या शेतकऱ्याच्या एकाच प्रयोगामुळे तो एका वर्षात कर्जमुक्त झालाय, आणि १४ कुटुंबांना रोजगारही देतोय!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
उत्तरप्रदेश मधील बुंदेलखंड या मागासलेल्या भागाचा विषय निघाला की डोळ्यासमोर उभी राहते कोरडी जमीन आणि दुष्काळ. तिथली प्रचंड गरिबीची परिस्थिती लोकांना रोजगारासाठी स्थलांतर करण्यास भाग पाडते.
एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४०% लोक दारिद्र्यरेषेखाली आहे. यावरून या डोंगराळ प्रदेशात काय स्थिती असेल ते लक्षात येते.
२०१८ मध्ये गेल्या पाच वर्षांतील चौथ्या वेळी दुष्काळ पडला होता. शेतकरी दुष्काळापुढे हतबल आहेत आणि कर्जाने दबले गेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले तर अनेकांना आपला पिढीजात व्यवसाय सोडून स्थलांतर करावे लागले आहे.
मात्र या भीषण काळात बुंदेलखंड मधल्या बांदाच्या बडोखर खुर्द गावातील प्रेम सिंह या शेतकऱ्याची यशोगाथा नवीन आशा निर्माण करणारी आहे.
हा ५६ वर्षांचा शेतकरी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीच्या जोरावर या कठीण परिस्थितीवर मात करतांना दिसतो आहे.

या भागात कमी पाणी आहे, तरी मत्स्यव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांच्याकडे होतांना दिसेल. कुटुंबांला त्यांच्या स्वत: च्या बागेतील अनेक फळझाडांमधून निरनिराळी फळे आवडतात.
त्यांच्या शेतात एक प्रक्रिया केंद्र देखील आहे ज्यातून सेंद्रिय पिकांपासून उत्पादने तयार केली जातात. शिवाय याठिकाणची माती कसदार आहे.
प्रेम सिंह यांच्याकडे वडिलोपार्जित चार एकर जमीन आहे, त्यावर ते ‘आवर्तनशील शेती’ करतात. या तंत्रामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न १५-२० लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे. पिढीजात शेती हाच व्यवसाय असल्याने सुरुवातीला ते वडिलांबरोबर शेती करत, त्या दिवसांची आठवण काढत प्रेम सिंह म्हणतात,
“१९८७ साली मी एक तरुण शेतकरी म्हणून काम सुरु केले तेव्हा मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुरुवात केली. ते एक पारंपरिक शेतकरी होते. त्या वेळी शेतीमध्ये युरिया आणि डायमोनियम फॉस्फेटसारखे रासायनिक खतांचा मोठा वापर आम्ही करत होतो.
जरी पीक उत्पादन चांगले सुरू झाले असले तरी आमची मातीची गुणवत्ता सतत कमी होत गेली आणि आमच्या वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत उत्पादन मूल्य खूप जास्त होते. जमिनीची मशागत करणे, रासायनिक खते देणे, खोलवर जमिनीतून पाणी काढणे, ट्रॅक्टर वापरणे आणि त्यासाठी होणार खर्च बाजूला जाता फारसा नफा हाती राहतंच नव्हता.
ते पुढे सांगतात, “अनिश्चित हवामान, कमी होत जाणारं उत्पादन आणि वाढत्या कर्जाची चिंता ही आमच्यासाठी एक नित्याची बाब होती.

