Site icon InMarathi

हे बालपण कुणी आम्हाला परत मिळवून देईल का हो?

games-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

रोजच्या धावपळीत सगळेच मश्गुल आहेत. प्रत्येक दिवशी नव्याने येणाऱ्या टेन्शनपासून ते वॉट्सअपवरच्या जोकपर्यंत कशाचीच कमतरता नाही.

त्यावर कसं रिऍक्ट व्हावं हे तर आम्हाला सराईतपणे जमतं. आफ्टर ऑल वी आर प्रोफेशनल्स!

पण मग हळूच केव्हातरी मनाचा तो कोपरा अलगद उलगडला जातो ज्यात लपलेलं असतं आपलं बालपण! सोशल मीडियावरच्या एखाद्या पोस्टपासून ते अचानक जुना मित्र/ जुनी मैत्रीण समोर उभे राहतात, मग……

मग काय आठवणींचा असा काही पूर येतो की आता सगळं काही सोडून परत बालपण मागावं. पण ते शक्य नाही…. मग उसासे…. अगले दिन वईच पहेले के माफ़िक लाईफ चालू.

 

असंच अगदी असंच चालू आहे अनेकांच्या आयुष्यात. पण तो ‘क्षण’ जो आपल्याला बालपणीच्या आठवणीत घेऊन जातो त्याला कशाची सर नाही, भाऊ!

आताच फेसबुकवर एक पोस्ट पाहिली, बालपणीच्या श्रीमंतीचे फोटो होते त्यात! आणि बरंका ही श्रीमंती काही कोणा एकट्याची मिजास नव्हती. प्रत्येक गडी आपली श्रीमंती आपल्या राज्यात झोकात मिरवी.

काय खेळ खेळायचो आपण, ज्यांत सवंगडी पहिले लागायचे मग बाकी गोष्टींची जुळवाजुळव व्हायची. गोट्या, भोवरा तर असे दगाबाज की विकत घेतले म्हणून ते आपले झाले असा हिशोब त्यांना कधी समजलाच नाही.

 

दप्तरात टीक-टॉक सारखं खेळणं कायमच होतं. सायकल शिकलो ती मोठीच, कोणी कैची म्हणत आणि कोणी लंगडी. आता प्रश्न पडतो सायकल पहिले शिकलो का असले स्टंट.

बर सगळे खेळ असले रांगडेच होते असंही नाही. मूलं-मुली एकत्र खेळायचे, मुलींचे खेळ पण असेच भारी, बरोबर खेळायला मैत्रिणी असल्या की झालं. पैशावाचून कोणाचं अडत होतं?

हळूहळू विटी-दांडूची जागा क्रिकेट घेत होतं, पण त्यातही नियम असे अचाट होते की आम्ही क्रिकेट स्वीकारलं पण ‘व्हर्जन’ मात्र पक्कं देशीच होतं.

 

नकळत आपणही अनेक बदल पचवत होतो. टीव्ही आणि त्यावरचं कार्टून यांनी जीवनात अनेक गोष्टींचा अभाव होता पण आनंद मात्र कुठे कमी नव्हता.

असंच मनात ठसलेलं अजून एक ठिकाण म्हणजे ‘शाळा’.

 

 

आणि फक्त शाळाच नाही तर तिथलं खाऊचं दुकान ते विसरून कसं चालेल. कोणी वर्गमित्र आपल्याला तिथला मेवा द्यायचा आणि मग तो सिलसिला शाळा सुटली तेव्हाच थांबला.

पोंगा, घडीची मिठाई, बोरकुट, शोप गोळी, काला खट्टा आणि लेमन गोळी, छोटी खारी बिस्किटं असा खूप सारा खाऊ थोड्या पैशात मिळायचा, आता खिसा भरला तरी मन रितंच राहत हे मात्र खरं!

शाळेच्या गमतीजमती काही कमी नाहीत. खडूचं काय ते अप्रूप होत. कंपासमध्ये नटराजची पेन्सिल असणं हा तर अलिखित नियमच होता.

 

 

दिवाळीत टिकल्या फोडायला बंदूक होती पण म्हणून ते खेळणं कोणाला हिंसक वाटलं नाही. तेव्हा काहीच पालक सुजाण होते आता सर्वच होऊ पाहताय.

तपशीलात थोडा फार बदल असेल पण प्रत्येकाच्या गोष्टीत हे खेळ सामावलेलेच होते.

शाळेतल्या प्रार्थनेपासून ते मोठ्या आवाजात पाठ केलेल्या कवितेपर्यंत आणि घरच्या अभ्यासापासून ते स्कॉलरशिप परीक्षेपर्यंत सगळं होतंच. पण या सगळ्याचं ओझं कुठे होतं?

जुन्या आठवणी कितीही काढल्या तरी ते दिवस परत यायचे नाहीत. कितीदा तर असंही होत की जुन्या वाटेवर जाऊनही वाट अनोळखी वाटते. तेव्हा स्वतःच अस्तित्वच पुसलं गेल्याची जाणीव होते.

 

swapnarajput.in

आता आपले ते खेळ संपले असं नाही, बाजारात तो खाऊ अजून टिकून आहे. आपण त्यापासून लांब गेलो आहोत.

कधी स्वतःसाठी थोडा वेळ काढलाच तर जाऊन पहा त्या वाटेला. मित्रमैत्रिणी सोबत असलेच पाहिजे ही अट मात्र कायम आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version