' चीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन! – InMarathi

चीनची “संस्कृती रक्षक” दंडेलशाही : ख्रिसमस वर बॅन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जगभर नाताळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. केवळ एका धर्माचा सण म्हणून याकडे न पाहता मोठ्या उत्साहाने जगभरातील विविध धर्माचे लोक यात उत्साहाने भाग घेत असतात.

जगातील महत्त्वाची शहरे नाताळाच्या निमित्ताने सजलेली दिसत आहेत. सगळीकडे रोषणाई आणि नाताळ ची गाणी,संगीत त्याचबरोबर चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल दिसून येत आहे.

एकीकडे नाताळाचा सण उत्साहाने साजरा होत असतांना चीनमध्ये मात्र या सणावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

कमीत कमी चीनमधील चार प्रमुख शहरात स्थानिक प्रशासनाने असे निर्बंध घातल्याचे दिसून आले आहे. मात्र हे प्रकार अजून मोठ्या प्रमाणावर होत असतील, कारण चीन मध्ये इतक्या सहजासहजी सर्व माहिती समोर येत नसते.

 

china-india
thetelegraph.com

धार्मिक बाबतीत होणारी ढवळाढवळ जास्त प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेतच, शिवाय हे शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात  होत आहे. यात योगायोग नाही, तर एका विशिष्ट धोरणाची अंमलबजावणी आहे.

हेबइ प्रांतातील  तसेच बिजिंगच्या दक्षिणेला असणारे लँगफॅंग या शहरात स्थानिक प्रशासनाने सांता, क्रिसमस ट्री आणि विद्युत रोषणाई यावर बंदी घातली आहे.

इतकेच नाही तर सार्वजनिक स्थळ आणि उद्यानं इथे जर काही लोक एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रम घेत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण आणले आहे तसेच ही माहिती वरिष्ठांना देण्यात यावी अशाही सूचना करण्यात आल्या आहे.

एवढ्यावरच हे थांबत नाही, नाताळानिमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवरही स्थानिक प्रशासनाची करडी नजर आहे.

हीच स्थिती हुनान प्रांतातील हेंगयांग या शहराची आहे. पाश्चिमात्य संस्कृती रोखण्यासाठी यापूर्वी देखील असे प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे.

 

church-inmarathi
dailyexpress.com

नाताळानिमित्त बाजारात होर्डिंग, डिस्प्ले लावण्यात येत असतात तेदेखील काढण्यात आले आहेत. मोठे टेडी देखील या तडाख्यातून वाचले नाहीत. त्यांना देखील हटविण्याच्या सूचना प्रशासनाने केले आहे.

यावरून या कारवाईची तीव्रता लक्षात येते.चीनमधील अजून एक शहर नानयांग इथे देखील या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

शांघाई पासून ६०० मैल दूर असणाऱ्या या शहरातील साध्या दुकानांपासून ते बहुमजली शॉपिंग मॉल पर्यंत सर्व ठिकाणी ख्रिसमससाठी लावण्यात आलेले फ्लेक्स आणि इतर सजावट काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

chin-inmarathi
ucanews.com

स्थानिक प्रशासनाची  कारवाई म्हणून याकडे पाहणे म्हणजे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. कारण चीनमध्ये एकपक्षीय राजवट असून कम्युनिस्ट पक्षाचा एकछत्री अंमल आहे.

गेल्या काही वर्षापासून सातत्याने कम्युनिस्ट पक्षाचे एक अंग असणाऱ्या युवा शाखेने  नाताळ सण म्हणजे पाश्चिमात्यांचे चीन वर होणारे सांस्कृतिक आक्रमण आहे, तेव्हा तो साजरा करण्यात येऊ नये, असे आवाहन केले होते.

पश्चिमात्य सण साजरे करण्यापेक्षा आपल्या संस्कृतीतील सणांना महत्त्व देण्यात यावे, यासाठी कार्यक्रम देखील सातत्याने केले जात आहे.

असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला चीन मधील किमान दहा शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी नाताळ सणावरील कार्यक्रम साजरे करण्याबाबत नियंत्रण आल्याचे सांगितले आहे.

 

ban-christmas-inmarathi
youtube.com

याबाबत  स्थानिक प्रशासनाला विचारले असता, त्यांनी यावर समाधान कारक उत्तर दिले नाही. रस्त्याच्या बाजूला असणारे विक्रेते हटवण्याचे काम सुरू आहे कारण कम्युनिस्ट पक्षाद्वारे “नॅशनल सिव्हिलाइज्ड सिटी” ही स्पर्धा घेण्यात  येत आहे.

त्यासाठी शहरात स्वच्छतेचे काम सुरू आहे म्हणून ही कारवाई केली असे उत्तर दिले आहे. जे अर्थातच पटण्यासारखे नाही.

कारण या  कारवाईतून छोटे दुकानदार अस नाही तर मोठमोठाले मॉलही सुटलेले नाहीत. तसेच रोषणाई,सजावट यामुळे रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा येतो, म्हणून अशी कारवाई करण्यात आली होती सांगण्यात आले.

नाताळाच्या एक आठवडा आधीपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाची ही कृती म्हणजे, कम्युनिस्ट पक्षाच्या पाश्चिमात्य प्रभावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, या वारंवार केल्या जाणाऱ्या  प्रचाराला दिलेला प्रतिसाद आहे, असे मानवाधिकार चळवळीच्या कार्यकर्त्यांचे मत आहे.

 

ban-inmarathi
tribune.com

जगाचे उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणारा देश म्हणून चीनची ओळख सर्वत्र आहे. मात्र अलीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन बरोबर व्यापार युद्ध छेडले आहे, तो पदर देखील या प्रकरणाला आहे.

चीन नाताळानिमित्त खरेदी केल्या जातात बहुतांश वस्तूंचे उत्पादन करत असतो आणि जगभर निर्यात करत असतो.

अमेरिकेत रोषणाई आणि इतर असे चार पंचमांश उत्पादन हे चीनमधून आयात केले जाते. मात्र यावेळेस व्यापार युद्धाच्या  पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही आयात रोखली आहे.

ही त्याची देखील प्रतिक्रिया असू शकते असाही एक कयास आहे. अलीकडे चीन चे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांची सत्ता मजबूत  झाल्यामुळे चीनच्या एकलकल्ली कारभारात वाढ झाली असल्याचे देखील निरीक्षण आहे.

कम्युनिस्ट पक्ष हा निधर्मी पक्ष मानला जातो. अलीकडे चीन मध्ये राष्ट्रवादाची पकड घट्ट करण्याचे प्रयत्न होत आहे.

त्यामुळे उघूर प्रांतातील मुस्लिमांविरुद्ध उचललेली पावले असो किंवा नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटना पाहता चीनच्या या धोरणात सातत्य तर दिसून येत आहे आणि त्याची अंमलबजावणीही तितक्यात कठोरतेने पार पाडण्यात येते आहे.

 

china-muslim-inmarathi
fmt.com

यावर पाश्चिमात्य देशात प्रतिक्रिया उमटल्या असून अमेरिका आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे आहेतच पण लोकांमध्येही चीनच्या या कृतीबद्दल नाराजी आहे.

उदार धोरणाबद्दल चीन आज पर्यंत कधीच ओळखला गेला नाही, पण सांस्कृतिक आक्रमण होत असल्याचा नावाखाली चीनची ही उलटी पडणारी पावले आंतरराष्ट्रीय राजकारणाची गुंतागुंत वाढणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?