Site icon InMarathi

भारताचा “हा” अभिमानास्पद व प्रेरणादायक इतिहास – तरीही अज्ञात!

navy-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

शास्त्र ही व्यापक संकल्पना आहे. इतिहासाबद्दल वाचत असतांना आपण धर्माशी निगडित म्हणून शास्त्राचा विचार करतो पण ही संकल्पना विज्ञान आणि कायदा या संदर्भात देखील वापरली जाते. भारताचा प्राचीन इतिहास अतिशय अभिमानास्पद व प्रेरणादायक आहे.

पण तेव्हा विज्ञानात आपल्या पूर्वजांनी साधलेली प्रगती आपल्याला पूर्णपणे माहितीच असते असे नाही. इतिहासातील ते अज्ञात पैलू आपल्या विज्ञाननिष्ठ दृष्टीकोनाला नवीन आयाम देतील.

भारतीय विद्वानांनी गणिती क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अंकगणित, बीजगणित, रेखागणित (geometry), ज्योतिष (Astronomy) यांचा गणितीय क्षेत्रात अभ्यास केला जात असे.

हडप्पा येथील नगर नियोजन लक्षात घेता त्या लोकांना मोजणी आणि भूमितीचे चांगले ज्ञान असल्याचे लक्षात येते. हीच बाब प्राचीन मंदिरांना देखील लागू होते.

 

culture.com

इसवी सन पूर्व ६ मध्ये शुल्बसूत्र किंवा शुल्ब सूत्र हे बौधायन यांनी लिहिलेले गणितावरचे प्राचीन पुस्तक आहे. यात “पाय”(Pi) ही संकल्पना स्पष्ट केली आहे. क्षेत्र आणि परीघ मोजण्यासाठी या संकल्पनेचा वापर पूर्वीपासूनच प्रचलित आहे.

अपस्तंभा यांनी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात भूमितीत वापरल्या जाणाऱ्या लघुकोन, विशालकोन या संकल्पनांची मांडणी केली. यज्ञकुंडाच्या बांधकामांसाठी अचूक मोजमाप या साहाय्याने घेतले जात असे.

आर्यभट(इ.स. ४७६ – इ.स. ५५०) हे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.(खगोल ही नालंदा विद्यापीठातील एक प्रयोगशाळा होती. जिथे आर्यभट यांचे शिक्षण झाले होते.) अंकगणित, बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा त्याचा सखोल अभ्यास होता.

आर्यभट्ट यांनी शून्याची संकल्पना गणिती अभ्यासामध्ये प्रथम वापरली. तसेच ‘पाय’ नावाची गणित संकल्पनेची किंमत ६३,८३२/२०,००० आहे असेही नोंदवले आहे

आर्यभटांनी पृथ्वी स्वत:भोवती एकसारखी फिरत असते, म्हणजेच तिला दैनंदिन गती आहे. याची नोंद घेतली होती. तसेच वर्षाचे दिवस ३६५, घटी १५, पळे ३९, विपळे १५ इतक्या सूक्ष्म भागांपर्यंत कालमापन नोंदवून ठेवले आहे.

 

arabhata.com

खगोलशास्त्राच्या अभ्यासाचा उद्देश

१. अचूक दिनदर्शिका बनविण्यासाठी

२. हवामान आणि पावसाचे आकृतीबंध समजून घेण्यासाठी

३. दिशादिग्दर्शन

४. ज्योतिष जाणण्यासाठी

५. समुद्राच्या लाटा आणि तारे यांचा अभ्यास करण्यासाठी जेणेकरून रात्री समुद्रातून जाण्यासाठी दिशा समजण्यास त्याचा उपयोग होईल. तसेच ताऱ्यांचा उपयोग वाळवंटातून जातांना देखील होत असतो.

इसवी सन सातव्या शतकातील ब्रम्हगुप्त यांनी “ब्रम्हसुप्त सिद्धांतिका” या ग्रंथात शून्य हा “क्रमांक” म्हणून पहिल्यांदा गणितात वापरला. शिवाय ऋण आणि धन संख्या यांची मांडणी केली.

आज वापरल्या जाणाऱ्या गणितीय संकल्पना प्रथम “गणित सार संग्रह” या ग्रंथात महावीराचार्य यांनी नवव्या शतकात मांडल्या. लसावि ही संकल्पना याच ग्रंथात मांडली आहे.

 

bhartiy.com

बीजगणित, त्रिकोणमिती आणि कॅल्क्युलस भारतातून आले. ११ व्या शतकात श्रीधराचार्य यांनी वर्गसमीकरण मांडले होते.

