' सोहराबुद्दीनच्या निमित्ताने तथाकथित “सत्यवादी” विचारवंतांची वैचारिक “तडीपारी” पुन्हा उघडी पडलीये – InMarathi

सोहराबुद्दीनच्या निमित्ताने तथाकथित “सत्यवादी” विचारवंतांची वैचारिक “तडीपारी” पुन्हा उघडी पडलीये

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

हत्यारांची तस्करी, खंडणीखोरी, खून…अश्या वेगवेगळ्या तब्बल ६० केस असलेला माणूस.
ज्याच्या घरात ४० AK47 रायफल्स सापडल्या होत्या असा माणूस.

राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश तीन राज्यात गुन्हेगारी “कर्तृत्व” गाजवलेला माणूस.

छोटा दाऊद, अब्दुल लतीफ अश्या गँग्जशी आणि खुद्द दाऊद इब्राहिमच्या जवळचे अंडरवर्ल्डचे म्होरक्या – रसूल, ब्रजेश सिंग – ह्यांच्या बरोबर उठबस असणारा माणूस.

ह्या माणसाचं डिस्क्रिप्शन वाचल्यावर धडकी भरते की नाही मनात?!

हा तोच माणूस आहे, ज्याचं एन्काऊंटर झाल्यावर देशभरात हलकल्लोळ माजला. मानवाधिकार हनन पासून थेट पोलीस-जजवर दहशत बसवल्याचे आरोप झाले.

हा माणूस आहे सोहराबुद्दीन.

त्याच्याच तथाकथित “फेक” एन्काऊंटरवरून समस्त ‘विवेकी’, ‘लोकशाहीवादी’ विचारवंत व पत्रकारांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात अपप्रचाराची आघाडी (वाचा – आणखी आघाडी) उघडली होती.

 

amitshah2-inmarathi
thewirehindi.com

सोहराबुद्दीनच्या तथाकथित फेक एन्काऊंटरची केस म्हणजे उठता-बसता, दिवस-रात्र, लोकशाहीच्या गमजा मारणारे किती भंपक असतात ह्याची ज्वलंत केस स्टडी आहे.

अत्यंत महत्वाची आणि त्याहून अधिक धोकादायक बाब म्हणजे, ह्या भंपक लोकांनी भारतीय व्यवस्थेत जागोजागी जागा बळकावून स्वतःची वेगळी सत्ताकेंद्रं उभी केली आहेत.

स्पेशल सीबीआय कोर्टाचं व्हरडीक्ट बघितलं तर ह्या डीप स्टेटचं वास्तव उघडं पडतं.

६० गंभीर गुन्ह्यांचा हा आरोपी २३ नोव्हेंबर २००५ रोजी, आपल्या बायकोबरोबर बसने प्रवास करत असताना, ATS ने त्याला ताब्यात घेतलं. तीन दिवसानंतर एन्काऊंटर झालं.

वर्षभरानंतर एका पत्रकाराने ह्या एन्काऊंटरवर “सनसनीखेज” रिपोर्ताज केला.

सोहराबुद्दीनच्या भावाने सर्वोच्च न्यायालयात पिटिशन करून सदर एन्काऊंटर “फेक” असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

आणि इथून सुरु झाला प्रॉपगॅन्डा.

आरोप वाढत गेले. सोहराबुद्दीनच्या पत्नीचा पण खोटा एन्काऊंटर केला. सदर फेक एन्काऊंटरचा साक्षीदार प्रजापती देखील असाच मारला गेला – असेही आरोप केले गेले.

 

sohrabuddin-inmarathi
archive.indianexpress.com

चौकश्या होत गेल्या. रिपोर्ट येत गेले. हे एन्काऊंटर “फेकच आहे” आणि पोलीस हेच खरे गुंड नि राजकारणी (अर्थात, खुनशी रक्तपिपासू शहा आणि मोदी) आहेत असा प्रचार सुरु झाला.

आणि ह्या सगळ्यावर शेवटचा पडदा पडला गेल्या महिन्यात. सीबीआयच्या स्पेशल कोर्टाने, सदर प्रकरणातल्या २२ च्या २२ आरोपींना “बाईज्जत बरी” केलं.

आणि कोर्ट एवढं करून थांबलं नाही. कोर्टाने स्पष्ट शब्दांत असं निरीक्षण नोंदवलं आहे की – गुजरात ATS, CID, CBI ह्या सर्वांनी सदर एन्काऊंटर फेक असल्याचा कोणताही पुरावा देऊ शकलेले नाहीत.

कोर्ट म्हणतं – “a script to anyhow implicate political leaders” – नुसार CBI ने काम केलं.

इतकंच नव्हे, अमित शहांना ह्या प्रकरणात “for some political reasons” गोवण्यासाठी CBI चा वापर केला गेला असल्याची शक्यता न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे.

आणि सगळं सगळं घडलं, लोकशाही प्रेमींच्या गळ्यातले ताईत असणाऱ्या सोनिया गांधींच्या NAC बर हुकूम चालणाऱ्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात.

एकही विवेकवादी पुरोगामी सदर विषयावर बोलत नाही.

ही चौकशी सुरू असताना, अमित शहा गृह राज्यमंत्री होते. ते चौकशीत अडसर निर्माण करू शकतील अशी हरकत घेतली गेली.

त्यावर कोर्टाने शहांच्या वकिलांना विचारलं की तुमचा अशील १५ दिवसांसाठी गुजरात सोडून जाऊ शकेल का? वकिलांनी तात्काळ होकार दिला.

 

ahmed patel and amit shah-inmarathi03
livemint.com

ह्याच घटनेचा दाखला देत आजही, विवेकी गांधीवादी लोक अमित शहांना तडीपार म्हणून हिणवत रहातात. ह्यात नेमका कोणता विवेक नि कसली गांधीवादी साधनशुचिता आहे आहे तेच जाणोत.

पण त्यांच्याकडे सोहराबुद्दीनच्या रंजक इतिहासावर आणि न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यावर बोलण्यासारखं काहीही नसतं. कारण – गांधींची तसबीर लटकवलेल्या भिंतीसमोर खुर्ची टाकून एकदा आपल्या मनाला वाटेल तो निर्णय घेतला म्हणजे घेतला!

साक्षीदारांचे खून करणे, न्यायाधीशांना धमक्या देणे, पोलिसांना आपल्याला पाहिजे ते करायला लावणे, तपासयंत्रणांवर दबाव आणणे वगैरे सर्व आरोपांतून तो “निर्दोष सुटला” हे गौण असतं.

चौकशी, पुरावे, न्यायालय वगैरे गोष्टी कस्पटासमान असतात. ह्या गोष्टींचा उल्लेख करणारे रक्तपिपासू, खुनशी, ३१% वाले, सनातनी, मनुवादी आहेत!

स्वतःचा राजकीय प्रॉपगंडा रेटण्यासाठी आम्ही एकदा ठरवून निर्णय घेऊन टाकला आहे ना? झालं तर मग!

सोहराबुद्दीन प्रकरणातून अमित शहा पूर्णपणे तावून सुलाखून बाहेर पडलेत.
आणि तथाकथित पुरोगामी लोकशाहीवादी प्रोपागंडापंडितांचा दंभ जळून खाक झाला आहे.

 

amitshah1-inmarathi
bhatkallys.com

पण तरीही अपप्रचार सुरूच रहातील.
डीप स्टेट काम करतच राहील.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?