' “#TenYearsChallenge” चे हे १० भन्नाट फोटोज हसून हसून डोळे ओले करतील – InMarathi

“#TenYearsChallenge” चे हे १० भन्नाट फोटोज हसून हसून डोळे ओले करतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडिया हा आता आपल्या सर्वांचाच जीव की प्राण झाला आहे. त्याचा वापर न करणारा क्वचित एखादाच सापडतो. लहानथोर सर्वांच्याच पसंतीस उतरलेला प्रकार म्हणजे इन्स्टाग्राम, फेसबुक वगैरे! फेसबुकवर जशा गंभीर चर्चा चालतात, तशा अनेक हलक्याफुलक्या, मिश्किल गोष्टीही चालू असतात.

काही दिवसांपूर्वी आलेलं ‘मॅनेकीन चॅलेंज’ तुम्हाला आठवत असेल. त्यात एखादा क्षण सगळे जागच्या जागी स्तब्ध झाले की फोटो काढून तो अपलोड केला जायचा.

अनेक फुटबॉल टिम्सच्या खेळाडूंनी हा प्रकार फेमस केला होता. त्यानंतर आलेला असाच पण काहीसा घातक प्रकार म्हणजे ‘किक्की चॅलेंज’. गाडीत ते गाणं लावून दरवाजा उघडून रस्त्यावर डान्स करायचा आणि त्याचा व्हिडीओ अपलोड अस काहीतरी प्रकार होता.

 

social-media-inmarathi
onlinelpntorn.org

सध्या अशाच एका चॅलेंजने फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. ते म्हणे “#10yearschallange”.

यात आपण दहा वर्षांपूर्वी कसे होतो आणि आज कसे आहोत याची तुलना करणारे दोन फोटो टाकणे अपेक्षित आहे. असंख्य लोकांनी त्यांचे असे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. पण इतक्यावर थांबतील ते फेसबुकर्स कसले!

या hashtag खाली अनेक लोकांनी काही विनोदी फोटो तयार करून पोस्ट केले आहेत जे पाहून हसू आवरणार नाही..

तुम्हीच पहा..

१. मनसेची १० वर्षे

 

raj-thackeray-inmarathi

 

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००९ साली विधानसभेत तेरा आमदार होते. दहा वर्षानंतर म्हणजेच आज, २०१९ साली त्यांचा एकही आमदार नाही. मनसेच्या या “प्रगतीवर” भाष्य करणारा हा मिश्कील फोटो चेतन दीक्षित यांनी शेअर केला आहे.

२. पवार साहेबांचे पंतप्रधानपद

 

‘न लाभलेले पंतप्रधान’ ही मा. शरद पवार यांच्या अनेक ओळखीपैकी एक! त्यांचे समर्थक आणि चाहत्यांनी हे वेळोवेळी म्हटलं आहे. पण पवार साहेबांना काही त्या खुर्चीवर आजपर्यंत बसता आलेले नाही, याच गोष्टीवर मिश्कील टिप्पणी करणारी पोस्ट निखील जावळे यांनी केली आहे.

३. मोदींचे राजकारण

 

modi-transform-inmarathi

 

नरेंद्र मोदी यांच्या राजकारणात झालेल्या बदलाचा हा भन्नाट फोटो! २००९ साली कुठल्यातरी मंदिरात गेलेले असतानाचा एक फोटो आणि त्याच्या शेजारी कुठल्यातरी मशिदीत हिरवी शाल पांघरून घेतलेले नरेंद्र मोदी.. हा फोटोही प्रचंड व्हायरल झाला आहे.

४. तुला पाहते रे..

 

tula-pahate-re-inmarathi

 

सध्या मराठीत ‘तुला पाहते रे’ ही मालिका गाजत आहे. चाळीशीतला विक्रांत सरंजामे आणि विशीतली इशा निमकर यांच्या नात्यावर ही मालिका बेतलेली आहे.

यातली अभिनेत्री गायत्री दातार लहान असताना तिने एका स्पर्धेच्या बक्षीस समारंभाचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत ती सुबोध भावे यांच्याकडूनच बक्षीस घेताना दिसते आहे. आणि त्याच इशा निमकरबरोबर आज सुबोध भावे सिरीयल करत आहेत.

५. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम

 

Marathi-inmarathi

 

इतिहासाची मोडतोड करणारे अनेक महाभाग आपण पहिले आहेत. त्यांचा सगळ्यात प्रसिध्द दावा म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात असलेले मुस्लीम. कोणतेही पुरावे न देता नुसते दावे हे लोक करत असतात. आणि ते शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम टक्केवारी सांगत असतात ती आजही वाढतच आहेत.

यावर एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. त्यात २००९ सालची सैन्यातील मुस्लिमांची संख्या १३% होती ती आता ५७% झाल्याची दाखवण्यात आले आहे.

६. बटाट्याचं सोनं

 

potato-inmarathi

 

हा फोटो कळला असेल न तुम्हाला? मागे एकदा राहुल गांधी यांनी एका भाषणात एका बाजूने बटाटे टाकल्यावर दुसऱ्या बाजूने सोनं निघणार्या एका मशीनचा उल्लेख केला होता. त्यावर हा फोटो आहे.

२००९ साली बटाट्यापासून चिप्स तयार व्हायचे, आता त्यापासून सोनं तयार होतं असं या फोटोत दाखवलं आहे. अनिकेत मेहता यांनी हा फोटो शेअर केलाय

७. शिवसेनाच मुख्यमंत्री

 

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, पण मनोहर जोशी यांच्यानंतर हा क्षण पाहण्याचे भाग्य शिवसैनिकांच्या नशिबी आलेले नाही. त्यावरच मिश्कील टिप्पणी करणारी ही पोस्त आहे.

८. रिकामे पाकीट

 

wallet-inmarathi

 

रिकाम्या पाकिटाचा हा बोलका फोटोही प्रचंड व्हायरल झाला आहे. २००९ सालचे रिकामे पाकीट २०१९ सालीही रिकामे असल्याचे दाखवण्यात आले आहे.

या hashtag खाली इतर अनेक फोटो लोकांनी शेअर केले आहेत.. त्यातले आणखी काही..

९. इराकची अवस्था

 

iraque-inmarathi

===

१०. स्लमडॉग चित्रपटातला चहावाला 

slumdog-inmarathi

===

हे आहेत या खास चालेंजमधले काही गाजलेले फोटो. यात काही राहून गेले असतील तर आमच्याशी शेअर कराच!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?