Site icon InMarathi

बिल गेट्सने भारत सरकारच्या “ह्या” योजनेचं केलंय कौतुक! काय आहे ही योजना? वाचा!

bill-modi-inmatathi

news18.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्या देशात सातत्याने नवनव्या योजनांची घोषणा होत असते, त्यातल्या काही याशावी होतात तर काही डब्यात जातात. फार कमी योजना अशा आहेत ज्या तळागाळात पोचून यशस्वी होतात त्यातलीच एक योजना सध्या चर्चेत आली आहे.

ही योजना चर्चेत येण्याच मुख्य कारण म्हणजे, जगतोल सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसोफ्ट चे संस्थापक बिल गेट्स, ह्यांनी मोदी सरकारच्या योजनेचे कौतुक केले आहे.

ज्या प्रकारे ह्या योजनेचा सामान्य जनता लाभ घेते आहे हे पाहून चांगले वाटतेय. असे आश्चर्योद्गार त्यांनी काढले आहेत.

 

qz.com

ज्याप्रकारे ही योजना राबविली जातेय की ह्याची दखल खुद्द बिल गेट्स ह्यांनी घेतलीये ह्यावरूनच त्या योजनेच यश दिसून येतं.

काय आहे ही योजना ?

केंद्र सरकारच्या ह्या बहुचर्चित योजनेचे नाव आहे “आयुष्मानभारत योजना”. ह्या योजने अंतर्गत, रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. सुरु झाल्या झाल्याच पहिल्या पाच ते सहा दिवसातच, ह्या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत योजनेची घोषणा केली होती.

दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने चाल‌विण्यात येणाऱ्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ सप्टेंबरला लोकार्पण केले होते. योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांची सेवा देण्यात येणार आहे.

प्रसार माध्यमांनी या योजनेचे नामकरण मोदीकेअर असेही केले आहे.

 

mebmd.com

आयुष्य्मान भारत योजनेने नुकतेच १०० दिवस पूर्ण केले, त्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन, अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी ट्विटर वर दिली आहे. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ घेत आहेत, हे पाहून चांगले वाटले, असेही गेट्स यांनी म्हटले आहे.

ह्या आधी, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दोन जानेवारीला या योजनेची माहिती देणारे ट्विट केले होते.

ह्याच ट्वीटच्या आधारे बिल गेट्स म्हणतात, योजना सुरू झाल्यापासून १०० दिवसांतच सहा लाख ८५ हजार लाभार्थ्यांनी तिचा लाभ घेतला असून, लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

ह्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. ह्यावर आपले प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी ह्यांनी त्यांचे आभार मानले.

 


आयुष्मान भारत चे सीईओ डॉ. इंदूभूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारपर्यंत साडेआठ लाख गरजूंनी या योजनेचा लाभ घेऊन एक नवा विक्रम स्थापित केला आहे. आणि दिवसेंदिवस हि संख्या वाढतेच आहे.

ह्या योजने साठी भारत सरकारने जवळपास १२०० कोटींची तरतूद गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये केली होती.

आता आयुष्मान योजनेबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

ह्या योजने अंतर्गत २०२५ पर्यंत संपूर्ण भारत रोगमुक्त करण्याचा भारत सरकारचा मानस आहे, ह्या दरवषी जवळजवळ पन्नास कोटी कुटुंबाना मोफत वैद्यकीय सेवा आणि पाच लाखांपर्यंत विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.

ही योजना केंद्र शासनाच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाद्वारे सुरु करण्यात आलेली आरोग्य विमा योजना आहे.

१ फेब्रुवारी २०१८ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली ह्यांनी ह्या योजनेबद्दल माहिती सादर केली होती. ह्यात देशातल्या १०.७४ कोटी कुटुंबाना वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करावा लागणार नाही. पांच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार ह्या योजनेअंतर्गत दिले जातील.

प्रत्येक कुटुंबातील साधारण पाच ह्या अंदाजाने ह्या योजनेमुळे देशातील जवळ जवळ पन्नास कोटी माणसं मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेऊ शकतात.

