Site icon InMarathi

पाकिस्तानात आहेत ही प्रसिद्ध “हिंदू” मंदिरं, विश्वास बसत नाहीये ना! मग हे वाचा

hindu temple in pakistan inmarathi

facebook

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

भारतीयांना मुघल आणि ब्रिटीश या दोन्ही शासनांच्या राजवटीत अनेक अत्याचारांचा सामना करावा लागला. दोघांनीही “भारताचे अनिर्बंधपणे शोषण केले”.

सर्वांनाच माहीत आहे की मुघलांनी भारतात हजारो मंदिरे नष्ट केली. हिंदूंची अनेक श्रद्धास्थळे आक्रमकांच्या पाशवी कृत्याने नष्ट झाली.

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि भारतभर जल्लोष झाला.

एकीकडे हा विजयाचा जल्लोष चालू होता, पण दुसरीकडे अगदी याच्या विरुद्ध जे चालू होतं ते थरकाप उडवणार होतं.

स्वातंत्र्याचा मुकुटमणी भारताचे डोक्यावर चढवला न चढवला तेव्हाच भारताच्या छातीवर एक जखम भलभळत होती आणि तिने उग्र रुप धारण केले होते.

ती जखम म्हणजे भारताची फाळणी आणि त्यासोबत झालेल्या हजारो लाखो निरपराध नागरिकांच्या कत्तली. स्वातंत्र्याच्या लक्ष लक्ष उषकालीच या यातना भारताच्या वाट्याला याव्यात याउपर दुर्दैव कुठलं?!

 

washington post

 

भारताचा उत्तर पश्चिम बाजूचा एक तुकडा आणि दक्षिणेकडच्या एक तुकडा तोडून पाकिस्तान हा नवीन देश बनत होता.

फाळणीची अपरिहार्यता लक्षात आल्यानंतर देशाच्या नेतृत्वाने ती स्वीकारली तर खरी, पण या सगळ्यात बळी जाणार होता तो सामान्य माणूस, निरपराध, निर्दोष!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीनंतर मुस्लिमांचे पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. ज्यात अनेक हिंदू मंदिरे होती.

फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये शेकडो मंदिरे नष्ट करण्यात आली. काही हिंदू मंदिर मशिद, हॉटेल किंवा ग्रंथालयांमध्ये रूपांतरित झाले. तथापि, देशात अजूनही अनेक हिंदू देवतांचे मंदिरे आहेत.

हो! यावर विश्वास ठेवणे कठीण आहे परंतु हे सत्य आहे की पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र जो भारताचा एक भाग होता, त्या पाकिस्तानमध्ये आजही काही हिंदू मंदिरं आहेत.

 

awaaznation.com

 

आज, मुसलमान भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १४% आहेत, तर पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या केवळ २% आहे.

पाकिस्तानमध्येही अनेक मंदिर उध्वस्त करण्यात आली, मात्र देशात अजूनही अनेक हिंदू मंदिर आहे. केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम आणि शीख बांधव देखील श्रद्धेने तिथे जातात.

पाकिस्तानमध्ये सर्वात लोकप्रिय हिंदू मंदिर येथे आहेत जी अद्याप अस्तित्वात आहेत.

१. हिंगलाज माता मंदिर, बलुचिस्तान

बलुचिस्तानमधील हिंगोल नदीवर स्थित गुहेच्या मंदिरास नानी मंदिर, हिंगलाज देवी आणि हिंगुला देवी असेही म्हटले जाते.

देवी सतीच्या शक्ती पीठांपैकी एक जिथे माता सतीचे डोके जमिनीवर पडले. या मंदिराचा उल्लेख पौराणिक कथांमध्येही आढळतो.

 

samacharjagat.com

 

पाकिस्तान आणि जगभरातील मोठ्या संख्येने पर्यटक या मंदिराला भेट देत असतात.

हिंदूं या मंदिराला ‘शक्तिपीठ’ किंवा ‘देवी मंदिर’ म्हणतात, तर मुस्लिम ‘नानी’ किंवा ‘बीबी नानी’ का मंदिर या नावाने संबोधतात.

प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात हिंगलाज मंदिर येथे चार दिवसांची यात्रा आयोजित केली जाते. नवरात्रीमध्ये देखील या मंदिरात श्रद्धाळूंची मोठी गर्दी होते.

 

२.  कटासराज मंदिर, पंजाब प्रांत, पाकिस्तान

पाकिस्तानातील पंजाबच्या चकवाल जिल्ह्यात असलेले, कटासराज मंदिर शिवमंदिर आहे. हे महाभारतकालीन मंदिर आहे. हा परिसर सात मंदिरांचा समूह म्हणून पण ओळखला जातो.

 

dawn.com

 

पांडवांनी आपल्या वनवासादरम्यान या भागात चार वर्षे वास्तव्य केल्याची मान्यता आहे. मंदिर आज भग्न अवस्थेत आहे. तरी, तलाव अतिशय पूज्य मानला जातो.

सती देवीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या भगवान शिवाच्या अश्रूंपासून या तलावाची निर्मिती झाल्याची आख्यायिका आहे.

असे मानले जाते की, काही विशिष्ट प्रसंगी तलावामध्ये स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो.

परंतु आता या मंदिराच्या आजूबाजूला सिमेंटचे मोठे कारखाने उभे राहिल्याने पाण्याची पातळी वेगाने घटत आहे.

आजूबाजूला हिंदू वस्ती देखील राहिली नाही आहे. २००५ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी देखील या मंदिराला भेट दिली होती.

 

३.  पंचमुखी हनुमान मंदिर, कराची

कराचीच्या सैनिक बाजार येथे असलेले, पंचमुखी हनुमान मंदिर हे भगवान हनुमानाचे १५०० वर्ष जुने मंदिर आहे. बहुतेक मंदिरांपेक्षा हे वेगळे आहे कारण त्यात हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे.

 

patrika.com

 

होय, ही मूर्ती नैसर्गिकरित्या तयार झाली आहे आणि ही मूर्ती देवतेच्या सर्व पाच अवतारांचे  प्रतिनिधित्व करते.

सर्व जाति, पंथ, आणि धर्माचे लोक मंदिराला भेट देतात आणि मानतात की या मंदिरात येऊन दर्शन घेतल्याने त्यांची इच्छा पूर्ण होईल.

हे एकमेव मंदिर आहे जे परिसरातील मंदिरांचा बाबरी मशीद पाडल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नाश झाल्यानंतरही टिकून राहिले.

४. जगन्नाथ मंदिर, पंजाब प्रांत, पाकिस्तान

पाकिस्तानमधील सियालकोट येथे भगवान जगन्नाथाचे मंदिर आहे. आज ते भग्न अवस्थेत आहे. मात्र अनेक भाविक या मंदिराला भेट देत असतात.

 

Mycitylinks.com

 

या मंदिराच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

पाकिस्तान सरकारने या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही प्रयत्न केले आहेत. पण पर्यटन स्थळ म्हणूनच ते विकसित झाले आहे. मूळ मंदिराच्या अवस्थेत त्याने फारसा काही फरक पडलेला नाही.

ही पाकिस्तानमधील काही मंदिरे आहेत जिथे श्रद्धाळू येत असतात. भारतीयांना ते इतके सहज शक्य नाही. पण जगभरातून भाविक इथे येत असल्याचे स्थानिक गाईड सांगतात.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version