आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पवित्र बायबल मधील संत मॅथ्थ्यु यांच्या शिकवणीमधील प्रसंग हा जगभरात प्रभू येशूच्या जन्माचा खरा प्रसंग मानला जातो. अभ्यासकांच्या मते संत मॅथ्थ्यु यांनी त्यांची शिकवण ख्रिस्तवर्ष ७०-८० च्या काळात लिहिली होती.
म्हणजेच प्रभू येशूच्या जीवनकाळाच्या अगदी जवळच्या काळात ही शिकवण लिहिली गेल्याने संत मॅथ्थ्यु यांनी सांगितलेली प्रभू येशूच्या जन्माची कथा आणि तारीख ही ग्राह्य धरली जाते.
परंतु अनेक इतिहासकारांचे म्हणणे आहे की प्रभू येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व १ मध्ये २५ डिसेंबर रोजी झाला नव्हता.
संत ल्युक (२.२) यांची शिकवण सांगते की राजा हेरॉडच्या आदेशाप्रमाणे रोमन कर आकारणीच्या उद्देशाने सुरु असलेल्या जनगणनेसाठी, नावे नोंदवण्याकरिता प्रभू येशूच्या माता-पित्यांनी बेथलेहेम पर्यत प्रवास केला होता.
–
- येशूचा आशीर्वाद इतरांना मिळवून देणारा, स्वतःला वाचवू शकला नाही…
- जीजसमुळे हिंदू देवांचं महत्त्व कमी होतंय का? केरळ सरकारचा ‘अजब’ सवाल… वाचा
–
ऐतिहासिक नोंदी असे दर्शवतात की त्यांनी हा प्रवास ख्रिस्तपूर्व ८ मध्ये केला होता. परंतु राजा हेरॉड मात्र ख्रिस्तपूर्व ४ मध्ये मृत पावल्याची कागदपत्रे आहेत.
दुसरीकडे बायबल नुसार प्रभू येशूच्या जन्मावेळी राजा हेरॉड जिवंत होता आणि एक ज्यू राजा गादीवर बसणार ही भविष्यवाणी कळल्यावर राजा हेरॉड घाबरला होता.
त्यामुळे त्याने बेथलेहेम आणि आसपासच्या परिसरातील २ वर्षांखालील प्रत्येक मुलाला मारून टाकण्याचा आदेश दिला. तर मग प्रभू येशूचा जन्म नेमका कधी झाला होता?
वरील माहिती प्रमाण धरली तर प्रभू येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व ४ आणि ख्रिस्तपूर्व ७ च्या दरम्यान झाला असावा असे मानण्यास हरकत नाही.
प्रभू येशूच्या जन्मकथेनुसार, प्रभू येशूच्या जन्मावेळी आकाशात एक तारा चमकला. त्याने लोकांना सूचक संकेत दिला की तुमचा ज्यू लोकांचा राजा म्हणजेच त्यांचा तारणहार जन्माला आहे आणि या ताऱ्याने त्यांना बेथलेहेमच्या दिशेने जाण्याचा संदेश दिला.
या ताऱ्याला स्टार ऑफ बेथलेहेम किंवा ख्रिसमस स्टार असे म्हणतात.
मॅथ्थ्यु २:९ म्हणतो की,
त्यांनी आकाशात पूर्व दिशेला पाहिलेला तारा त्यांच्यासमोरून पश्चिम दिशेला भरकन निघून गेला. काही वेळाने पुन्हा परत आला आणि जेथे प्रभू येशूचा जन्म झाला होता त्या जागी येऊन स्थिरावला.
आता समस्या ही आहे की हे ताऱ्याचं प्रकरण केवळ मॅथ्थ्युच्या शिकवणी मध्येच सापडतं. इतर ग्रीक, रोमन किंवा बेबीलोनियन इतिहासामध्ये किंवा उपलब्ध नोंदीमध्ये हा असला प्रकार घडल्याचं कुठेच आढळत नाही.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
ही आश्चर्याची गोष्ट आहे कारण या ताऱ्याला पाहूनच ते तीन राजे/हुशार माणसे (Biblical Magi) यांना कळले की प्रभू येशूचा जन्म झाला आहे आणि त्याला भेटण्यासाठी ते पार्थिया पासून बेथलेहेमचा प्रवास करत त्याला भेटायला आले होते.
त्यामुळे असा प्रश्न उभा राहतो की प्रभू येशूचा जन्म जर खरंच ख्रिस्तपूर्व ४ आणि ख्रिस्तपूर्व ७ च्या दरम्यान झाला होता का?
परंतु या विचाराला देखील खोटे पाडणारे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
बेथलेहेमचा तारा म्हणजे हॅले धुमकेतू होता का?