 

ndtv.com

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडलेल्या बँकेचे तुम्ही खातेधारक असण आवश्यक आहे, तुमच्या खात्याशी आधारकार्ड लिंक असणे गरजेच आहे, ह्याशिवाय उत्पन्नाचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.

ह्यासाठी वार्षिक रुपये १२००/- इतका प्रीमियान खातेधारकाने भरणे आवश्यक आहे.

ह्या योजनेअंतर्गत आपण खाजगी किंवा सरकारी दोन्ही प्रकारच्या दवाखान्यात आरोग्य सेवा घेऊ शकता. ह्यात जुने आजारही कवर केले जातील. काही आजारांमध्ये दवाखान्यात दाखल करण्या आधीचे आणि नंतरचे खर्चही समाविष्ट केले जातील.

कोण कोण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात ?

देशातली १०.७४ कोटी कुटुंबाना ह्या योजनेचा लाभ घेता येईल जे गरिब आणि इतर मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ह्या माहितीसाठी जनगनणे वर आधारित आकडेवारीचा उपयोग केला जाईल. ह्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा ठेवली गेलेली नाहीये.

शहरी भागात पात्रतेचे निकष-

१. कचरा उचलणारे, भिकारी
२. घरकाम करणारे कामगार
३. प्लंबर, गवंडी, मजूर , चित्रकार, वेल्डर, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी, माळी,
४. गृह-आधारीत कर्मचारी कार्यकर्ते, हस्तशिल्प कर्मचारी, दर्जेदार,
५. परिवहन कर्मचारी, चालक, कंडक्टर, सहाय्यक आणिसहचालक, रिक्षा ऑटो चालक,
इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, असेंबलर, धोबी, द्वारपाल ई. ह्या योजनेचा लाभ घेण्यास पत्र असतील.

 

indiatoday.com

ग्रामीण भागातील पात्रतेचे निकष-

१. कच्च्या भिंती आणि कच्ची छप्पर असलेल्या खोलीत राहणारे कुटूंब.
२. कुटुंबातील 16 ते 5 वयोगटातील प्रौढ सदस्य नसतील.
३. कमीतकमी एका विकलांग सदस्यासह कुटूंब आणि सक्षम प्रौढ सदस्य नसलेले कुटुंब.
४. अशी कुटुंब जिथे घर घर हाताळते.
५.एससी / एसटी कुटुंब
६. आदिवासी आदिवासी गटांचे कुटुंब
७. कायदेशीररीत्या बंधनकारक कुटुंबे.

 

cdac.com

ही योजना राबवण्यासाठी निधी कुठून येईल ?

योजनेची एकूण अनुमानित किंमत १२०० कोटी आहे ह्याची विभागणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये केले जाईल.हि योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार बरोबरच एकूण वैद्यकीय खर्चात त्या त्या राज्याचा निम्मा वाटा असणे अनिवार्य आहे.

फायदा काय असेल ?

 सरकारच्या वतीने, रोगासाठी निश्चित केलेल्या पॅकेज रेटवर उपचार उपलब्ध असतील.
 देशातील इतर रुग्णालये उपचारांचे दर कमी करण्यात देखील मदत करतील. आयटी प्लॅटफॉर्मवर होणारा आयुष्मान भारत योजनेचा गैरवापर टाळेल.
 राज्ये, केंद्र शासित प्रदेश हेच केवळ उपचारांच्या दरांमध्ये बदल करण्यास सक्षम असतील.

 

news18hindi.com

ह्या योजनेत उपचारांची मंजुरी आगाऊ घेतली जाईल. एसईसी सर्वेक्षणानुसार, योजनेच्या लाभार्थी होऊ शकणाऱ्या एकूण २४.४९ कोटी कुटुंबांपैकी १७.९७ कोटी ग्रामीण कुटुंबे ६.५१ दशलक्ष शहरी कुटुंबे आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणात लोकापर्यंत पोहोचलेली ही महत्वाकांक्षी योजना अनेक गरिबांना लाभदायक ठरणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version