“उरी” : सर्जिकल स्ट्राईक पडद्यावर कशी वाटते? चित्रपट का पहावा? वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखिका : नीलिमा देशपांडे
===
मुळात नाट्यमय आणि थरारक असणारी घटना पडद्यावर येताना तितकी रोमांचक होत नाही, याचं सरळ साधं कारण म्हणजे कथेला चित्रपट म्हणून दाखवताना असणाऱ्या मर्यादा !!
भारतीय सैन्याबद्दल किती आणि काय आणि कसं दाखवायचं याला एक लिमिटेशन असणार, असायला हवी.
परंतू, एक अभिमानास्पद आणि ताकतीने पेलून नेलेले मिशन – त्याची सुंदर मांडणी असणारी डॉक्युमेंटरी म्हणून हा मुव्ही बघायला हवाच हवा.
आदित्य धरचे दिग्दर्शन आणि विकी कौशलने साकारलेला फौजी दोन्हीही उत्तम!! सैन्यातले व्यक्तिमत्त्व:हुबेहूब!!
आनंदाचा जल्लोष करणारा सैनिक, दुःख मात्र मोठ्या ताकतीने पेलून नेतो, अनावर झाले तरी त्यातले संयत असणे जाणवत राहते- विकी द बेस्ट!!
पाकिस्तान आणि काश्मीर हे आपले सत्तेचाळीस पासूनचे दुखणे – कोणाही भारतीयाला अभिमान वाटावा असा हा सर्जिकल स्ट्राईक!
बेरात्री बेसावध लोकांवर हल्ला करत उरी येथे निष्पाप लोकांचा घेतलेला बळी, हा पहिला प्रकार नव्हता. पण, मुहतोड जबाब मात्र अशा प्रकारे पहिल्यांदाच दिला गेला.
आधीच्या सगळ्या युद्धात आपण नेहमीच जिंकत आलो, ते प्रत्येक युद्ध प्रत्येक वेळी त्यांनी सुरु केलं होतं- यावेळी सुद्धा हे एक उत्तर दिलेलं असले तरी, त्यातून दिलेला संदेश – आपली ताकद दाखवणारा होता, आहे.
जशास तसे – बेरात्री त्यांच्याच घरात घुसून त्यांना यमसदनाला (हवं तर हूर कडे म्हणू या) पाठवणाऱ्या आपल्या सैन्याचे कौतुक करावे तितके थोडे.
आता मुद्दा येईल, सरकार आणि त्यांनी केलेलं मार्केटिंग – यांव आणि त्यांव…
मला वाटतं – तो मुद्दा जरा बाजूला ठेवून विचार केला तर – खरेच अशा कामाची डॉक्युमेंट्री किंवा फिल्म बनायला हवी, लोकांपर्यंत पोहोचायला हवी.
त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास युवा पिढीसाठी पोषक आहे. आज पहिल्या शोला खचाखच भरलेला युवावर्ग आणि त्यांचा उत्साह ,काही ठिकाणी दिल्या गेलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहता, कोण म्हणतं युवा पिढी मोबाईलच्या नादात वाया गेलीय…
ये नया हिंदुस्थान है – हे काही मला पटलं नाही – हा जुनाच हिंदुस्थान आहे फक्त नव्याने जाग आलेला म्हणू या- आमच्याशी विनाकारण वैर धरालं तर घरात घुसून मारणारा!
बाकी बंदुका आणि त्यांची आतषबाजी प्रेक्षणीय, विकीची fighting आणि acting दोन्ही जबरदस्त… नर्म विनोद आणि थोडस फिक्शन मजा आणते.
मुख्य म्हणजे मुव्ही बनवायचा म्हणून फालतू प्रेमकथा जोडण्याचा मोह टाळला आहे – त्यामुळे impact टिकून राहतो.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.