आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आज भारतात अनेक विमानतळ अस्तीत्वात आहेत.आज भारत तंत्रद्न्यानाच्या स्पर्धेत अग्रणी मानला जातो. पण तरीही एका विमानतळाच्या बांधनीबद्दल बोलतानाही सामान्य मानुस आज अभिमानाने उल्लेख करतो ते म्हनजे पाक्योंग विमान तळ.काय अस विशेष आहे या विमानतळात हे आपन या लेखात बघुयात.
२४ सप्टेंबर २०१८ रोजी भारताने त्याचा महत्त्वकांक्षी उपक्रम अस्तित्वात आणला तो म्हणजे भारताचे हिमालयीन राज्य म्हणून ओळखले जाणारे “सिक्किम” मधील पाकयोंग येथे विमानतळ उभारले.
सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे उंचावरील एका शिखरावर जे गंगटोक पासून फक्त तीस किलोमीटर डावीकडे आहे, तेथे भारताने पहिले हिमालय विमानतळ उभे केलेले आहे.
विमानतळ अधिकृतरित्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या विमानतळ बांधणीचे सर्व श्रेय “कॅबिनेट कमिटी ओन इकॉनोमिक अफेअर्स” अर्थात सीसीइएला जाते कारण एवढ्या उंचीवर विमानतळाची बांधणी करणे ही अत्यंत कठीण बाब आहे.
पूर्ण जग या विमानतळाकडे भारतीय अभियांत्रिकी शास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून बघत आहे. हे विमानतळ भारतासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. त्यामुळे या भागात पहिलं विमानतळ उभं करण्यात आलेल आहे.
या चमत्कारामुळे भारताच्या हवाई नकाशावर आज सिक्कीम हे राज्य मोठ्या दिमाखात कोरले गेले आहे.
या आधी येथे पर्यटकांसाठी तसेच येथील नागरिकांसाठी प्रवास करणे फारच कठीण होते कारण येथे येण्यासाठी कुठलीही थेट विमानसेवा किंवा रेल्वेसेवाही उपलब्ध नव्हती.
पर्यटकांना तर पश्चिम बंगाल येथील बगदोगरा विमानतळावर उतरावे लागायचे आणि तेथून त्यांना बसने किंवा कुठल्याही इतर वाहनाने प्रवास करायला लागायचा.
तो प्रवासही साधा नसे. १२४ किलोमीटरची चढाई केल्यावर पर्यटक गंगटोक जी सिक्किम ची राजधानी आहे तिथे पोहोचत असत,पण या विमानतळामुळे या सर्व गोष्टी आता खूप सुकर आणि सुखकर झालेल्या आहेत.
या विमानतळामध्ये अनेक प्रकारच्या अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे विमानतळ पूर्णपणे हिरवळ युक्त असल्याने त्याच्याकडे बघतानाही मन येथे रमून जाते.
यासोबतच येथे हवाई वाहतूक नियंत्रणासाठी काही कक्ष तयार करण्यात आलेले आहेत, प्रवाश्यांच्या सोयीसाठी इथे दोन मजली अत्याधुनिक इमारत बांधण्यात आली आहे जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.
यासोबतच येथे तीव्र दर्जाचे प्रकाश दिवे बसवण्यात आलेले आहेत ज्यामुळे विमान उतरताना काही त्रास होऊ नये आणि सर्वात महत्वाचे इथे अत्याधुनिक स्वरूपाचे पार्किंग उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. येथे ५० वाहने पार्क केली जाऊ शकतात.
या विमानतळाला १.७५ किलोमीटरचा रनवे आखून देण्यात आलेला आहे जो ३० मीटर रुंद आहे.
इथे ११६ मीटर लांब टँक्सीवे तयार करण्यात आलेला आहे त्यासोबतच इथे एकाच वेळी दोन एअरक्राफ्ट पार्क केले जाऊ शकतात एवढी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अभियांत्रिकीच्या जगातलं आश्चर्य
२००९ मध्ये पुंज लायड ग्रुप यांना या कामासाठी कॉन्ट्रॅक्ट मंजूर करून देण्यात आले. त्यावेळी याची निविदा २६४ करोड रुपये एवढी होती.
आपणा सर्वांना माहिती आहे हे विमानतळ हिमालयीन असल्यामुळे अत्यंत उंचीवर या विमानतळासाठी जागा देण्यात आली.
त्यामुळे येथे “कट अँड फील” या अभियांत्रिकीच्या शैलीचा वापर करण्यात आला आहे. ती जागा वापरण्यात आली ज्यामुळे येथील शिखराला आकार देण्यासाठी आणि येथे समतल जमीन तयार करण्यासाठी अत्यंत कठीण अशी मेहनत घ्यायला लागली.
ज्यामुळे प्रत्यक्षामध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये १०० मीटर खोल खोदण्यात आले आणि त्यानंतर त्याच्यावर ८० मीटर रुंदीचा थर भरण्यात आला. जेणेकरून ही जमीन समतल झाली.
या प्रक्रियेला “जिओ ग्रेट रेइन्फॉर्स” असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमुळे मातीची व खडकाची झीज अत्यंत कमी प्रमाणात होते.
तसेच येथे १०० मीटर खोल पर्यंत उतारावर येथील स्थानिक प्रजातीच्या फुलांची रोपे लावण्यात आली आहेत या प्रक्रियेमुळे भूस्खलनामुळे होणारे भविष्यातील नुकसान टळले जाते असा दावा केला आहे.
जिथे मोकळी जागा होती तिथे तीन मीटर उंचीचे काही झाडांची एक प्रकारे भिंत तयार करण्यात आली जेणेकरून बर्फाच्या घसरण्याचा ही भविष्यात त्रास होणार नाही.
अत्यंत बर्फ असल्यामुळे इथे कधी पुराचा ही धोका उद्भवू शकतो त्यामुळे हा धोका परतवून लावणे हा या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक होता.
त्यामुळेच इथे काही नैसर्गिक उतार तसेच ठेवण्यात आले जेणेकरून भविष्यात जर कधी बर्फ वितळल्यामुळे पुराचा धोका आलाच तर ते पाणी त्या मोकळ्या जागेत वळवता येईल.
इथे जवळपास असे अकरा “ज्होरास”म्हणजेच नैसर्गिक झरे हे विमानतळ बांधताना तसेच ठेवण्यात आलेले आहेत.
या सर्व बांधणीला “पॅरा मेस” बांधणी असे तांत्रिक भाषेत म्हटले जाते.
जिथे शिखर कोरली गेली तिथे भूस्खलन विरोधी पट्ट्या अंथरल्या गेल्या जेणेकरून एक भक्कम आधार बांधणीसाठी मिळेल आणि यामुळेच अत्यंत छान अशा प्रकारचा उतार या कठीण सीमाभागातही मिळाला. अत्यंत दुर्गम अशा प्रदेशात हे विमानतळ बांधले गेलेले आहे.
अगदी रनवे तयार करत असतानाही या पद्धतीमुळे खूप कमी कालावधी लागला.
असे म्हटले जाते की ही आत्तापर्यंतची सर्वात चांगली पद्धत आहे जेणेकरून तुम्ही एवढ्या उंचीवर अशा प्रकारचे महत्त्वकांक्षी प्रकल्प पूर्ण करू शकता.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.