Site icon InMarathi

इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताकदिनी “शौर्य पुरस्कार” दिले जाणार नाहीत! कारण वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कठीण प्रसंगाच्या वेळी समयसूचकता दाखवत आपल्या अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन करणाऱ्या निवडक मुलांना दरवर्षी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या आधीच्या दिवशी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

पण या वर्षीच्या पुरस्कारासाठी निवड झालेली धाडसी मुले ह्यावर्षी प्रहासात्तक दिनी दिल्या जाणाऱ्या शौर्य पुरस्काराचे मानकरी असूनही ह्या गौरवला मुकणार आहेत.

गेल्या ४३ वर्षात हे प्रथमच घडते आहे. ह्या विवादात निर्माण झालेल्या पुरस्कारांबाबतच्या अनिश्चिततेमुळे एन जी ओ मार्फत निवड झालेली मुलं चांगलीच नाराज झालेली आहेत.

गेल्या शुक्रवारी एन जी ओ आणि केंद्र सरकार ह्यांच्यात उद्भावलेल्या वादामुळे हे घडते आहे.

 

egov.com

शौर्य पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी दिले जातात. ज्यासाठी भारताच्या कानाकोपर्यातील २० मुले निवडली जातात आणि त्यांना त्यांच्या अतुलनीय साहसाबद्दल पुरस्कृत केले जाते.

हे पुरस्कार सुमारे १९७५ सालापासून पासून इंडियन कौन्सिल ऑफ चाईल्ड वेल्फेअर ह्या एन जी ओ मार्फत दिले जातात.

पण ह्या वर्षी केंद्र सरकारने स्वतःला ह्या उपक्रमापासून वेगळे केले आहे, दरम्यान केंद्र सरकारने राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यासाठी २६ मुलांची आपली वेगळी यादी केली आहे.

महिला आणि बालकल्याण खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली उच्च न्यायालायाच्या निर्णयामुळे एन जी ओ ला आर्थिक स्वायत्तता जपण्यासाठी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे त्यामुळे त्यांनी निवडलेली २० मुले राष्ट्रीय पुरस्कारांपासून वंचित झालेली आहेत.

एनजीओने निवडलेल्या, सन्मानित केलेल्या ह्या २० मुलांची गणतंत्र दिवस परेडचा भाग बनण्याची शक्यता कमीच आहे

 

slideshare.com

आयसीसीडब्ल्यूचे अध्यक्ष गीता सिद्धार्थ सांगतात की, हे पुरस्कार त्यांचे स्वतःचे आहेत आणि पुढेही त्यांच्या मार्फतच दिले जातील. त्यांनी पत्रकारांना सांगितले की एनजीओने ह्या प्रकरण संबंधात पीएमओ आणि संरक्षण मंत्रालयाला पत्र पाठवले आहे.

ह्याव्यतिरिक्त त्यांनी ह्या प्रकरणावर कोणतीही टिप्पणी करण्याचे टाळले. त्या पुढे म्हणतात,

या पुरस्कारांची सुरुवात आम्ही केली, देशभरातून अशी साहसी मुले निवडण्याकरिता आम्ही हरप्रकारे प्रयत्न करतो. मंत्रालयाने ह्या बाबतीत काय करावे, काय निर्णय घ्यावा हे पूर्णपणे त्यांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे.

पण त्यांनी हे जे पाउल उचलले आहे ते फार निराशाजनक आहे. ह्या बाबतीत अधिक सुस्पष्ट माहिती मिळाली की आम्ही संबंधित मुलांच्या पालकांना नक्की काय ते कळवू असेही त्या म्हणाल्या.

ह्यातल्या दोन मुलांची निवड सर्वोच्च अशा भारत पुरस्कारासाठी झालेली आहे जे सशस्त्र अशा अतिरेक्यांनाही शरण गेले नाही.

ही घटना जम्मूच्या सनजुवान नावाच्या छावणीत १० फेब्रुवारी २०१८ च्या रात्री घडली त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत ह्या दृढनिश्चयी मुलांनी दाखवलेले साहस अद्वितीय आहे.

 

indiatoday.com

आठ वर्षांची हविलदार ह्यांची मुलगी गुरु हिमा प्रिया सांगते,

जेव्हा मी त्या अतिरेक्यांना पहिले तेव्हा मला चित्रपटातली दृश्य पाहत असल्या सारखे वाटले, त्यांचे चेहरे काळ्या कापडाने अर्धवट झाकलेले होते आणि त्यांच्या हाती बंदुका होत्या.

