Site icon InMarathi

भारतीय सेलिब्रिटीज ‘कॅन्सरवर’ उपचार घ्यायला परदेशीच का जातात? जाणून घेऊया!

sonali bendre inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या करोना व्हायरसने जगात थैमान घातलं आहे.सगळेच स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण असाच आणखीन एक आजार आहे ज्यातून कोणालाही सहजा सहजी बाहेर पडता येत नाही किंबहुना हा आजार झाला म्हणजे माणूस संपलाच असंच मानलं जातं, तो आजार म्हणजे ‘कॅन्सर’!

 

 

पण काही प्रसिद्ध व्यक्ती किंवा सेलिब्रिटीज ज्यांना हा आजार होतो, ते मात्र बाहेरच्या देशात जाऊन बरे होऊन येतात हे तुम्हाला ठाऊक असेलच!

भारतातील प्रसिद्धी माध्यमांना नेहमी पडला पाहिजे असा प्रश्न म्हणजे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती कॅन्सरवरील उपचारांसाठी नेहमी परदेशीच का जातात? असं काय आहे जे भारतात नाही पण परदेशात सापडतं. आज आपण म्हणतो की तंत्रज्ञानामुळे भारत पुढे गेला.

अनेक प्रकारचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे, विकसित केलं जातंय. भारतातील इस्रो ही संस्था जागतिक उच्चांक मोडत अनेक प्रकारचे विश्वविक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे.

 

 

त्याकडे वाटचाल करताना दिसत आहे भारताचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित होत आहेत. एवढे सगळे असताना अशी काय वेळ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींवर येते की कॅन्सर झाल्यानंतर त्यांना परदेशच आठवतो.

उदाहरणच जर बघायचे झाले तर पहिलं उदाहरण आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग! ज्यावेळी त्याला कॅन्सरचं निदान करण्यात आलं त्यावेळी तो अमेरिकेत गेला.

 

 

दुसरं सर्वश्रुत उदाहरण म्हणजे जेव्हा राज कपूरची कन्या रितू नंदा हिला कॅन्सर झाला तेव्हा राज कपूर साहेबांनाही अमेरिकाच कशी आठवली.

भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अनेक प्रकारच्या उपचारांसाठी परदेशात जातात. एवढं का सोयीस्कर वाटतं परदेशात जाणं.

अगदी सोनिया गांधी याही मध्यंतरी उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत असं सांगण्यात आलं. याबाबतीत भारतातील काही अग्रणी आणि प्रसिद्ध डॉक्टरांशी संवाद साधला असता त्यांचं याबाबतीत असलेल मत आपण खाली बघुयात.

भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रणीचे कॅन्सर सर्जन डॉक्टर आर. बडवे टाटा मेमोरिअल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर.. यावर ते म्हणाले की

“आम्ही भारतात त्या सर्व उपचार पद्धती अवलंबतो आहोत ज्या परदेशात वापरल्या जातात. आज भारतातही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे”

 

 

डॉक्टर आशिष बक्षी जे एक प्रसिद्ध अपलॉजईस्ट आहेत त्यांनीही याचा पुनरुच्चार केला की,

“भारतात त्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत ज्या सोयीसुविधा अमेरिकेत किंवा इतर परदेशात उपलब्ध आहेत.”

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांना २००४ मध्ये अॅक्युट लेऊकेमिया या आजाराचे निदान करण्यात आले होते, त्यांना असं सांगण्यात आलं होतं की त्यांच्याकडे फक्त दोनच महिने शिल्लक आहेत.

 

 

त्यांनी संघर्ष करायचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी भारतातच यशस्वीपणे या आजाराशी संघर्ष केला. भारतात अशी अनेक यशस्वी उदाहरणे बघायला मिळू शकतात.

तसं पहायला गेलं तर परदेशातील ट्रीटमेंट आणि भारतातील ट्रीटमेंट यामध्ये खर्चिक फरक नक्कीच आहे. परदेशात जाऊन कॅन्सरचा उपचार घेणं हे भारतापेक्षा दहापट अधिक खर्चिक असू शकतं.

परदेशामध्ये उपचार घेणं हे भारतीयासाठी कदाचित कमी सोयीस्कर ठरू शकतं. कारण ओळख आणि संघर्ष करण्यासाठी आपल्या परिवाराच्या लागणारा पाठिंबा या दोन गोष्टी पीडित व्यक्ती साठी अमृताचं काम करत असतात.

