या मुस्लिम शासकांच्या कपटी राजकारणामुळे इतिहासावर काळेकुट्ट डाग पडले आहेत…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
भारत आणि भारताचा इतिहास या दोन गोष्टींचा जर आपण अभ्यास करायला घेतला तर आपल्या लक्षात येईल की भारताचा इतिहास एवढा वादग्रस्त ठरला आहे की यापेक्षा वेगळे काही वादग्रस्त असू शकते याची कल्पनाच भारतीय माणूस करू शकत नाही.
भारतीय इतिहासात आपल्याला अनेक असे खलनायक सापडतील. यांच्या कपटी राजकारणामुळे भारतीय इतिहासाचे अक्षम्य असे नुकसान झालेले आहे.
सदर लेखात आपण अशाच काही भारतीय इतिहासातील चुकांचं अवलोकन करणार आहोत.
भारतीय इतिहासात तसे अनेक क्रूर आणि कपटी खलनायक होऊन गेले या सर्व खलनायकांचा एक आपण म्होरक्या म्हणू शकतो जो भारतीय नव्हता पण याने भारतावर आक्रमण करून तक्षशिला आणि नालंदा अशा दोन विद्यापीठांचा नाश करून टाकला. तो म्हणजे “बख्तीयार खीलजी”.
हा खीलजी कुतुबुद्दीन ऐबक या राजाचा सरदार होता. एकदा खीलजी खूप आजारी पडला आणि अनेक प्रकारचे हकीम त्याला ठिक करू शकले नाही.
मग त्याला कोणीतरी सल्ला दिला की तू भारतातील नालंदा विद्यापीठात जाऊन तेथील आयुर्वेदिक विभागाचे प्रमुख आचार्य राहुल श्रीभद्र यांच्याकडून आजारावर उपचार कर.
पण त्याचा मात्र त्याच्या देशातील हाकीमांवरच वर जास्त विश्वास होता पण आजार वाढला आणि नाईलाजाने त्याला उपचारासाठी नालंदा विद्यापीठात जायला लागले. तिथे गेल्यावर त्याने असे सांगितले की मी तुमचं कुठल्याही प्रकारचं औषध सेवन करणार नाही, तुम्हाला मला औषध न देता बरं करावे लागेल.
आचार्यांनी अर्थातच ती अट मान्य केली आणि त्याला एक कुरान दिले आणि असे सामगीतले की या कुराणातील विशीष्ट पृष्ठावरील आयातींच वाचन केल्यावर खिलजी बरा होईल.
नालंदा येथील आचार्यांनी हे शक्य करून दाखवले.
पुढे मात्र याच खिलजीने भारतातील शास्त्र हाकीमांपेक्षाही चांगलं कसं या ईर्षेने त्याने नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांवर हल्ला केला.
नुसता हल्लाच नाही केला तर त्याने भारताच्या विद्या भांडाराचा नाश केला. हजारो भिक्खुंची हत्या केली आणि त्यातील जवळपास नऊ लाख पुस्तके जाळून टाकली.
असं म्हणतात की या विद्यापीठांमध्ये एवढी पुस्तके होती कि ती पुस्तके जाळून खिलजीच्या सैन्याने तीन महिने स्नानासाठी पाणी तापवले.
खीलजी नंतर जर कोणाच्या क्रूर पणामुळे भारतीय इतिहासाला गालबोट लागले असेल तर तो म्हणजे “शेरशहा सुरी”. ज्याने भारतात सुर या राजवंशाची स्थापना केली.
त्याचा जन्म १४८६ रोजी बिहारमध्ये झाला. त्याचं खरं नाव फरीद असं होतं. तो अरबी आणि फारसी अशा दोन्ही भाषेत तो तरबेज होता. त्याने एकदा वाघाची शिकार केली असल्यामुळे त्याला लोक शेरखान असंही म्हणत असत.
ज्यावेळी भारतावर बाबराच राज्य होतं त्यावेळी याने शपथ घेतली की मी आलम हिंदुस्तानवर अधिराज्य गाजवेल पण बाबर मात्र शक्तिशाली आणि युद्धकलेत निपुण होता.
बाबरची युद्ध कला अवगत करून घेण्यासाठी शेरशहा सुरी याने चंदेरी येथील युद्धात बाबराची सोबत केली आणि त्याची युद्धकला जाणून घेतली.
सैन्य आणि आर्थिक जमवाजमव करन्यासाठी शेरखाने “चूनार” च्या विधवा शासिकेसोबत विवाह केला आणि सैन्य आणि इतर सामग्रीची तयारी करू लागला.
या सर्व गोष्टींची कुणकुण बाबराचा मुलगा हुमायून याला लागली आणि त्याने शेरशहा सूरीवर हल्ला केला. यात आपला पराभव होणार असं जाणवल, मग या कपटी शेरखाने त्याच्यासोबत संधी केली आणि त्याला परत दिल्लीत धाडून दिले आणि आपली ताकत वाढवण्याचे काम परत चालू केले.
या नंतर मात्र पूर्ण ताकतीनिशी हुमायुन सुरीवर चालून आला. आता आपली खैर नाही हे लक्षात येताच शेरखान चुनार सोडून बंगाल मार्फत रोहतास ला निघून गेला.
जाताना तर त्याने पूर्ण बंगालची राखरांगोळी करून टाकली. ज्याने करून त्याचा पाठलाग करणाऱ्या हुमायुन सर्व बंगाल पुनर्स्थापित करण्यात वेळ निघून जाईल आणि झालेही तसेच.
हुमायुनला बंगालला पुनर्स्थापित करून रोहतासवर हल्ला करण्यासाठी एक वर्ष लागले. या अवधीत शेरखान तुल्यबळ सेनानी झालेला होता. तरीही त्याने हुमायूनचा घेरा पडला त्यावेळी त्याला घाबरतो असे दाखवून रात्रीत हल्ला करून त्याला हरवले.
हे झालं शेरखानच्या क्रूर आणि कपटीपणाचे एक उदाहरण पण रायशीन आणि गिरी सुमेल येथेही शेरखानने याच कपटीपणाने राजा पूरणमल आणि राजा राव मालदेव यांना परास्त केले.
ज्यावेळी या शेरखानने रायशीनला घेरा घातला तेव्हा राशीन येथील राजा पूरणमल याकडे एवढे अन्नधान्य होते की हा राजा पुढील पाच वर्षे तरी या शेरखानला शरण आला नसता.
शेरखानने असे दाखवले की आम्ही आता परत जात आहोत तेव्हा राजा पूर्णमलने एकदा त्याची भेट घेऊन त्याचा पाहुणचार स्वीकारावा.
राजाने त्याची ही विनंती स्वीकार केली आणि जेव्हा राजा त्याचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी गड उतरून आला त्याच वेळी शेरखानने त्यावर आक्रमण करून त्याला नेस्तनाबूत केले.
गिरी सुमेरची व्यथा ही काही वेगळी नाही. राजा राव मालदेव हा त्या काळातील अत्यंत ताकतीचा राजा मानला जात होता. शेरखानने मात्र या राज्याच्या सैन्यातच फूट पडली आणि राजाला परास्त केले.
भारताच्या इतिहासावर आपल्या क्रूर कृत्यांचे डाग सोडून जाणाऱ्या व्यक्तींची यादी बरीच मोठी आहे. ही नावे फक्त उदाहरण म्हणून.. इतिहास हा आपल्या इछेप्रमाणे बदलत नसतो. तो कधी क्रूर, कधी आल्हाददायक तर कधी अत्यंत निराशाजनक असू शकतो हे मान्य करून पुढे जाणेच योग्य!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.