Site icon InMarathi

दिल्ली पोलीसांची Limca Book of Records मध्ये नोंद – १० तासांत २२.४९ करोडची रक्कम recover केली!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

दिल्ली पोलिसांवरील नियंत्रणावरून एकीकडे मोदी-केजरीवाल ‘जंग’ सुरु असताना, दुसरीकडे अवघ्या १० तासात देशातील सर्वात मोठी cash recovery करून दिल्ली पोलिसांनी Limca Book of Records मध्ये नोंद करून घेतलीये.

 

Source: Newsworld

२६ नोव्हेंबर रोजी, Security and Intelligence Services (SIS) च्या van-driver शुक्ला आणि gunman विनय पटेल, ह्यांच्यावर २२.४९ रुपये Axis बँकेस सुपूर्द करण्याची जबाबदारी दिल्या गेली होती. एका ठिकाणी बाथरूमला जाण्यासाठी विनय पटेल गाडीमधून उतरले आणि शुक्लाने गाडी पळवली. पटेलने लगेच शुक्लाला फोन केला, तेव्हा तो म्हणाला की traffic police तिथे van उभी करण्यास परवानगी देत नव्हते. लगेच शुक्लाने फोन बंद करून टाकला.

पटेल लगेच बँकेच्या Okhla branch मध्ये गेले आणि तिथे घडलेली घटना सांगितली. पोलिसांनी van मधील gps च्या मदतीने van च्या movements track केल्या. शुक्लाने ते सर्व पैसे एका godown मध्ये टाकून, van एका ठिकाणी सोडून दिली होती. पैसे परत उचलून पोबारा करण्याच्या आतच पोलिसांनी त्याला अटक केली.

फक्त १० तासांच्या आत देशातील सर्वात मोठी cash recovery केल्याबद्दल दिल्ली पोलिसांची Limca Book of Records मध्ये नोंद झाली. दिल्ली पोलीस कमिशनर, B. S. Bassi ह्यांनी स्वतः tweet करून ही बातमी सर्वांना कळवली आहे:

 

 

Bravo, दिल्ली पोलीस!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version