Site icon InMarathi

फक्त २०,००० रुपयात केलं गेलेलं हे “शानदार” लग्न, सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या “बिग फॅट वेडींग” जमान्यात आपण जेव्हा लग्नाचा विचार करता तेव्हा २०००० हा आकडा कशासाठी निवडाल? साडी? घोडा? वाजंत्री? की पालखी?

आपल्या लग्नाच्या पूर्ण बजेटमध्ये हा आकडा असाच साधारण कुठेतरी “मंडपातील लुडबुड”वालं काम करत असणार आणि जेव्हा यादी पाहुण्यांची बनत असते तेव्हा १०० एक जण तर घरचेच असतात हो..

पुन्हा चुलत-मालत, मावस-मामे, भावकी-पाटीलकी, माननीय, मित्र व ओळखीचे आलेच!! त्यात “२५” हा आकडा तर घरच्यांतच संपेल.

अमक्या काकाला नाही बोलावलं म्हणून त्यांचं खानदान नाराज! तमक्या मावशीला नाही बोलावलं म्हणून वर्षभराचा अबोला.

 

 

लग्नाची उठबस तर वेगळीच, अगदी चहापाण्यापासून ते ढेकर देतील इतकं खाण्यापर्यंत आग्रहच आग्रह.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वरून आहेराचा जामानिमा वेगळाच. वरातीचं तर बोलूच नका ‘नाचणाऱ्या घोड्यांपासून.. नवरदेव नाचवणाऱ्या घोड्यापर्यंत’ तयारी. ते इंग्रजी सैन्यासारखे ड्रेस घातलेले पट्टीचे बँडवाले.

 

 

कपड्यात तर आख्ख दुकान उचलून बस्ता म्हणून आणलेलं असतं. आमच्या तर पत्रिकांमध्ये देखील शेकडो नावं असतात.. २५ जणांत लग्न म्हणजे काय चेष्टा आहे का गड्या.

पण जर ठरवायचंच झालं, तर आपल्याला जमेल का हो २०,००० बजेट ठेवून २५ जणांत लग्न करायला? बघा या जोडप्याला जमलंय!

रिझवान हा एक छायाचित्रकार(फोटोग्राफर) आहे जो पाकिस्तानात राहतो. जेव्हा तो लग्नाच्या पवित्र बंधनात अडकायचा निर्णय घेत होता तेव्हा त्याला हे लग्न एक अतिशय साध्या पद्धतीने करायचं होतं.

यात बाकी लग्नांसारखा धुमधडका, गोंधळ, फटाक्यांची आतिषबाजी, शेहनाई, वरात, गावभरचे पाहुणे, मानपान, महागडे कपडे, सुसज्ज कार्यालय, इत्यादी नव्हते.

तर लग्नात फक्त स्वादिष्ट जेवण, अगदीच जवळचे लोक आणि त्याची नवरी इतकंच होतं. हाच त्यांचा उद्देश होता.

रिझवानच्या घराच्या गच्चीत या समारंभाचे आयोजन केले गेले होते. ज्यात रिझवानच्या वडिलांनी परिकथेत असल्यासारखे अतिशय सुंदर पद्धतीची लायटिंग केली होती.

 

२५ लोकांत समारंभ ज्यात फक्त कुटुंब आणि मित्र सहभागी असून फक्त नवीन होऊ घातलेल्या जोडप्याचा आनंद आणि प्रेम साजरं करण्यासाठी सगळे जमले आहेत.

विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण त्यांचा ‘निकाह’ (लग्न) तर याहूनही साध्या पद्धतीने साजरा झाला. रिझवान म्हणतो,

“मित्रांनो, लग्नाचा हंगाम आहे आणि मी इथे माझ्या लग्नाची गोष्ट सांगू इच्छितो, ज्यावरून तुम्हाला कळू शकेल की ‘अपनी मर्जी कि शादी’ करणं शक्य आहे.

माझ्या पाहुण्यांच्या यादीत फक्त २५ नावे होती ज्यात आमचे पालक आणि मित्रमंडळी होती. घटनास्थळ होतं आमच्या घराची गच्ची.”