आधी सांगितल्याप्रमाणे प्रभू येशूचे माता-पिता रोमन कर आकारणीच्या उद्देशाने सुरु असलेल्या जनगणनेकरिता नावे नोंदवण्यासाठी बेथलेहेमला गेले होते.
रोमन पत्रकांतील नोंदीनुसार ख्रिस्तपूर्व १२ मध्ये राजा हेरॉड याने बेथलेहेम मध्ये एक जनगणना आयोजीत केली होती, परंतु ती रोमन कर आकारणीसाठी नव्हती तर स्थानिक कर आकारणीसाठी होती.
तसेच याच ख्रिस्तपूर्व १२ मध्ये हॅले धुमकेतू आकाशात अगदी स्पष्ट दिसला होता आणि हा धुमकेतू आकाशातून पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला होता.
जसे की बेथलेहेमचा तारा गेल्याचे येशूजन्माच्या कथेमध्ये सांगण्यात येते. म्हणजेच या धुमकेतूला लोक येशू जन्माचे संकेत देणारा तारा समजले असतील अशी शक्यता नाकारता येत नाही.
अजून एक विशेष गोष्ट म्हणजे धुमकेतूला असणाऱ्या शेपटीमुळे त्यांना वाटले असेल की हा तारा पश्चिमेकडे म्हणजेच बेथलेहेमच्या दिशेने जाण्याचे संकेत देतोय.
या तर्कावरून एक गोष्ट सहज सिद्ध होते की ते तीन राजे/हुशार माणसे (Biblical Magi) त्या हॅले धुमकेतूला पाहून, त्याला दैवी संकेत समजून पश्चिमेच्या दिशेने बेथलेहेम मध्ये आले असतील.
–
- ओवाळणार नाही फक्त राखी बांधेन, ख्रिश्चन धर्म परिवर्तनाचा खेदजनक अनुभव वाचा!
- ख्रिसमस ट्री सजवताना, विवीध वस्तूंचा वापर का केला जातो? जाणून घ्या!
–
ही सगळी मांडणी ग्राह्य धरली तर प्रभू येशूचा जन्म ख्रिस्तपूर्व १२ मध्ये झाला असे मानावे लागेल.
जेव्हा प्रभू येशू यांचे देहांत झाले तेव्हा ते किती वर्षांचे होते?
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोमन आणि नवीन मृत्युपत्रातील नोंदी असे दर्शवतात की रोमन लोकांनी प्रभू येशूला ख्रिस्तवर्ष ३४ नाही तर ख्रिस्तवर्ष ३६ च्या कालखंडात वधस्तंभावर खिळे ठोकून चढवले होते.
अनेक जण असे मानतात की जेव्हा प्रभू येशूला वधस्तंभावर खिळे ठोकून चढवण्यात आले तेव्हा त्यांचे वय जास्त नव्हते. ते अगदीचं तरुण होते.
परंतु पुरावे म्हणतात की ते वृद्ध होते, कारण प्राचीन ज्यू संस्कृतीनुसार धर्माची शिकवण देणारा व्यक्ती हा किमान ५० वर्षे वयाचा असावा.
ख्रिस्तवर्ष २ ऱ्या शतकामध्ये बिशप इरेनेयस सांगतात की मी जेव्हा धर्माची शिकवण घेत होतो तेव्हा प्रभू येशू जवळपास ५० वर्षांचे होते.
इथे बिशप इरेनेयस यांचे म्हणणे योग्य वाटते कारण बिशप इरेनेयस हे त्या लोकांच्या छत्रछायेत शिकत होते जे खरोखर प्रभू येशूला ओळखत होते.
संत जॉन (८:५७) यांची शिकवण सांगते की प्रभू येशू अजून ५० वर्षांचे झालेले नाहीत. संत जॉन (२:२०) यांच्या शिकवणीच्या दुसऱ्या एका भागामध्ये असे विधान आहे की प्रभू येशू स्वत:च्या वयाची तुलना जेरुसलेमच्या मंदिराशी करतात.
ते मंदिर तेव्हा ४६ वर्षे जुने होते. म्हणजेच प्रभू येशूचे वय देखील तेवढेच असायला हवे.
या मंदिराची उभारणी राजा हेरॉड याने ख्रिस्तपूर्व १२ मध्ये केली होती याचा अर्थ हा की ख्रिस्तवर्ष ३४ मध्ये प्रभू येशू नक्कीच ४६ वर्षांचे असले पाहिजेत, जेव्हा त्यांनी स्वत:च्या वयाची तुलना मंदिराच्या वयाशी केली होती.
यावरून असे दिसते की त्यांचे वय ४८ वर्षे असताना ख्रिस्तवर्ष ३६ मध्ये त्यांना वधस्तंभावर खिळे ठोकून चढवण्यात आले होते.
(इथे ख्रिश्चन धर्मीय वा बायबल यांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसून उपलब्ध माहितीच्या आधारे नाण्याची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा !)
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.