आमची वार्षिक कमाई २.१५ लाख होती, परंतु १,९०,००० रुपयांपेक्षा जास्त पैसे उत्पादन खर्च व बँक कर्ज परत करण्यात खर्च होत असे. इतकी कमी शिल्लक आपल्या कुटुंबातील चार भाऊ आणि त्यांच्या मुलांचे संरक्षण करू शकत नाही.
त्यामुळे माझ्याकडे दोन पर्याय आहेत – शेती सोडण्याचा किंवा आमच्या क्षेत्राला पुन्हा उभं करणाऱ्या तंत्राचा शोध घेण्याचा!”
या प्रश्नाचे उत्तर आवर्तनशील शेतीच्या स्वरूपात मिळाले.
आवर्तनशील शेती याचा अर्थ असा होता की, अशा पिकांचे उत्पादन घेणे ज्यांचा उत्पादन खर्च कमी आहे, कमीतकमी वेळात नफा मिळू शकतो, तसेच त्यांच्या कुटुंबास स्वावलंबी होऊन जीवन जगण्यास मदत होईल या पद्धतीची शेती करणे.
१९९८९ मध्ये जेव्हा त्यांनी पारंपारिक शेतीकडे वळण्याविषयी त्यांच्या कुटुंबाशी प्रथम बोलले तेव्हा त्यांना आवश्यक असलेले समर्थन मिळाले नाही. पण त्यांनी आपला मार्ग निवडला.
पुढे हे सर्व उभं करण्यात दोन दशकाचा काळ जावा लागला, पण २५ लाख रुपयांच्या कुटुंबाच्या कर्जाची परतफेड त्यांनी पूर्ण केली.
आवर्तनशील शेती म्हणजे काय?
या तंत्रासाठी शेतकऱ्याने आपली जमीन तीन भागांत विभागली पाहिजे.

पहिल्या भागात फळे आणि झाडे वाढविण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना या भागातून अतिरिक्त उत्पन्न तर मिळतेच शिवाय या भागासाठी खर्च देखील कमी लागतो. त्याच वेळी, पिकांची विविधता पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत करते.
जमिनीचा हा भाग शेतकऱ्यांना वाळलेली पानं देखील देतो, जे नंतर कंपोस्ट तयार करण्यासाठी, शेणखत तयार करता येण्यासाठी उपयोगी येते.
दुसरा भाग गायी, म्हशी, शेळ्या आणि कुक्कुटपालन यांसारख्या पशुधनांच्या पालनासाठी वापरला जातो.
त्यातून मिळणाऱ्या दुधापासून घरगुती गरजांसाठी लागणाऱ्या दुधाचा वापर केला जाऊ शकतो, परंतु जास्तीतजास्त दूध चीज आणि प्रक्रिया केल्यानंतर लोणी विकले जाते आणि जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून वापरली जाते.
यामुळे मातीची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि चांगले पीक मिळविण्यासाठी रसायनांवर अवलंबून असण्याची गरज पडत नाही.
जमिनीचा तिसरा भाग आपल्या घरासाठी पिके घेण्यासाठी वापरला जातो.
गहू आणि तांदूळ यांसारखी मुख्य धान्ये, तसेच तीन वेगळ्या प्रकारच्या डाळी, इतर अन्नधान्य, भाज्या, फळे आणि अगदी मसाला आणि तेलासारख्या घरगुती वापरासाठी आवश्यक असलेले सर्व काही प्रकारचे उत्पादन यातून घेतले जाते.

प्रेम सिंह आपल्या निरीक्षणाच्या आधारे सांगतात,
“शेतकऱ्याने प्रथम आपले घरच्या गरजांसाठी आलेले पीक ठेवले पाहिजे. एकदा गरजा पूर्ण झाल्यानंतर, उर्वरीत बाजारपेठेत कच्च्या स्वरूपात विक्री न करता, त्यावर प्रक्रिया केल्यानंतर बाजारात विक्रीसाठी पाठवले पाहिजे.
गेल्या २८ वर्षांपासून त्यांनी आपले कोणतेही उत्पादन कच्च्या स्वरूपात विकले नाही. उदाहरणार्थ, ५० लिटर दूध असल्यास आणि कुटुंबाला केवळ १५ लिटरची गरज असते, “बाकीचे तूप, लोणी किंवा पनीर म्हणून विकले जाते; कैरी असेल तर त्याचे लोणचे बनवून विकले जाते.
बियांमधून तेल काढले जाते, मसाल्यांवर देखील प्रक्रिया केली जाते, पॅकेज केले जाते आणि विकले जाते. प्रेम सिंह सांगतात, आवळ्याचे लोणचे आणि कँडी, गायीचे तूप, मोहरीचे तेल, सेंद्रिय तांदूळ आणि पीठ (गहू, हरभरा आणि जव) ही काही आमची लोकप्रिय उत्पादने आहेत.
असे केल्याने शेतकऱ्यांसाठी फक्त नवी बाजारपेठ निर्माण होत नाही तर “त्याच्या उत्पादनात अधिक मूल्य जोडले जाते आणि शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न कमवता येते.”
एखाद्या शेतकऱ्याला बाजारपेठेतून काही वस्तू विकत घ्याव्या लागल्या तर काय करावे, असे विचारले असता प्रेम सिंह त्यांना स्थानिक अर्थव्यवस्थेस मदत करण्यासाठी आपल्या गावातून किंवा शेजारच्या गावांमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देतात.
त्यांचे चार एकर शेत १४ पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगाराच्या संधी देते.