१२ व्या शतकात भास्कराचार्य हे महान गणिती होऊन गेले. त्यांचा सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ चार विभागात होता

१. लीलावती (व्यावहारिक अंकगणित)

२. बीजगणित (व्यावहारिक बीजगणित)

३. गोलाध्याय (ग्रहांविषयी)

४. ग्रहगणित (ग्रहांचे गणित)

वैद्यकशास्त्र

अथर्ववेदात आजार आणि त्यावरचे उपचार यांचा उल्लेख आहे. फोड,अतिसार, खोकला, कुष्ठरोग, ताप, फेफरे येणे या रोगांचा उल्लेख यात येतो.

पुढे इसवी सन पूर्व ६०० मध्ये तक्षशिला आणि वाराणसी हे वैद्यकशास्त्र शिकण्याचे मोठे केंद्र होते.

भारतीय वैद्यकशास्त्रात चरक (चरक संहिता – आयुर्वेद) आणि सुश्रुत (सुश्रुत संहिता – शल्यचिकित्सा) यांच्या संहिता महत्वाच्या मानल्या जातात.

 

wikipedia.com

योग एक मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक प्राचीन भारतीय प्रक्रियापद्धती आहे. यम, नियम, योगासन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे आहेत. त्यामुळे यास अष्टांगयोग असेही म्हटले जाते.महर्षि पतंजलि हे योगशास्त्र या ग्रंथाचे कर्ते होत.

महर्षी कणाद यांनी विशद केलेला अणुसिद्धांत आधुनिक सिद्धांताशी साम्य सांगणारा आहे.

धातुशास्त्र हे देखील प्राचीन भारतातील एक प्रगत शास्त्र होते. भारतातील वूट्झ स्टील जगात प्रसिद्ध होते. शस्त्रांचा जागतिक व्यापार हा त्याचाच परिपाक होता. त्याशिवाय रंग, रंगद्रव्ये तसेच अत्तरे यांचे उत्पादन प्राचीन भारतात मोठ्या प्रमाणावर होत असे.

जहाजबांधणी आणि दिशादिग्दर्शन

“युक्ती कल्प तारू” हा जहाजबांधणीचे तंत्र सांगणारा प्राचीन ग्रंथ आहे. यात जहाजांचे प्रकार, आकार आणि त्यासाठी वापरली जाणारी सामुग्री याबाबत लिहिले गेले आहे. यांत जहाजांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आले असून त्यापैकी

१. शाही जलप्रवास आणि घोडे नेण्यासाठी

२. जलपर्यटन करण्यासाठी

३. युद्धनौका

यांचा उल्लेख करता येईल.

 

ancientportsantiques.com

वास्को द गामाला युरोपमध्ये सर्वात मोठे जहाज उपलब्ध असल्याचे सांगितले गेले. मग तो कान्हा नावाच्या गुजराती व्यक्तीला भेटला, त्याचे जहाज वास्को द गामाच्या जहाजापेक्षा १२ पट मोठे होते. वास्को द गामाच्या स्वतःच्या रोजनिशीत ही घटना नोंदवली गेली आहे जी आज लिस्बनमध्ये आहे.

शिक्षण

तक्षशिला प्राचीन भारतातील एक प्रमुख शहर आणि विद्यापीठ होते. इसवी सन पूर्व ७०० मध्ये तक्षशिला येथे जगातील पहिल्या विद्यापीठाची स्थापना झाली. जगभरातील १०,५०० हून अधिक विद्यार्थी ६० पेक्षा अधिक विषयात इथे शिक्षण घेत होते.

इसवी सन पूर्व ४ थ्या शतकात बांधण्यात आलेले नालंदा विद्यापीठ हे देखील शिक्षण क्षेत्रात प्राचीन भारतातील लौकिकास प्राप्त विद्यापीठांपैकी एक आहे.

सिंचन

सौराष्ट्रमध्ये सिंचनसाठी सर्वात पहिले जलाशय आणि धरण बांधण्यात आले.

चंद्रगुप्त मौर्यच्या काळात रायवाटाच्या टेकड्यांवर सुदर्शन नावाचा एक सुंदर तलाव बांधण्यात आला.

खेळ

बुद्धीबळ – प्राचीन काळी चतुरंग या नावाने ओळखला जाणारा हा खेळ अष्टपद या नावानेही जाणतात.

सापशिडी मूळतः मोक्षपात नावाने ओळखला जाणारा खेळ १३ व्या शतकातील कवी संत ग्यानदेव यांनी तयार केली.

याव्यतिरिक्त सिंधु घाटीत प्राचीन भारतीय बटण आणि पाय-या बनविणारे प्रथम होते. प्राचीन काळात अनेक क्षेत्रात भारतीयांनी योगदान दिले त्याची ही काही उदाहरणे आहेत.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version