Site icon InMarathi

हुंडा किंवा घरगुती मारहाणीच्या “खोट्या” तक्रारींपासून पुरुषांनी स्वतःला कसं वाचवावं?

behind bars featured inmarathi

hivplusmag.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय संस्कृती ही प्राचीन मानली जाते व सर्वात आदर्श ही भारतीय संस्कृती मानली जाते. यामागे दोन कारणे आहेत, भारतीय सभ्यता आणि भारतीय कुटुंब व्यवस्था.

भारतीय नागरिक गेल्या अनेक पिढ्यांपासून हळव्या नात्यांच्या बंधनात अडकला असलेला आपल्याला दिसून येईल.

पण मध्यंतरीच्या काळात जशी भारतीय कुटुंब संस्था आपल्याला विभक्त आणि विरक्त होताना दिसत आहे तसेच कौटुंबिक कलह आणि यामध्ये दाखल होणारे गुन्हे या सर्व घटकांमध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला दिसेल.

मग त्यात कुठल्याही प्रकारचे गुन्हे असु देत.. फसवे लग्न असू देत की हुंड्यासाठी होणारा छळ असू देत.

 

theindianfeed.in

 

हुंडा किंवा त्यामुळे होणारी मारहाण या घटना निश्चितच स्वीकारार्ह नाहीत पण आपण याच नाण्याची दुसरी बाजूही तपासणे गरजेचे ठरेल.

मग जर कोणी तुमच्यावर हुंडा घेतल्याची आणि घरगुती मारहाणीची खोटी तक्रार केली तर मग तुम्ही काय करावे हे सदर लेखामध्ये प्रस्तुत करण्यात आलेले आहे.

आपल्या सगळ्यांच्या जीवनशैलीवर आघात करणारी गोष्ट म्हणजे घरगुती हिंसा. घरगुती हिंसा मानवाच्या पूर्ण जीवनशैली वरच आघात करते. शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या घरगुती हिंसा खूप मोठा आघात करते. मानवाच्या मूलभूत हक्कांचं हे सर्वात मोठं उल्लंघन होय.

जगातील अनेक देशांनी घरगुती हिंसेला गांभीर्याने घेत या हिंसेपासून आपला देश कशा पद्धतीने मुक्त होईल या घटकावर त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलेल आहे.

अर्थातच भारतानेही या गोष्टींना गांभीर्याने घेत, घरगुती हिंसेला एक दखलपात्र गुन्हा म्हणून घोषित केलेला आहे.

आणि या गुन्ह्याची संख्या कमी व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे पण दुर्दैवाने या उपाययोजना फक्त महिलांसाठीच राबवलेल्या दिसत आहेत.

 

ste.india.com

 

पुरुषांविरोधात घरगुती हिंसा होते तेव्हा त्यासाठी आपल्याकडे कायद्यात काहीच तरतूद नाही असे दिसते. याचाच परिणाम की काय म्हणून स्त्रिया मात्र अनेक ठिकाणी त्यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या या कायद्यांचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग करताना दिसत आहेत.

त्यांच्या नवऱ्याला किंवा सासरच्या मंडळींना त्रास देण्यासाठी यात दखल घेण्यासारखी गोष्ट अशी सरकार धरून कुठलीही संस्था पुरुषांच्या विरोधात होणाऱ्या घरगुतीहिंसा बाबत व्यक्त होताना दिसत नाही.

महिला पुरुषांवर आरोप करण्यासाठी सेक्शन ४९८ अ आणि हुंडा विरोधी कायद्याला एखाद्या शस्त्रासारखा वापरताना दिसत आहेत.

कलम ४९८ अ :

हे कलम स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी आणि तिच्या सासरकडच्या मंडळींनी जर तिच्यावर अन्याय केला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्या दुष्कृत्यासाठी त्यांना शिक्षा देण्यासाठी या कलमामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

सामान्यपणे नवरा आणि त्याचे पालक आणि नातेवाईक हे तात्काळ अटक केले जातात. कारण या प्रकारच्या गुन्ह्यांना अजामीनपात्र गुन्हा अशी नोंद घेऊन त्यांना लावण्यात येते.

जरी तक्रार खोटी असली तरी आरोपीला कोर्ट निर्दोष मुक्त करेपर्यंत त्याला गुन्हेगार म्हणूनच बघण्यात येते. जर आरोपी गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला तर त्याला जास्तीत जास्त शिक्षा म्हणून तीन वर्षाची जेल होऊ शकते.

कोर्टाचं महिलांनी केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल काय मत आहे, हा प्रश्न वरचं सगळं वाचल्या नंतर आपल्याला पडतो..

तर कोर्टालाही असं जाणवत आहे की सेक्शन ४९८ अ चा कुठेतरी गैरवापर होत आहे.

 

livelaw.com

 

सुप्रीम कोर्टाने त्याला अधिकृतपणे ‘दहशतवाद’ असे संबोधले आहे.

पण कोर्टही फेमिनिस्ट गटाकडून येणाऱ्या दबावामुळे हतबल आहे. राज्यसभेमध्ये यासंदर्भात “कायद्याचा गैरवापर झाला तर काय?” यासाठी एक बिल अडकून पडलेलं आहे.

जस्टीस मलिमाठ कर्नाटकाचे मुख्य न्यायाधीश होते.

त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने या संदर्भात अभ्यास केला या समितीने असा प्रस्ताव दाखल केला की सेक्शन ४९८अ हे जामीनपात्र आणि थोडे लवचिक असायला हवं.

पण अर्थातच या प्रस्तावाला सर्व फेमिनिस्ट संघटनांनी कडाडून विरोध केला आणि सरकारला या प्रस्तावाला थंड बस्त्यातच ठेवायला लागले.