परिसरातील त्यांचे घर देखील पर्यावरण पूरक पद्धतीने बांधले गेले आहे, यासाठी त्यांनी सिमेंट आणि लोखंडाचा वापर केलेला नाही.
प्रत्येक दिवसाला ४० जणांसाठी स्वयंपाक करावा लागतो त्यासाठी अन्न एलपीजी किंवा गॅस लाइन वापरून शिजवत नाही कारण शेतामध्ये या गरजा पूर्ण करणारे बायोगॅस संयंत्र देखील सुसज्ज आहे.
निरंतर पुरवठा करण्यासाठी कंपोस्ट खड्डे देखील तयार केले आहेत; याव्यतिरिक्त, ३ किलोवॅट ऊर्जेसाठी सौर ग्रिडचा वापर करून विद्युतीकरण केले आहे. पीकबदल आणि मूळ बियाांचे संरक्षण यांसारख्या तंत्रांनाही ते प्रोत्साहन देतात.
ते आवर्तनशील शेतीचे फायदे सांगून त्याचे महत्व अधोरेखित करतात. यामुळे हवामानाच्या बदलत्या परिस्थितीवर जोखीम आणि अवलंबित्व कमी होत असल्याचे तसेच, जमीनीची प्रत चांगली झाल्याचे निदर्शनास आणून देतात याशिवाय भूगर्भागातील पाणीपातळी देखील वाढली असल्याचे नमूद करतात.
ते पारंपारिक शेतीकडे वळले असल्याने त्यांना कधीही नुकसान झाले नाही.
मिळालेल्या फायद्यातूनही ते शेतीपासून वंचित कुटुंबांना शिक्षणासाठी आणि आरोग्य सेवेसाती मदत करतात आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळांचे आयोजन करतात.
त्यांनी शाश्वत शेतीतील तत्त्वांचे शिक्षण देण्यासाठी तरुण शेतकऱ्यांकरिता एक खुले विद्यापीठ ‘ह्यूमन एग्रीरियन सेंटर’ देखील उभारले आहे.

२२ देशांतील शेतकरी हे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांच्या शेतात गेले आहेत. अनेकदा शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शेताला भेट दिली जाते, जिथे ते भारतातील कृषी इतिहासाबद्दल आणि शाश्वत शेतीचे फायदे समजावून सांगतात.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी ते सहमत आहे.
“हरित क्रांतीनंतर शेतक-यांनी पारंपारिक शेतीचा त्याग केला आणि चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी रासायनिक खतांकडे जाण्याचा निर्णय घेतला यासाठी सरकार जबाबदार आहे. शेतकरी सततचा दुष्काळ आणि सरकारच्या अनियोजित धोरणांमुळे कर्जाच्या चक्रात अडकला आहे, म्हणूनच कर्जमाफी करून शेतकऱ्यांना यातून बाहेर काढणे ही सरकारची जबाबदारी आहे.”
असे मत ते मांडतात.
आपल्या शेतकरी बंधू भगिनींना ते आवाहन करतात की, “आपण आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आपले भाग्य आपल्या हातात आहे आणि शेतीत क्रांती घडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपल्या प्राचीन पद्धतींचे पुनरुत्थान करणे हा आहे.”
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.