Site icon InMarathi

३१ डिसेंबर साजरा करण्याच्या देशोदेशीच्या विचित्र पद्धतींचा तुम्हाला हेवा वाटल्यावाचून राहणार नाही

elephant im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नवीन वर्ष येऊ घातलं आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत.

अनेकांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काही प्लॅन्स बनवले असतील, काही नवीन वर्षांचे रिसोल्युशन्स तयार केले असतील.

एकंदरीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली असणारच आहे. प्रत्येकाची तयारी वेगवेगळ्या स्वरूपाची असेल. प्रत्येकाची नवीन वर्षाच्या स्वागताची पद्धत वेग वेगळ्या प्रकारची असेल.

काही लोक पार्टी करून स्वागत करणार असतील तर काही लोक पूजा करून करणार असतील.

 

TravelTriangle.com

आपल्या प्रमाणे जगभरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक देशात नववर्ष स्वागत करण्याचा वेगवेगळ्या पद्धती आहेत.

काही देशात तर नववर्षाचे अगदी अनोख्या पद्धतीने करण्यात येते, त्या पद्धती व ते देश कोणते याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात..

१) डेन्मार्क

डेन्मार्क ने नववर्ष साजरं करण्याची नवीन कल्पना शोधली आहे. ते नवीन वर्षाच्या आदल्या रात्री प्लेटस फोडून नवीन वर्षाचे स्वागत करतात.

 

एकीकडे जगभरात लोक त्यांचा मित्र आणि परिवारासोबत एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात तर डेन्मार्क मध्ये लोक घरातील नको असलेली भांडी फोडून नवीन वर्षाचे स्वागत करतात.

लोक ही भांडी स्वतः च्या घरासमोर फोडतात नाहीतर आपल्या मित्रांच्या घरासमोर फोडत असतात.

तुमची लोकप्रियता तुमच्या घरासमोर फुटलेल्या भांड्यावरून आणि त्यामुळे येणाऱ्या आवाजावरून कळत असते.

२) चीन

चीन मध्ये नववर्षाचे स्वागत हे प्रचंड जल्लोषात केले जाते. नवं वर्ष हा चीन मध्ये एक मोठा सण असतो.

 

अगदी आपल्याकडच्या दिवाळीच्या धर्तीवर चीनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. इकडे पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.

ह्या पारंपरिक पद्धतीत एक पद्धत आहे “लाल लिफाफ्या”त एकमेकांना पैसे देणे.

बहुतांश वेळी मोठी माणसं लहानग्यांना काही पैसे देतात. याबरोबरच आपल्या प्रमाणे चीन मध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाके उडवण्याची परंपरा आहे.

त्यांची अशी श्रद्धा आहे की प्रकाश आणि आवाजाने दृष्ट आत्मे लांब राहतात व त्यांचा प्रभाव कमी होतो आणि नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात होते.

३) रशिया

रशिया मधील नवीन वर्षाचे स्वागत हे दारूशिवाय अगदीच अशक्य आहे.

 

रशियात दीर्घकाळ असलेल्या कम्युनिस्ट साम्राज्यात नवीन वर्ष अगदी जोमात साजरं करण्याची प्रथा रशियात सुरू झाली.

ह्या प्रथेनुसार लोक एकत्र येऊन नवीन वर्षात आपल्या असलेल्या इच्छा आणि आकांक्षा एका चिट्ठीवर लिहतात आणि नंतर ती चिट्ठी जाळून टाकत तिची राख दारूच्या ग्लास मध्ये टाकतात.

त्यानंतर त्यावर बर्फ टाकून, त्यावर दारू ओततात आणि मित्र परिवारासोबत त्याचा आनंद घेतात. ती इच्छा पूर्ती होते. का ते माहिती नाही पण दारूची पार्टी होऊन त्यांचं कल्चर जपलं जातं.

४) जपान

जपानिज लोकांच्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेगळ्या पद्धती आहेत, वेगळ्या परंपरा आहेत.

 

जपान मध्ये नवीन वर्षाच्या आदल्या रात्रीला ओमीसका म्हटलं जातं. ह्या दिवशी तिथल्या बुद्ध विहारात १०८ वेळा घंटा नाद केला जातो.

१०८ वेळा वाजवण्याचे कारण आहे की जपनीज लोक मानतात की माणसाला १०८ इच्छा असतात, ज्या जीवनातील अनेक व्याधींसाठी कारणीभूत ठरत असतात.

ह्यामुळे हा घंटा नाद ऐकल्याने आतील सर्व वाईट विचार निघुन जातात अशी मान्यता आहे.

टोकियो येथील झोझोजी बौद्ध मंदिर हा घंटा नाद ऐकण्याची सर्वोत्तम जागा मानण्यात येते.

५) थायलंड

थायलंड मध्ये नवीन वर्षी एक वेगळाच आनंद असतो. थायलंड हे जगातील एक प्रसिद्ध पार्टी डेस्टिनेशन आहे. पण तिथे पारंपरिक पद्धतीने देखील नववर्षाचे वेगळ्या अंदाजात स्वागत केले जाते.

 

थाई लोक एकमेकांवर पाणी उडवत नवीन वर्षाचे स्वागत करतात. याला थाई भाषेत “सोंगक्रांन” म्हटले जाते.

नवीन वर्षाच्या आदल्या रात्री तुम्हाला अनेल लोक रस्त्यावर पाण्याचा बादल्या घेऊन फिरताना दिसतात, हे सर्व लोक एकमेकांवर पाणी टाकण्याचा प्रतीक्षेत असतात.

ते एकमेकांवर पाणी टाकत नवीन वर्षाच्या आदल्या रात्री धुलीवंदन साजरी करत असतात.

सोबतच परिवारातील जेष्ठ सदस्यांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करण्याची थायलंड मध्ये प्रथा आहे. त्यामुळे लोक आपल्या आप्तस्वकीयांच्या भेटी यानिमित्ताने घेत असतात.

तसेच ते तेथील मंदिराना भेटी देत आशीर्वाद घेतात. आयुष्यात पॉझिटिव्हीटी टिकून राहावी यासाठी प्रार्थना करतात.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या देशात पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. तुम्ही नवीन वर्षाचा स्वागताची तयारी केली आहे ना?

नसेल तर करा. हे नवीन वर्ष आपल्याला सुखा समाधानाचे जावो!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version