त्यांनी सांगितले की ते पाकिस्तानी आहेत आणि मला आणि माझ्या आईसारख्या भारतीय लोकांना मारण्यासाठी आले आहे. त्यांनी बरीच मारहाण केली त्रास दिला पण हिने परिस्थितीला धीराने तोंड दिले आणि त्यातून बाहेर पडली.

तेरा वर्षांच्या सौम्यदिपनेही आपल्या आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी अशीच प्राणांची बाजी लावली.

त्याच्यावर अतिरेक्यांनी ए के ५६ ने गोळीबार केला. ह्या हल्ल्यातून तो कसाबसा वाचला पण तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तो कोमामध्ये होता. त्याच्यावर अनेक सर्जरी करण्यात आल्या. त्याची डावी बाजू अजूनही पैरलाइजड आहे.

त्याने आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जे काही केले त्याबद्दल त्याच्या वडिलांना फार अभिमान आहे.

 

indianexpress.com

दिल्लीच्या तेरा वर्षीय नितीशा नेगी हिने १० डिसेंबर २०१७ रोजी आपल्या इतर मित्रांना बुडण्या पासून वाचवले पण दुर्दैवाने ती त्यातून वाचू शकली नाही. टी पॅसिफिक स्कूल गेम्स साठी ऑस्ट्रेलियाला गेलेली असताना ही दुर्दैवी घटना घडली.

तिचे वडील पी एस नेगी म्हणतात,

आमच्या कुटुंबापैकी ती नेहमीच इतकी धाडसी होती, तिने इतरांना वाचवून त्यांच्या आयुष्यात आनंद आणला पण आम्हाला कायमचे दुखी करून गेली.

६ जुलै २०१७ रोजी बारा वार्षाच्या कॅमिलीया कॅथी हिने मानसिकदृष्ट्या आजारी असणाऱ्या आपल्या भावाला आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचवले. ती सांगते, माझी काकू घरातून किंचाळतच बाहेर आली, आग लागली म्हणून. आणि मी थोड्याच वेळापूर्वी भावाला घरात जाताना पहिले होते.

मी त्याला बाहेर बोलावण्यासाठी फोन केला. आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला पण खूप आरडा ओरडा सुरु असल्याने त्याला काहीही ऐकू आले नाही. शेवटी मीच आत जाऊन त्याला शोधून कसे बसे घर कोसाळण्यापुर्वी बाहेर घेऊन आले.

 

amarujala.com

अशा आहेत ह्या साहस वीरांच्या साहस कथा. मोठी माणसेही हतबद्ध होतील अशा प्रसंगी ह्या लहानग्यांनी आपली समयसूचकता दाखवून साहस दाखवून इतरांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले, पण त्यांच्या शौर्यासाठी त्यांना जो पुरस्कार मिळणार होता त्याला आता ते मुकणार आहेत.

आता राष्ट्रीय शौर्य पुरस्कारंबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारतातील १६ वर्षाखालील सुमारे २५ शूर बालकांना दरवर्षी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २५ जानेवारीला दिला जातो.

कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या बालकांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारप्राप्त मुले प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या परेडमध्ये सजवलेल्या हत्तीवरून सहभागी होतात.

 

Askideas.com

ह्या पुरस्कारांची सुरुवात कशी झाली?

२ ऑक्टोबर १९५७ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर चाललेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू पाहत होते. त्यावेळी शॉर्टसर्किटमुळे अचानक शामियान्याला आग लागली.

तेव्हा हरिश्चंद्र मेहरा या तेथे स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या केवळ १४ वर्षांच्या मुलाने स्वत:कडच्या चाकूने शामियान्याचा दोर कापून लोकांना बाहेर पडायला वाट करून दिली.

त्याचे प्रसंगावधान आणि धाडसी वृत्ती पाहून नेहरूंना खूप कौतुक वाटले आणि देशातील अशा शूर, धाडसी मुलांना पुरस्कार देण्याची योजना त्यांनी सुरू केली.

अशा प्रकारे पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता हरिश्चंद्र मेहरा हाच या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. त्यानंतर हा पुरस्कार दरवर्षी दिला जाऊ लागला.

पण या वर्षी हा पुरस्कार दिला जाणार की नाही हे अजून गुलदस्त्यात आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version