Site icon InMarathi

जगातली सर्वात उंच मूर्तीं कोणती? हे तुम्ही वाचायलाच हवं!

avaji-inmarathi

indiatimes.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

एखाद्या महान व्यक्तीला आदरांजली वाहायची असेल तर, तसेच पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्या व्यक्तीची कायम आठवण राहावी म्हणून त्याचा पुतळा उभारण्याची पद्धत जगात सगळीकडे आहे.

तसेच शक्य होईल तितका उंच पुतळा बनवला तर ते जगातल्या सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतं आणि त्या व्यक्तीची जगात सगळ्यांना आठवण राहते.

प्रत्येक देशात असे काही प्रसिद्ध स्मारकं किंवा पुतळे आहेत आणि ते बघायला देशोदेशीचे पर्यटक जातात. हल्ली तर काय एकापेक्षा एक उंच स्मारके बनवण्याची स्पर्धाच लागली आहे.

आज आपण जगातल्या अश्याच सर्वात उंच मूर्तींबद्दल माहिती घेणार आहोत.

१०. अवाजी कन्नन

जपानमधील ह्योगो प्रिफेक्चर बेटावरील वर्ल्ड पीस जायन्ट कन्नन हे एक मंदिर आणि म्युझियम आहे. ह्या मूर्तीचे बांधकाम १९७७ साली सुरु झाले.

ही मूर्ती पाच मजली इमारतीवर बांधली आहे. ही मूर्ती ८० मीटर म्हणजे २६० फूट उंच आहे.

 

bbcl.com

 

ही मूर्ती कन्नन ह्या बौद्ध धर्मातील देवतेची आहे. ह्या संपूर्ण बेटावरून ह्या मूर्तीचे दर्शन होते.

एका स्थानिक व्यावसायिकाने ओसाका येथे जाऊन रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला. त्याला त्या व्यवसायात खूप फायदा झाला. आणि त्याने ही मूर्ती उभारली. तसेच म्युझियम सुद्धा बांधले.

परंतु त्या व्यावसायिकाच्या व त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर हे स्मारक बंद पडले. तसेच ह्या मूर्तीची देखभाल सुद्धा करण्यात आली नाही.

त्यामुळे आज ती इमारत पर्यटकांसाठी सुरक्षित राहिलेली नसल्याने येथे पर्यटकांना जाण्याची परवानगी नाही.

९. रॉडीना -मॅट झाव्योत्त (द मदरलँड कॉल्स)

हे रशियाच्या व्होल्गोग्रॅड शहरातील स्मारक बॅटल ऑफ स्टॅलिनग्रॅड ह्या युद्धात मातृभूमीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीला समर्पित करण्यात आले आहे.

 

youtube.com

 

१९६७ साली हे स्मारक जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून घोषित करण्यात आले होते.

आजही हे स्मारक युरोपातील सर्वात उंच स्मारक आहे. तर जगभरातील स्त्रियांच्या स्मारकांपैकी हे आजही जगातील सर्वात उंच स्मारक आहे.

१५ ऑक्टोबर १९६७ रोजी ह्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. ह्या स्मारकाची उंची ८५ मीटर म्हणजेच २७९ फूट आहे.

युद्धाच्या तयारीत असलेली तलवार घेतलेली स्त्री असा हा पुतळा आहे. ती तलवार घेतलेली स्त्री म्हणजे मातृभूमीचे प्रतीक आहे.

८. दाई कन्नन ऑफ किता नो मियाको पार्क

दाई कन्नन ऑफ किता नो मियाको पार्क किंवा होक्काइदो कन्नन किंवा Byakue कन्नन हे स्मारक जपान मधील तिसरे सर्वात उंच स्मारक आहे.

१९८९ साली बांधून झाल्यानंतर हे जगातील सर्व उंच स्मारक होते. ह्या स्मारकाची उंची ८८ मीटर म्हणजे २८९ फूट आहे.

 

flickr.com

 

हे स्मारक अवलोकितेश्वरा किंवा पद्मपाणी किंवा बोधिसत्व किंवा चायनीज भाषेत Guan Yin ह्यांना समर्पित आहे.

हे स्मारक होक्काइदो बेटावरच्या किता नो मियाको पार्क मध्ये आहे. ह्या वीस मजली स्मारकात आठ ठिकाणी प्रार्थनास्थळे आहेत.

७. थायलंडची बुद्ध प्रतिमा

ग्रेट बुद्ध स्टॅच्यू ऑफ थायलंड किंवा द बिग बुद्धा ही थायलंड मधील सर्वात उंच मूर्ती आहे. अँग थोंग प्रदेशातील वॅट म्यूआंग मंदिरात मी मूर्ती आहे.

 

phunket,com

 

ही भगवान बुद्धांची मूर्ती ९२ मीटर म्हणजे ३०२ फीट उंच व ६३ मीटर म्हणजे २१० फूट रुंद आहे.

१९९० साली ह्या मूर्तीचे काम सुरु झाले व २००८ साली हे बांधकाम पूर्ण झाले. ही मूर्ती काँक्रीटची असून सोन्याच्या रंगाने रंगवली आहे

६. वेईशन ऑफ इअन्शॉ कियाँ गुईन

हे स्मारक चीनच्या वेईशन, चांगशा हुनान प्रांतात असून गुईन म्हणजेच अवलोकितेश्वर ह्यांना समर्पित आहे.

 

en.wikipedia.org

 

गिल्डेड ब्रॉन्झची ही मूर्ती ९९ मीटर म्हणजे ३२५ फूट उंच आहे.

