Site icon InMarathi

बामसेफ तर्फे द्वेष पसरवण्यासाठी खोट्या बातम्या पेरल्या जाताहेत का? : मीडिया रिपोर्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

एक तडफदार तरुण धम्मदीप थोरात ज्याने पिवळ्या रंगाचा गॉगल आणि निळ्या गमजा घातलेला होता वडु बुद्रुकला आला होता त्याच्यासोबत एक ३५ वर्षीय भीमराव बाविस्कर जे नांदेडहुन जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी कोरेगाव-भीमा येथे आले होते. कोरेगाव-भीमामध्ये त्या दिवशी सामाजिक एकता आणि चैतन्याचे वातावरण होते.

पण या वातावरणातही वंचित इतिहासाच्या पाऊलखुणा अधिक गडद करणारं वातावरण जास्त जाणवत होत.

स्वघोषित दलित हक्क संवर्धनासाठी काम करणारे यूट्यूब चैनल्स पुस्तक आणि स्वघोषित दलितांसाठी काम करणाऱ्या संघटना उदाहरणात बामसेफ अशा अनेक गोष्टी या सर्व प्रकाराला एक विध्वंसक वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सर्व संघटना किंवा या सर्व गोष्टी आजच्या तरुणाची मानसिकता विद्रोही आणि त्याचे माथी भडकवण्याचे काम चुकीचा इतिहास सादर करून करत आहेत.

 

 

थोरात औरंगाबाद येथे प्रथम वर्षाचे शिक्षण घेतोय. पहिल्याच वेळेस भीमा कोरेगाव येथे आला होता. त्याने सांगितलं

“मी इथे आलोय कारण की मागच्या वर्षी माझ्या दलित बांधवांवर मनुवाद्यांनी हल्ला केला आणि आम्ही इथे आमची ताकद दाखवण्यासाठी आलेलो आहोत.”

थोरात सोबत वढू बुद्रुक येथे वीस वर्षाचा बुधभूषण गायकवाड होता. जेव्हा त्याला वडु बुद्रुक बद्दल विचारले त्यावेळेस त्यांने की सांगितले

“ब्राह्मण समाजाने नेहमीच दलितांवर अन्याय केलाय, त्यानंतर संभाजी महाराजांचा एक विश्वासू सैनिक गोविंद गोपाळ महार जे दलित होते त्यांनी संभाजी महाराजांचे अंत्यविधी उरकले. पेशव्यांनी धमकी देऊनही त्यांनी महाराजांचे अत्यंविधी केले”

गायकवाडने पुढे सांगितले “वडू वडू बुद्रुक संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ महार यांच्या समाधीसाठीही प्रसिद्ध आहे” या सर्वांमध्ये मजेशीर गोष्ट अशी की गायकवाडने जो भला मोठा इतिहास सांगितला याला कुठलही शास्त्रीय कारण किंवा वास्तविकतेचा आधार नाही.

संभाजी महाराजांना औरंगजेबाने मार्च ११ मार्च १६८९ रोजी पकडले. त्यांना त्रास दिला आणि त्यांची निर्घृण हत्या केली.. आणि नानासाहेब पेशवे ज्यांना गायकवाड संभाजी महाराजांचे खुनी म्हणतात त्यांचा जन्मच १७२० साली झाला आहे.

 

 

जेव्हा त्याला या सर्व इतिहासाचा स्रोत विचारलं त्यावेळेस त्याने असं सांगितलं आम्हाला ही सगळी माहिती सम्यक एमएनटीवी युट्युब चॅनेल मार्फत तसेच सम्राट वृत्तपत्र आणि “भीमा कोरेगाव ची शौर्यगाथा”या पुस्तकामार्फत मिळालेली आहे. पण भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक या दोन्हीच्या इतिहासाबाबत सर्वात जास्त माहिती आम्हाला आमच्या समाजाच्या सोशल मीडियावर जास्त कळाली.

थोरात असे म्हणाला की माझा संपूर्ण परिवार हे चॅनेल्स बघतो ज्यात असं सांगितलं जातं की ब्राह्मणांनीच संभाजी महाराजांची हत्या केली. बऱ्याच तरुणांमध्ये हा गैरसमज पसरवण्यात येत आहे.

यांच्याशी न्यूज लॉन्ड्री ने संवाद साधला. सचिन बनसोडे हा २१ वर्षीय तरुण जो कोरेगाव भीमा येथे प्रथमतःच आलेला होता त्याने सांगितलं,

“मी इथे आलो आहे कारण गेल्या वर्षी माझ्या समाजबांधवांवर येथे हल्ला झालेला. आम्ही जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या ५०० महार सैनिकांनाही मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत ज्यांनी २५००० पेशवे ब्राह्मणांना हरवले.”