जर तुमच्यावर अशा प्रकारची खोटी तक्रार दाखल करण्यात आली तर तुम्ही काय कराल?

जर तुमच्यावर तुमच्या पत्नीने अशा प्रकारची खोटी तक्रार केली तर तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतील. पहिला म्हणजे स्वतःचा बचाव करणे किंवा न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे तरसत राहणे!

खाली हे दोन्ही पर्याय विस्ताराने प्रस्तुत करण्यात आलेले आहेत.

पहिला पर्याय म्हणजे स्वतःचा बचाव करणे. यासाठी आपल्याकडे जेवढे असतील तेवढ्या प्रकारचे पुरावे एकत्र करणे.

पुढील काही घटक हे सर्व पुरावे एकत्र करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. प्रथमतः सर्व धमकीवजा संभाषण ध्वनिमुद्रित करणे- मग ती संभाषण कुठल्या प्रकारचे असो! ई-मेल पत्र आणि हे सर्व सुरक्षित ठेवावे.

 

india.com

 

यात एक असा सल्ला देण्यात येतो की कुणालाही सत्य प्रतीचे पुरावे दाखल करू नयेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचा हुंडा न मागीतल्याचे पुरावे उत्पन्न करणे.

कुठलेही तर्कशुद्ध कारण न देता तुमची बायको विवाह बंधनातून मुक्त झाली अशा प्रकारचे पुरावे तुम्ही कोर्टासमोर सादर करावे. या सर्व प्रकारचे पुरावे तुम्हाला कोर्टामध्ये जामीन मिळण्यासाठी फायद्याचे ठरतील.

तुमच्या कुटुंबाला संरक्षित करा

अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये पूर्ण कुटुंबच जेलमध्ये गेले. फक्त एका खोट्या तक्रारीमुळे सेक्शन ४९८अ अंतर्गत महिला कुटुंबातील कोणावरही आरोप दाखल करू शकतात.

अगदी नवऱ्याचे आई-वडील हे या सर्व प्रकाराला अपवाद नाहीत. यासाठी तुमच्या कुटुंबाला संरक्षित करणे हे महत्त्वाचं त्यासाठी खालील उपाय करणे बंधनकारक राहील.

जेव्हा एफआयआर दाखल होईल तेव्हाच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणे जेणेकरून कुठलाही निरपराध कुटुंब सदस्याला अटक होणार नाही.

भारतात असे आढळले आहे की विविध राज्यांमध्ये विविध प्रकारे या खोट्या तक्रारी हाताळल्या जातात. उदाहरणार्थ दिल्ली पंजाब हरियाणा आणि राजस्थान येथे अशा प्रकारच्या तक्रारीत प्रथमतः महिलांना पोलीस ठाण्यात पाठवले जाते.

येथे जोडप्यात असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर वाद मिटला नाही तर मग मात्र एफ आय आर दाखल केली जाते.

यावेळीही अटकपूर्व जामीन तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक होण्यापासून वाचवू शकते.

 

mobserver.co.za

 

उत्तर प्रदेशात एफ आय आर ही दाखल केली जाते पण तुम्हाला तीस दिवसांचा अवधी मिळतो ज्यामध्ये तुम्ही आपसातील वाद मिटवून निर्दोष मुक्त होऊ शकता पण बिहार आणि झारखंड येथील परिस्थिती मात्र खूपच वाईट आहे.

येथे मात्र कसलीही तपासणी न करता सरळ अटक केली जाते आणि तुम्हाला अटकपूर्व जामीनही मिळणे इथे फार कठीण आहे.

जर तुमच्यावर अशा प्रकारची खोटी तक्रार दाखल करण्यात आली तर मात्र तुम्ही सरळ नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुमच्या बायकोच्या विरुद्ध तिने तुम्हाला दिलेल्या धमकीच्या बद्दल विस्ताराने तक्रार दाखल करावी.

आणि त्यात तिने केलेल्या चुकीच्या आरोपांबद्दल आणि सहन न करता येणाऱ्या व्यवहाराबद्दल विस्ताराने कळवावे.

सर्व प्रकारच्या पुराव्यासहित ही तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांना ही विनंती करावी की तुम्ही दिलेल्या धमकी आणि चुकीच्या तक्रारीमध्ये तुम्हाला मानसिक त्रास झालेला आहे. होत आहे.

आणि याबद्दल पोलिसांनी तिची समजूत काढण्याची विनंती लवकरात लवकर करावी जेणेकरून या प्रकरणात तुम्ही फसण्याची शक्यता कमी होईल.

यानंतरचा टप्पा म्हणजे तुम्ही तुमच्यावर होणारा अन्याय प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मांडल्याने तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाची धग समाजापर्यंत पोहोचेल.

 

 

या सर्वांबाबत तुम्ही मानवाधिकार संघटनांकडे ही तक्रार करू शकता.

पुरुषांविरुद्ध होणाऱ्या खोट्या तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे ही एक गंभीर समस्या म्हणून बघितली गेली पाहिजे. या समस्याबद्दल प्रत्येक जणच जाणून आहे.

प्रत्येकाला हे माहिती आहे की महिला या कायद्यांचा गैरवापर करताना दिसत आहेत.

मध्यंतरी सरकारने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन काही मार्गदर्शक तत्त्वे या सर्वांसाठी दिलेली आहेत जेणेकरून या सर्व बाबतीत पुरुषांवर अत्याचार होणार नाहीत.

भारताचे सर्वोच्च न्यायालय या गोष्टी अत्यंत गांभीर्याने घेताना दिसून येत आहे आणि दिवसेंदिवस याबाबतीत प्रबोधन होईल आणि पुरुषांवर होणारा हा अन्याय थांबेल असा आशावाद व्यक्त करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version