोजी औपचारिक पुढाकाराने विरक्तश्रम (भिक्षुकांच्या आदेशात) दाखल झाले आणि त्यांनी शिवकुमार स्वामी यांचे नाव धारण केले.

 जानेवारी १९४१ रोजी शिवयोगी स्वामीच्या मृत्युनंतर त्यांनी मठाचा ताबा घेतला. त्यामुळे सिध्दगंगा ह्या सर्वात जुन्या मठाचे प्रमुख म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

सर्वजण लिंगायत समाजाचे गुरु तथा कर्नाटकमधील तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख महंत डॉ. शिवकुमार स्वामी म्हणून त्यांना ओळखू लागले.

लिंगायत समाज हा प्रामुख्याने कर्नाटकामध्ये आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील त्यांचं मोठं प्रमाण आहे. कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात १८ टक्के लिंगायत आहेत.

त्यामुळे कर्नाटकमधल्या प्रभावी जातींमध्ये त्यांची गणना होते.

 

deccanchronicle.com

लिंगायतांचा राजकीय प्रभाव कसा आहे याबाबत पत्रकार इमरान कुरैशी यांनी आपल्या लेखात मांडलं आहे. ते सांगतात, सामाजिक रूपाचा विचार केला तर लिंगायत हे उत्तर कर्नाटकात प्रभावी आहेत.

८० च्या दशकात लिंगायतांनी तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडेंना समर्थन दिलं होतं. तर त्यानंतर १९८९ मध्ये वीरेंद्र पाटील यांना समर्थन दिलं होतं.

आतापर्यंत या समुदायाचे ९ मुख्यमंत्री झाले आहेत, असं द इकोनॉमिक टाइम्सनं म्हटलं आहे. त्यामुळे नेहमी राजकीय मंडळी शिवकुमार स्वामी यांना भेटण्यासाठी येत असतं. त्यांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यदेखील महान आहे.

स्वामींनी अभियांत्रिकी आणि विज्ञान, कला आणि व्यवस्थापनासाठी तसेच नॅशनल ट्रेनिंगसाठी महाविद्यालयापर्यंत शिक्षण आणि प्रशिक्षण यासाठी एकूण १३२ संस्था स्थापन केल्या. 

त्यांनी शैक्षणिक संस्थांची स्थापना केली जी संस्कृत तसेच आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पारंपरिक शिक्षणात अभ्यासक्रम देते. सर्व समुदायांनी त्यांच्या परोपकारी कार्यासाठी त्याचा व्यापक आदर केला. त्यांच्या सव्वाशेपेक्षा जास्त शैक्षणिक संस्था कर्नाटक राज्यात आहेत.

तसेच सिध्दगंगा मठाकडून नऊ हजार विद्यार्थ्यांना अन्न, शिक्षण मोफत दिलं जातं.

 

tumkarulight.com

या मठात सर्व जाती -धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जातो आणि समान सेवा दिली जाते. त्यामुळे शिवकुमार स्वामी यांचा जगभर आदर आहे. तसेच त्यांना विविध पुरस्कारानी देखील भूषविले गेले आहे.

मानवतावादी कार्याच्या सन्मानार्थ स्वामी यांना १९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचरच्या उपाधीने सन्मानित केले होते.

सन २००७ मध्ये कर्नाटक सरकारने कर्नाटक रत्न पुरस्कारासाठी राज्य सरकारचे सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरव केला.

स्वामीच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी मानवतावादी कामासाठी भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

श्री. शिवकुमार स्वामी यांच्यावर  ८ डिसेंबर २०१८ ला ऑपरेशन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या फुफुसात संसंर्ग झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी, २१ जानेवारी २०१९ ला सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

deccanchronicle.com

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शोक व्यक्त केला.

तर, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासह, कर्नाटकचे भाजपा अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा, एम. बी. पाटील, केजे जॉर्ज आणि सदानंद गौडा मठात दाखल झाले होते.

 

 

श्री. शिवकुमार स्वामी यांच्या कार्याला सलाम आणि भावपूर्ण आदरांजली !!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version