लिबरलांच्या सेनापती, अरुंधती रॉय ह्यांचं “जंगलावरील आक्रमण”! : पर्यावरणप्रेमी इकडे लक्ष देतील का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळविणाऱ्या प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय या नेहमीच वादात असतात.

अनेक प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत असते. त्यांनी आजवर भारत विरोधी भूमिका अनेकदा घेतली आहे.
त्यापैकी काश्मिरप्रश्नी भारत विरोध, भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या बाजूने लेखन, नक्षलवादाला प्रोत्साहन देणारे लिखाण, गिलानी व इतर अतिरेक्यांसोबत काश्मिर संदर्भात चर्चा करणे आणि त्यांना पाठींबा देणे ही काही महत्वाची उदाहरणं सांगता येतील.
अरुंधती रॉय पर्यावरणवादी कार्यकर्त्या असून त्यांनी नर्मदा सरोवर प्रकल्पाच्या विरोधात कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यासह या आंदोलनात सहभाग घेत बराच प्रचार केला आहे.
रॉय यांनी त्यांना मिळालेल्या बुकर पारितोषिकांचे पैसे प्रकल्पावरील पुस्तके, नर्मदा बचाव आंदोलन यासाठी दान केले आहेत.
भांडवलशाही, मोठे प्रकल्प, भारताचा अणुप्रकल्प यांना विरोध करणाऱ्या अरुंधती रॉय यांना मात्र पर्यावरणाची खरच ती काळजी आहे का?
कारण मध्यप्रदेशातील पंचमढी येथे त्यांनी “हॉलिडे होम” जंगलातील जागेवर अतिक्रमण करून बांधले आहे.
अरुंधती रॉय यांचे दुसरे पती चित्रपट निर्माते प्रदीप क्रिशन यांच्याशी अरुंधती रॉय यांची भेट १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका साकारली होती.
या दोघांची विचारसरणी एकमेकांशी जुळणारी होती. पुढे या दोघांनी लग्न केले. १९९० मध्ये या जोडप्याने मध्यप्रदेशातील प्रसिद्ध हिल स्टेशन असलेल्या पंचमढी येथे एक “हॉलिडे होम” घेतले होते.
सातपुड्याच्या पर्वतराजीत वसलेल्या, निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या या जागेत या जोडप्याने घर बांधण्याचा निर्णय घेतला. खरंतर ती जागा जंगलातील जागेवर अतिक्रमण करणारी होती.
यातील दांभिकपणा म्हणजे पुढे पंचमढी हे पर्यटनाचे केंद्र झाल्याने तिथे काही हॉटेल्स उभी राहत होती. त्यांना मात्र प्रदीप क्रिशन आणि तथाकथित पर्यावरणवाद्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होतो या नावाखाली विरोध केला.
जर यांना पर्यावरणाची काळजी असेल तर स्वतःसाठी तिथे एक घर असावे असे त्यांना वाटले. यातून पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही का? आणि श्रीमंतांच्या या घरांमुळे तेथील आदिवासी विस्थापित झाले नाहीत का?
एकीकडे स्वतः वन जमिनीवर घर बांधले असताना तिथेच काही हॉटेल्स उभी राहत असताना त्यांना विरोध करणे हा दांभिकपणा होता.
इतके पुरेसे नव्हते म्हणून की काय प्रदीप क्रिशन सरकारच्या या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या समितीवर होते. ज्यात या हॉटेल्स विरोधात आक्षेप सादर केले जाणार होते.
ते त्यांनी ऐकून घेतले आणि पंचमढीचे लास वेगास होते आहे. तेव्हा पर्यावरण वाचवण्यासाठी ही बांधकामे थांबली पाहिजे असे मत नोंदवत आपला अहवाल सादर केला.
–
- धन्यवाद फडणवीस साहेब! पर्यावरण विनाश अगदी धडाक्यात (?) चालवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
- अविश्रांत मेहनत घेऊन ‘मानवनिर्मित जंगल’ उभं करणाऱ्या भारताच्या ‘फॉरेस्ट मॅन’ची कथा
–
मात्र १९९९ मध्ये जंगलातील जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी प्रदीप क्रिशन यांना नोटीस बजावण्यात आली. न्यायालयात ही प्रक्रिया सुरू होऊन बरीच वर्षे चालली.

अखेर २०१० मध्ये न्यायालयाने आपला निकाल दिला. ही जमीन वनक्षेत्राखाली असून बांधकाम अनधिकृत असल्याचे स्पष्ट केले.
पुढे प्रदीप यांनी विभागीय आयुक्तांकडे हे प्रकरण आव्हानासाठी सादर केले. मात्र २०११ मध्ये त्यांचे म्हणणे खोडून काढत प्रदीप क्रिशन यांची याचिका फेटाळण्यात आली होती.
पण एवढे होऊनही हे पर्यावरणवादी काही शांत बसले नाहीत. २००३ मध्ये त्यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणाचा अजूनही अंतिम निकाल लागलेला नाही.
या प्रकरणावर माध्यमांमधील काही पत्रकारांनी प्रदीप क्रिशन आणि अरुंधती रॉय यांची बाजू घेत इथे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जमिनी आहेत, हे प्रकरण केवळ तांत्रिक बाबींवर आधारित आहे.
इतकेच काय या घराच्या बाजूला सुहेल सेठ यांच्या भगिनी वास्तव्यास आहे या प्रकारचे दाखले देत, या प्रकरणात काही गंभीर नसल्याचाच आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
स्वतःच्या कंपूमधील लोकांना सांभाळून घेण्याची वृत्ती माध्यमांमध्ये खोलवर रुजलेली दिसते.
एकीकडे १९९० मध्ये प्रदीप क्रिशन आणि अरुंधती रॉय या जोडप्याने पंचमढी येथील आपले घर बांधून पूर्ण केले. पुढे त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागली जी अनेक वर्षे चालली.
मात्र यादरम्यान या जोडप्याने एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरवले होते. त्यांचा घटस्फोट झाला.
पुढे अरुंधती रॉय यांची गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही कादंबरी जागतिक पातळीवर गाजली. पुढे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम नर्मदा सरोवराला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली.
पण पंचमढी हे प्रकरण त्या साफ विसरुन गेल्या होत्या.

पर्यावरणाविषयी इतके संवेदनशील असलेल्या या लेखिका स्वतःच्या चुका मात्र सपशेल नाकारत होत्या.
हा दांभिकपणा लोकांसमोर आला पाहिजे जेणेकरून या तथाकथित बुद्धीवादी वर्तुळातील लोकांचे सत्य सर्वांसमोर येईल.
–
- नाणारही जाणार? : स्वार्थी आणि स्वकेंद्रित पक्षीय राजकारणामुळे झालेले अपरिमित नुकसान !
- लोक सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा सांस्कृतिक वारसा – देवराई!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.