बनसोडे म्हणाला की “बाजीराव पेशव्यांनी संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे भीमा नदी मध्ये फेकले.”

रिपोर्टरने त्याला सांगितलं की हे कृत्य तर औरंगजेबाने केलेले त्यावर तो म्हणाला “नाही सर औरंगजेबाने नाही, संभाजी महाराजांना बाजीराव पेशव्याने मारलं” अर्थात त्याचाही माहितीचा स्रोत इतरांप्रमाणेच सम्यक आणि एम एन टीव्ही चे युट्युब चॅनेल्स होता.

 

 

मागच्या वर्षी २९ डिसेंबर रोजी वडु बुद्रुक येथे तणावाचे वातावरण होते आणि याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर फिरवण्यात आलेल्या विद्रोही पोस्ट.

एक बॅनरही लावण्यात आलेले होते ज्यात असे सांगण्यात आले होते की संभाजी महाराजांच्या हत्येनंतर त्यांचा अंत्यविधी गायकवाड यांनी केले आणि मराठा समाज पुढे आला नाही.

एम एन टीव्ही किंवा एम .एन. न्यूज ही युट्युब चॅनल्स मूलनिवासी प्रकाशन संस्था चालवते, जी बामसेफच्या अखत्यारीत येते.

बामसेफ महाराष्ट्र पोलिसांच्या तपास यंत्रणांच्या रडारवर आधीपासूनच होती बामसेफ ही संघटना आहे जी अशी मांडणी करते की पेशव्यांनी औरंगजेबासोबत संधान साधून संभाजी महाराजांची हत्या केली.

याबद्दल यूट्यूबवर अनेक व्हिडिओ सापडतील. उदाहरणार्थ बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम एका सभेमध्ये असे बोलले की  “संभाजी महाराजकी हत्या ब्राह्मनोंने की है”.

भारत मुक्ती मोर्चा ही अशाच प्रकारचे विचारधारा पुढे घेऊन जाताना दिसत आहे. यासाठी विलास खरात नामक व्यक्तीने एक पुस्तक लिहिलेले आहे. या सर्वांच्या खोलात गेल्यावर लक्षात येतं की हा विलास खरात हाही बामसेफचा एक कार्यकर्ता आहे जो दिल्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र चालवतो.

खरातने लिहिलेले पुस्तक बामसेफने १९ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं “१ जानेवारी १८१८ :स्वातंत्र्याचे बंड”. या पुस्तकामध्ये खरात ने ब्राह्मण मुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली होती.

 

 

न्यूजलॉन्ड्रीने खरातच्या हिंदी आवृत्तीचा अभ्यास केला. खरातने असे लिहिले आहे की

“पंडित जवाहरलाल नेहरू, गोळवलकर गुरुजी, श्रीपाद अमृत डांगे, सविता कबीर आणि डॉक्टर मालवणकर या सर्व ब्राह्मणांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या केली”.

त्याने असे लिहिले की काँग्रेस बीजेपी आणि कम्युनिस्ट पार्टी मधील ब्राह्मण सक्सेना कमिशनच्या रिपोर्ट ला कधीच पुढे आणत नाही ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यू बद्दल दस्ताऐवज आहेत. आणि यातील सविता कबीर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी आहेत.

खरात लिहितो की ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा येथील युद्धातील नागवंशी सैनिकांच्या स्मरणार्थ हा जयस्तंभ बांधला पण केंद्र शासनाने १९६५ आणि १९७१ मधील पाकिस्तान सोबतच्या युद्धातील एकूण २९ शहीदांच्या स्मरणार्थ जयस्तंभावर त्यांची नावे कोरली आहेत. आणि ही नावे काढली गेली पाहिजेत असे त्याचे म्हणणे आहे.

खरात असंही लिहितो की “जर १ जानेवारी २०१८ पर्यंत हे फलक काढले गेले नाहीत तर मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना लोकांच्या भडकलेला भावनांना सामोरे जायला लागेल”.

बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. त्याने असे लिहिले की केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी उच्चवर्णीयांच्या नावाचे फलक या स्तंभावर लावून कोरेगाव भीमाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

 

न्यूजलाँन्ड्रीने वामन मेश्राम यांना ब्राह्मणांना घातलेल्या दंगलीच्या धमकीविषयी विचारले असता ते असे म्हणाले “जर त्याने (म्हणजेच खरातने) असे लिहिले असेल तर मला ते मान्य नाही.

