Site icon InMarathi

इंजिनियरिंगचे प्रोफेसर ते एक अष्टपैलू कलाकार – कादर खान ह्यांचा प्रेरणादायक प्रवास!

kader khan inmarathi

thebetterindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या बॉलिवूड मधले एक अत्यंत उमदा लेखक, पटकथाकार, संवादलेखक, आणि तितकेच उमदा अभिनेते कादर खान ह्यांना कोण ओळखत नाही!

३१ जानेवारी २०१८ म्हणजेच वर्षाच्या शेवटच्या दिवशी ह्या अवलिया कलाकाराने कॅनडा मध्ये अखेरचा श्वास घेतला!

“विजय दीनानाथ चौहान” अशी अमिताभ बच्चन ह्यांची ओळख निर्माण होण्यात कादर खान ह्यांचा मोठा वाट आहे.

कारण संवादफेक अमिताभ बच्चन ह्यांची असली तरीही ,”विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान…” हा अजरामर संवाद कादर खान ह्यांच्याच लेखणीतून जन्माला आला होता.

हे आणि असे अनेक प्रसिद्ध संवाद कादर खान ह्यांनी लिहिले आणि अनेक हिंदी चित्रपटांनी तिकीटबारीवर धुमाकूळ घातला होता.

 

hindustantimes.com

 

अनेक हिंदी चित्रपटांना आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे यशाकडे नेणाऱ्या कादर खान ह्यांचे  ८१ व्या वर्षी कॅनडामधील टोरोंटो शहरातल्या एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.

अनेक दिवस ते प्रोग्रेसिव्ह सुपरन्युक्लिअर पाल्सी या व्याधीशी लढा देत होते.

पण अखेर काळापुढे कोणाचं चालतय, कॉमेडीच्या ह्या बादशहाने रंगमंचावरून एक्झीट घेतली ती कायमचीच!

२२ ऑक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्थानातील काबुल ह्या शहरात कादर खान ह्यांचा जन्म झाला.

त्यांचे वडील अब्दुल रहमान खान हे कंदाहारचे होते तर त्यांची आई इकबाल बेगम ह्या पिश्चिन (बलुचिस्तान, पाकिस्तान) येथील होत्या. कादर खान ह्यांना तीन भाऊ होते.

त्यांनी स्थानिक सरकारी शाळेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले व त्यानंतर इस्माईल युसूफ कॉलेज मधून पुढचे शिक्षण घेतले.

 

youtube.com

 

त्यानंतर भारतातील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स मधून मास्टर्स डिप्लोमा इन इंजिनियरिंगची पदवी मिळवली.

शिक्षण संपल्यानंतर त्यांनी १९७० ते ७५ ह्या काळात भायखळ्यातील एम एच साबू सिद्दीक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सिव्हिल इंजिनीयरींगचे प्रोफेसर म्हणून शिकवले.

कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एका नाटकात त्यांनी काम केले तेव्हा ते नाटक बघायला आलेल्या दिलीप कुमार ह्यांनी कादर खान ह्यांची प्रतिभा बघून त्यांना त्यांच्या पुढच्या चित्रपटात घेतले.

ते थिएटरसाठी नाटके लिहीत असत आणि हे करता करता त्यांना जवानी दिवानी ह्या चित्रपटाची स्क्रीन लिहिण्याची संधी मिळाली. येथेच त्यांचा बॉलिवूड मधील प्रवास सुरु झाला.

 

timesnow.com

 

कादर खान ह्यांनी तीनशे पेक्षाही जास्त चित्रपटांत भूमिका केल्या. आणि अडीचशे पेक्षाही जास्त चित्रपटांचे संवाद लिहिले.

कादर खान ह्यांनी भूमिका केलेला त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९७३ सालचा “दाग: हा चित्रपट होय. ह्यात राजेश खन्ना ह्यांची प्रमुख भूमिका होती तर कादर खान ह्यांनी वकिलाची सहाय्यकी भूमिका साकारली होती.

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, फिरोज खान ह्यांच्या बरोबर अनेक चित्रपट केले.

त्यांची गोविंदा बरोबरची जोडी तर सर्वांच्याच लक्षात आहे. त्यांचे व गोविंदाचे चित्रपट खूप गाजले.

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी वडील, काका, भाऊ, कॉमेडियन अश्या सहाय्यक भूमिका केल्या. काही चित्रपटात त्यांनी खलनायकाचीही भूमिका साकारली.

 

abpmaza.abplive.com

 

हिम्मतवाला, जानी दोस्त, सरफरोश, जस्टीस चौधरी, तोहफा, कैदी ह्यासारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संवादलेखक म्हणून काम केले.

तर स्क्रीनरायटर म्हणून धरम वीर, गंगा जमुना सरस्वती, देश प्रेमी, सुहाग, परवरीश, अमर अकबर ऍंथोनी, कूली ,शराबी, लावारीस, मुकद्दर का सिकंदर, सत्ते पे सत्ता, अग्निपथ , हम ह्यासारख्या अनेक अजरामर चित्रपटांत त्यांनी काम केले.

त्यांना तब्बल ९ वेळा फिल्मफेअरचा बेस्ट कॉमीडियन म्हणून नामांकन मिळाले होते.

तर १९८२ साली फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संवादलेखक म्हणून पुरस्कार मिळाला होता. तर १९९१ सालचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून पुरस्कार त्यांना मिळाला होता.

 

bollywoodmantra.com

 

२०१३ साली त्यांना हिंदी चित्रपटसृष्टितील त्यांच्या मोठ्या योगदानासाठी साहित्य शिरोमणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

कादर खान ह्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे परवरीश, शालिमार, मिस्टर नटवरलाल, सुहाग,बुलंदी, नसीब, याराना, कालिया, कूली , तोहफा, मास्टरजी, खून भारी मांग, चालबाझ, घर हो तो ऐसा, हम, बोल राधा बोल, राजा बाबू, मैं खिलाडी तू अनाडी, कूली नंबर वन ,साजन चले ससुराल, हिरो नंबर वन, जुदाई, दुल्हे राजा हे आहेत.

त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे अमन के फरिश्ते हा होता.

 

postman.com

कादर खान ह्यांच्या पश्चात तीन मुले आहेत. त्यांनी काही काळापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व घेतले होते.

२८ डिसेम्बर रोजी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कॅनडातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. अखेर त्यांनी ३१ डिसेंबर ला अखेरचा श्वास घेतला!

अमिताभ बच्चन ह्यांना भारी भरकम डायलॉग देऊन त्यांना लोकांच्या गळ्यातल्या ताईत बनवणाऱ्या ह्या लेखकाचे शेवटचे दिवस मात्र खूप हलाखीचे होते! काही मुलाखतीत त्यांनी ही नाराजी उघडउघडपणे व्यक्त देखील करून दाखवली!

पण अखेर ह्या बॉलिवूड ने त्यांची हवी तशी दखल घेतली नाही ह्याची खंत अजूनही बऱ्याच जणांच्या मनात आहे! एक अत्यंत उमदा संवादलेखक आपण गमावला आणि ती जागा पुन्हा कुणीच घेऊ शकणार नाही! 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version