सध्याच्या काळात जग एवढं पुढे गेलं आहे, की जर एखादं औषध परदेशामध्ये मध्ये लॉन्च झालं तर ते त्याच वेळेस भारतासह इतरही देशांमध्ये उपलब्ध असतं. क्वचित वेळा त्यामध्ये फक्त तीन महिन्यांचा अवधी असू शकतो.

एवढं सगळं असतानाही उपचारासाठी परदेशातच का? त्याचं कारण असू शकतं भारतीय मानसिकता आणि गोपनीयता.

 

 

आपल्याकडील प्रसिद्ध व्यक्तींचं आयुष्य एवढं सामाजिक होऊन जातं की त्यांची छोटीशी कृती सुद्धा प्रसिद्धीमाध्यमांना ब्रेकिंग न्यूज वाटायला लागते. याच भीतीतून आपलं कॅन्सरचं दुखणं जगापुढे येऊ नये यासाठी कदाचित भारतीय प्रसिद्ध व्यक्ती परदेशातून उपचार घेत असाव्यात.

तसं बघायला गेलं तर भारतात डॉक्टर आणि पेशंट यांच्या प्रमाणाची तुलनात्मक चिकित्सा जर केली तर आपल्याकडे असे लक्षात येईल की भारतात हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

कॅन्सर पेशंट्सची संख्या भरपूर आहे आणि ती प्रत्येक वर्षाला वाढत आहे. असं असताना कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची जबाबदारी आणि गरज हे दोन्ही घटक त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीयेत.

ज्या प्रमाणात भारतात कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत, कदाचित या घटकाचाही परिणाम आपण म्हणू शकतो ज्यामुळे भारतातील पेशंट बाहेर परदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार घेत आहेत.

तसं पाहिलं तर भारतापेक्षा परदेशात कॅन्सर हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. त्यामुळेच कदाचित तेथील डॉक्टरांना कॅन्सरवर उपचार करण्याचे हातखंडे चांगल्या प्रमाणात माहिती झालेले असू शकतात.

 

 

एका सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे, की परदेशात नवनवीन प्रकारचे उपक्रम आणि प्रात्यक्षिक राबवले जातात. जेणेकरून कॅन्सरवरील उपचारासाठी मदत होईल आणि उपचार जलदरित्या होतील.

हे सर्व घटक परत परत एकच गोष्ट अधोरेखित करतात ती म्हणजे गोपनीयता! भारतात कॅन्सरबद्दल असणाऱ्या गैरसमजामुळे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती हे कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जातात.

पण खरंच, ‘भारतातील सामान्य व्यक्तीला परदेशात जाऊन तिथे राहून उपचार घेणं शक्य होईल का?’ हा प्रश्न प्रत्येक सामान्य भारतीय व्यक्तीच्या मनात एकदा तरी डोकावून गेला असेलच की?

खरं म्हणजे वास्तविकता पाहता सामान्य व्यक्तीच्या आवाक्यात न येणारा असाच हा खर्च आहे.

आताच्या काळात मेडिकल टुरिझमकडे व्यापक अर्थाने वाढणारा उद्योग म्हणूनही बघण्यात येत आहे. भारतातही वैद्यकीय मदतीची कमी नाहीये. भारत खऱ्या अर्थाने वैद्यकीय उपलब्ध उपचारांचे केंद्र बनत चाललेला आहे.

 

 

आज भारतात कितीही किचकट शस्त्रक्रिया लीलया केली जाते. याउलट परदेशातूनच काही परदेशी नागरिक भारतात उपचारासाठी येताना दिसतात पण भारतीय प्रसारमाध्यमं मात्र या घटकांना हवं तेवढं प्रकाश झोतात आणताना दिसत नाहीत.

परदेशी नागरीक भारतात उपचार घेतात याचे कारण भारतात तुलनेने स्वस्त आणि जलद उपचार केले जातात असा त्यांचा मानस आहे.

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींकडे जास्त करून विमा संरक्षण असते मग अशा वेळेस या विमा संरक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ उचलता यावा यासाठी कदाचित भारतातील प्रसिद्ध व्यक्ती परदेशात उपचारासाठी जात असावेत.

तसंही मेडिकल टुरिझमच्या नावाखाली या सेलिब्रिटिजना विमान तिकीट, हॉटेल, उपचार या सर्व गोष्टींना जोडून एक चांगल्या प्रकारचं पॅकेज डील प्रस्तावित केलं जातं. मग कोण कशाला भारतात उपचार करून घेईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version