आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
कर्नाटक चे मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे नेते एच डी कुमारस्वामी यांची एक चित्रफीत समाजमाध्यमांमध्ये चांगलीच व्हायरल झाली आहे. या चित्रफितीत ते
“निर्दयतेने ठार करा, कुठलीही समस्या नाही.”
असे एका व्यक्तीला फोनवरून आदेश देतांना दिसत आहे. सदर चित्रफीत विजापूर (कर्नाटक) येथे ते आले असताना चित्रीत केली गेली आहे.
यावेळी त्यांच्याजवळ सुरक्षारक्षक, कार्यकर्ते आणि पोलिसही दिसत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्र्यांना खुलासा करावा लागला आहे.
जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते होन्नालगिरी प्रकाश यांची हत्या करण्यात आली होती. काही अनोळखी व्यक्तींनी सोमवारी दक्षिण कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील मडुर येथे ते वाहनाने प्रवास करत असताना ही हत्या घडवून आणली.
ही हत्या कोणी केली याचा अजून खुलासा झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर कर्नाटक चे मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी फोनवर एका व्यक्तीला
“तो (प्रकाश) एक चांगला माणूस होता. मला माहित नाही हे कसे व का झाले, पण त्यांना गोळीबार करून निर्दयतेने मारा, त्यात काही समस्या नाही”
असे सांगताना दिसत आहे.
तर सर्वच माध्यमांमध्ये हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदन प्रसिद्ध करत कळलेल्या घटनेची प्रतिक्रिया असून ही भावनात्मक प्रतिक्रिया आहे, तसा कुठलाही आदेश नाही असा खुलासा केला आहे.
या घटनेबद्दल माहिती मिळवताना वापरलेले शब्द घटनेची भावनिक प्रतिक्रिया होती आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला नव्हता, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
होन्नालगिरी प्रकाश या जनता दलाच्या कार्यकर्त्याचा खून झाला आहे. तो पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता होता.
या प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात याप्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत, असे कुमारस्वामी यांनी त्यांच्या कार्यालयाद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.