कुठल्याही समाजाच्या विरूद्ध दंगल पेटवणे हे योग्य नाही, माझा याला पाठिंबा नाही. पण मी असे नक्कीच म्हणतो त्या सैनिकांसाठी वेगळे फलक लावण्यात यावेत.

१९६५, १९७१ मधील शहीद सैनिकांचा मी मान ठेवतो पण त्यांच्यासाठी दुसरे स्मारक बांधण्यात यावे सरकारकडे जर यासाठी पैसे नसतील तर आम्ही सर्व मिळून देऊ.

न्यूजलॉन्ड्रीने ज्यावेळेस त्यांना चुकीचा इतिहास पसरवण्याबद्दल विचारलं त्यावेळी मेश्राम असं म्हणाले की “माझा फँसीझमला पाठिंबा नाही. मी कधीही कोणालाही ब्राह्मणांना मारायला सांगितलं नाही. कोणी म्हणत असेल की बाजीराव पेशव्यांनी संभाजी महाराजांची हत्या केली त्यामागे त्यांची भावना असेल.

पण शेवटी हे सत्य आहे की पेशवे आणि औरंगजेब यांनी संभाजी महाराजांना संपवण्यासाठी संधान साधले हो. ते मी ब्राह्मण समाजाच्या विरोधातील जातीय हिंसाचाराला कधीही पाठिंबा दिलेला नाही पण याचा असा अर्थ थोडीच आहे की आपण लोकांना खऱ्या इतिहासाबद्दल प्रबोधन करणे बंद केले पाहिजे?!”

 

vilaskharat.blogspot.com

जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की कुठल्या पेशव्याने संभाजी महाराजांची हत्या केली त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितले की “मला माहित नाही ते कुठले पेशवे होते ज्यांनी संभाजी महाराजांना मारले मी इतिहास तज्ञ नाही.”

खोट्या मांडणी मुळेच जातीय हिंसाचार निर्माण होतो

इतिहास अभ्यासक हरी नरके यांनी मुख्यत्वे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणावर लिखान केलेले आहे ते बामसेफ बद्दल म्हणतात की अशा प्रकारच्या लेखनाचे वाचन करण्याआधी वास्तविकता समजून घेणे गरजेचे आहे.

१९८९ ज्यावेळी संभाजी महाराजांची हत्या झाली त्यावेळी बाजीराव पेशवे यांचा जन्मही झालेला नव्हता. बामसेफला खोटे लिहिण्याची सवय जडलेली आहे”

खरात च्या पुस्तकावर आणि वामन मेश्राम यांच्या भडकाऊ भाषणावर कोरेगाव भीमा कमिशनसमोर एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ज्यात असे म्हटले आहे की या दोन्ही संघटनांवर जातीय दंगली भडकल्या बद्दल कारवाई करण्यात यावी.

या याचिकेत असं म्हटलेलं आहे की खरात यांचे पुस्तक “१ जानेवारी १८१८: स्वातंत्र्याचे बंड” यात लिहिलेल्या चुकीच्या इतिहासामुळे जातीय हिंसाचार याला बढती मिळली. या याचिकेमध्ये त्या सर्व पानांची यादी केलेली आहे ज्यात चुकीचा इतिहास पसरविला गेलेला आहे.

या याचिकेमध्ये मेश्राम यांच्या एका भाषणाचा उल्लेख केलेला आहे जे आपल्याला युट्युब वर सापडू शकते. हे भाषण ३० मार्च २०१८ रोजी दिलेले आहे. यात मेश्राम असे म्हणतात की “ब्राह्मण समाजाचे न्यायमूर्ती यांनी कायमचा अन्याय केलेला आहे. न्यायासाठी त्यांना जाळणे योग्य नाही का?”.

 

nationalspeak.com

सागर शिंदे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांचे म्हणणे आहे की विलास खरात लिखित हे पुस्तक ऑक्टोबर २०१७ रोजी प्रकाशित झाले आणि एक जानेवारीला दंगली घडल्या ते पुस्तक जयस्तंभाबद्दल होते.

या पुस्तकात दंगलींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे मी याचिका दाखल केली आहे. आणि याच्यावर कारवाई करण्यात यावी. या पुस्तकावर कोरेगाव भीमाच्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात यावी.

संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण असं म्हणतात की आम्ही यावर्षी या सोहळ्यात बामसेफ वर बारीक लक्ष ठेवून होतो. यापुढेही ठेवू.

आम्हालाही माहिती आहे की ब्राह्मणांबद्दल चुकीचा इतिहास पसरवन्यात बामसेफ या संघटनेचा हात आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही ठोस पुराव्यांच्या शोधत आहोत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version