२००९ साली बांधलेल्या ह्या स्मारकासाठी २६० दशलक्ष युआन इतका खर्च आला. ह्या मूर्तीला Guishan Guanyin of the Thousand Hands and Eyes असेही म्हणतात. ही चीनमधील चौथी सर्वात उंच मूर्ती आहे.

५. सेंडाई डाईकानन

जपानच्या सेंडाई भागात हे स्मारक आहे. न्योइरीन कन्नन ह्यांचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. कन्नन किंवा अवलोकितेश्वर किंवा बोधिसत्व ह्यांचा हा पुतळा आहे.

 

sendai-travel.jp

 

जगातील सर्वात उंच स्मारकांमध्ये हे स्मारक पाचवे आहे. ह्या मूर्तीची उंची १०० मीटर म्हणजेच ३३० फूट आहे.

हे स्मारक १९९१ साली बांधून झाले तेव्हा ते जगातील सर्वात उंच स्मारक होते. ह्या मूर्तीमध्ये बोधिसत्वांच्या हातात एक विशिंग जेम म्हणजे रत्न आहे.

४. उशिकू दायबुत्सु – जपान

उशिकू दायबुत्सु हे जपानमधील उशिकू, इबराकी प्रीफिक्चर भागात आहे. हे स्मारक भगवान गौतम बुद्ध ह्यांना समर्पित आहे.

 

texax.com

 

ह्या स्मारकाचे बांधकाम १९९३ साली पूर्ण झाले. भगवान बुद्धांची इथली मूर्ती ही १२० मीटर म्हणजे ३९० फूट उंच आहे.

ह्याचा वेस ३३ फूट आहे आणि त्यावर १० मीटर उंचीचे कमळ आहे.

२००२ पर्यंत ही जगातील सर्वात उंच मूर्ती होती. ही भव्य मूर्ती ब्रॉन्झपासून बनवलेली आहे व भगवान बुद्धांचे अमिताभ रूप दाखवते.

३. नानशान हाईशांग

चीनमधील, हेनान भागात हे स्मारक आहे. हे स्मारक वैरोकाण बुद्धांना समर्पित आहे. बोधिसत्वांची ही भव्य मूर्ती १०८ मीटर म्हणजे ३५४ फूट उंच आहे.

 

tripadvisor.com

 

ह्या मूर्तीला तीन पैलू आहेत. ह्या मूर्तीची एक बाजू चीनच्या भूप्रदेशाच्या बाजूला आहे आणि इतर दोन बाजू ह्या दक्षिण चिनी समुद्राच्या बाजूला आहेत.

भगवान बोधिसत्वांची चीन व संपूर्ण जगावर कृपादृष्टी आहे असा त्याचा अर्थ आहे.

मूर्तीच्या एका बाजूला बोधिसत्वांच्या डाव्या हातात सूत्र असल्याचे दाखवले आहे तर त्याच्या उजव्या हाताने त्यांनी वितर्क मुद्रा दाखवली आहे.

मूर्तीच्या दुसऱ्या बाजूला बोधिसत्वांच्या हातात प्रार्थनेसाठी जपमाळ दिसते तर तिसऱ्या बाजूला त्यांच्या हातात कमळ असल्याचे दिसते.

ही बोधीसत्वांची जगातली सर्वात उंच मूर्ती आहे.

ही मूर्ती बांधण्यासाठी सहा वर्षे लागली आणि तैवान, हॉंगकॉंग, मकाऊ, चीन आणि इतर ठिकाणच्या १०८ भिक्खुंनी ह्यासाठी साहाय्य केले. २४ एप्रिल २००५ रोजी ह्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

२. स्प्रिंग टेम्पल बुद्धा- चीन

चीन मधील हे मंदिर वैरोकाण बुद्धांना समर्पित केले आहे. चीनच्या लुशान भागातील हेनान येथे ही मूर्ती उभारली आहे.

१९९७ ते २००८ पर्यंत ह्या स्मारकाचे बांधकाम सुरु होते. २०१८ पर्यंत ही जगातील सर्वात उंच मूर्ती होती.

 

cnn.com

 

कमळाच्या आसनावर येथे भगवान बुद्ध विराजमान असलेले दिसतात. ह्या भव्य मूर्तीची उंची १८२ मीटर म्हणे ५९७ फूट आहे. भगवान बुद्धांना ही मूर्ती समर्पित केली आहे. ह्या मूर्तीच्या खाली मठ आहे.

ह्या स्मारकाला स्प्रिंग टेम्पल बुद्धा असे म्हणतात कारण येथे जवळच Tianrui hot spring हा गरम पाण्याचा झरा वाहतो.

ह्या झऱ्याच्या पाण्याचे तापमान ६० डिग्री सेल्सियस इतके गरम असते. ह्या ठिकाणी रोग्यांचे आजार बरे होतात अशी मान्यता आहे.

१. स्टॅच्यू ऑफ युनिटी

भारताचा अभिमान असलेले स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातील सर्वात उंच स्मारक आहे. गेल्याच वर्षी उद्घाटन झालेले हे स्मारक भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना समर्पित करण्यात आले आहे.

 

dnaindia.com

 

स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे तुकडे होऊ नयेत व देश एकसंध राहावा ह्यासाठी सरदार पटेल ह्यांनी जीवाचे रान केले.

त्यांना आदरांजली म्हणून हे स्मारक बांधण्यात आले आहे. हे स्मारक साधू बेट, सरदार सरोवराच्या जवळ गुजरात मध्ये आहे.

ह्या स्मारकाची उंची १८२ मीटर आहे तसेच वजन १७०० टन आहे. जगातील सर्वात उंच स्मारक असलेले हे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे आपल्या देशाची शान आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version