Site icon InMarathi

सरदार स्मारकाची ही अवस्था फक्त नि फक्त सरकारच्या मिसमॅनेजमेंट मुळे झालीये…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देत कणखर बाण्याने प्रत्येक गोष्टीला सामोर जाणारा लोहपुरूष म्हणजे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ होय. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील जगाला त्यांची ओळख आहे.

३१ ऑक्टोंबर १८७५ रोजी जन्मलेल्या सरदार पटेलांनी जन्मभर भारतमातेच्या कल्याणासाठीच आयुष्य वेचत १५ डिसेंबर १९५० रोजी अखेरचा श्वास घेतला.

हे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या देशाला मिळालेली दैवी देणगीच म्हणावी लागेल.

 

india.com

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचा सन्मानार्थ गुजरात मधील सरदार सरोवर प्रकल्पावर उभारण्यात आलेल्या “स्टॅच्यु ऑफ युनिटी”चे नुकतेच लोकार्पण झाले, हा प्रकल्प भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.

ह्या पुतळ्याला जगातील सर्वात उंच पुतळ्याचा मान मिळाला आहे व अनावरण झाल्यापासूनच ह्या पुतळ्याला भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे.

ज्यामुळे शासनाला चांगले उत्पन्न मिळत आहे. एका दिवशी २७००० लोकांनी या सरदार पटेलांच्या स्मारकाला भेट दिल्याची नोंद आहे.

 

 

एकीकडे लोक ह्या भव्य स्मारकाचं कौतुक करतांना थकत नाही आहेत. स्मारकाच्या एकूण भव्यदिव्यतेने लोकांना भुरळ घातली आहे. परंतु ह्या भव्यदिव्य स्मारकाची निगा राखण्यात सरकार कमी पडत आहे असं दिसून आलं आहे.

या स्मारकाला भेट देणाऱ्या एका जागृत पर्यटकाने ह्या संदर्भात ट्विटसची एक थ्रेडचं ट्विटर वर टाकली असून त्यात सरकारचा स्मारक व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

एक महिला मागच्या आठवड्यात ह्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी त्या महिलेला अत्यंत वाईट अनुभव आला.

स्मारकाच्या व्यवस्थापनातील त्रुटी दाखवण्यासाठी त्या महिलेने फोटोग्राफ घेतले, ज्यांना संध्याकाळी ट्विटर वर अपलोड करत, ट्विट्सची थ्रेड तयार केली आणि सरकारच्या स्मारक व्यवस्थापनाचा समाचार घेतला.

 

 

तिच्या ह्या ट्विट्सला लोकांनी जाहीर पाठिंबा दिला व सरदार स्मारकाला भेट देताना त्यांना आलेले वाईट अनुभव शेयर केले.

पहिल्या मुख्य ट्विटमध्ये ह्या महिलेने स्मारकाच्या आवारातील मोकळ्या फ्लोअर वर, जिथून पर्यटक स्मारक न्याहाळतात त्या जागी गर्दी करून बसलेल्या लोकांचे छायाचित्र पोस्ट केले.

व टिप्पणी केली की आपण लोकांना “व्यवहाराचे” धडे देत असतो, पण त्याचे काही परिणाम दिसून येत नाही.

 

 

पुढे केलेल्या एका ट्विटमध्ये ती महिला म्हणाली की ती स्वतः आर्किटेक्चरची विद्यार्थिनी आहे. ती जर नापास झाली तर ह्यात काही वाटा तिच्या शिक्षकांचा देखील असतो.

अगदी त्याचप्रमाणे लोकांच्या ह्या अनिर्बंध वागण्याला आणि बेशिस्तिला प्रशासन पण तितकंच जबाबदार आहे. इतर कोणीही नाही.

 

 

त्या ठिकाणच्या पार्किंगच्या समस्येवर आणि वाहतुकीचा सुविधेवर टीका करतांना ती महिला म्हटली की लोकांना आधीच पार्किंगसाठी त्रास सहन करावा लागतो.

त्यानंतर त्यांना स्मारकापर्यंत नेणाऱ्या बसेसची वाट बघत तब्बल २-३ तास उन्हात ताटकळत थांबावं लागतं.

कारण खाजगी वाहनांना आत प्रवेश नाही आहे. ती म्हणते दहा हजार पर्यटकांच्या पाठीमागे फक्त सोळा बसेस वापरण्यात येतात.

 

 

तिच्या पुढच्या थ्रेडमध्ये महिला म्हणते की प्रसाधनगृहांची अवस्था देखील दयनीय असून ते वापरण्याचा लायकीचे नाहीत.

ती यासाठी सरकारला दोष देताना म्हणते की सर्व गोष्टीसाठी लोकसंख्या वाढीला शासन दोष देऊ शकत नाही.

काही ठिकाणी सरकारची जबाबदारी असते, जी सरकार योग्य प्रकारे पार पाडत नाही.

 

 

तिच्या शेवटच्या ट्विटमध्ये ती महिला म्हणते की जर सरकार ह्या स्मारकांच्या निर्मितीसाठी इतके पैसे खर्च करते आहे तर त्यांनी सार्वजनिक सुविधांची पार्किंगची व्यवस्थेची, वाहनांसाठीच्या मार्गिकांच्या निर्मितीची आणि पदयात्रा करणाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे.

 

 

तर मित्रांनो आपलं यावर काय मत आहे? शासन जर पुतळा निर्मितीसाठी आणि पर्यटनवृद्धीसाठी इतका खर्च करत आहे तर मग लोकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणं ही सरकारची जबाबदारी आहे.

हीच परिस्थिती कायम राहिली तर पर्यटक पुन्हा या स्मारकाला भेट देतील का?

परदेशी पर्यटक जे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी व परकीय चलनवाढीसाठी आवश्यक आहेत, त्यांना हे चित्र पसंत पडेल का? ते पुन्हा भारतभ्रमण करायला येतील का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version