हे कसं शक्य आहे….? याचं आश्चर्य वाटत असेल तर.. हो उत्तर असा आहे की “अनावश्यक” गोष्टी टाळल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आमच्याकडे याचे काही तपशील आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे.. “जेवण”!

रिझवान सांगतो की,

“जेवणात ‘चिकन टिक्का, शीख कबाब, पठोरी चणे हलवा आणि स्ट्रॉबेरी होती’. मी माझ्या लग्नाचं कमाल बजेट २०,००० रुपये ठरवलेलं होतं.

 

 

मित्राने त्याचा आचारी दिला, मी त्या पैश्यातून चिकन आणि मसाले आणले व ते बनवायला मदत केली. बायको ने ‘खट्टे आलू’ स्टार्टर म्हणून बनवले.”

तयारी

रिझवान म्हणतो,

“बाबांनी दिव्यांच्या माळा आणून गच्ची सजवली. मी २५ खुर्च्या शेजारच्या निवडणूक समितीच्या कार्यालयातून आणल्या.

मी मिष्टान्न (डेझर्ट) आणायचं विसरलो होतो तर मित्राने स्ट्रॉबेरी आणि आईस्क्रीम आणलं. त्याने जेवणासाठीचे मेज देखील आणले आणि या नादात आणखी २ लोक हळूच सामील झाले.

 

कपडे

“माझ्या बायकोने आणि मी निळ्या रंगाचा सलवार कमीज परिधान केला होतं (आई आणि बहिणीने लग्नाची भेट म्हणून त्याचे पैसे भरले होते) आम्ही जेवलो आणि मध्यरात्रीपर्यंत गप्पा मारत बसलो होतो.

नंतर पूर्ण लग्न ‘मंजी मंच DHA ‘ कडे रवाना झाले आणि बस, खुश! डन!”

या सर्व गोष्टीनंतर रिझवान खुलासा करतो,

“मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, समाधानी राहा, जे तुम्हाला हवंय ते करा, तुम्हाला जितकं झेपू शकतं तितकंच करा पण त्यात मजा करा. आनंद उपभोगा. आनंदी राहा. समारंभ लहान असो किंवा मोठा त्याचा आनंद लुटा. बास.”

क्या बात है यार..! २० हजारात लग्न, आपल्या माणसांचं सानिध्य.. त्यांचे आशीर्वाद, प्रेम, आपुलकी आणि आनंद.. यापेक्षा जास्ती काय पाहिजे अजून माणसाला..?

आज काल आई बाप मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या लग्नासाठीची बचत करू ठेवू पाहतात. एखादा बाप मुलीच्या लग्नापायी कर्ज काढतो, जमीन गहाण ठेवतो. हुंड्यापायी जीव देतो.. या सर्वांची या सुशिक्षित समाजात काय गरज..?

‘रीन काढून सण करण्यात कसला आलाय हो आनंद?’

दीपिका-रणबीर, प्रियांका-निक, विराट-अनुष्का यांनी परीकथेसारखे केलेले लग्न पाहून आता जोडप्यांनी आपली वैवाहिक स्वप्ने अजून उंचावर नेऊन ठेवली आहेत.

 

 

यात अंधाधुंद खर्च करून, गडबड, गोंधळ, अपुरा वेळ यामध्ये तो “क्षण” अनुभवायचं आपण विसरून चाललो आहोत का?

नातेवाईकांच्या हास्याचा आवाज हा डीजेपेक्षा जिथे जास्ती असेल आणि २-२ तास जेवणाच्या पंगतीवरून न उठता तिथेच ठिय्या मारून गप्पा मारत बसने जिथे आहे. तिथे कदाचित खरा समारंभ साजरा होत असावा.

हो! मान्य आहे, हेच सर्व करण्यासाठी तर आपण पैसे खर्च करतो बाकी गोष्टींची व्यवस्था करतो..

पण त्या सगळ्यांच्या पाठी धावताना, आपण २ मिनिटे निवांत काढून कोणाची विचारपूस करू शकू का, की वरातीच्या घोड्यासारखं झापडे लावून फक्त कामामागे धावणे इतकंच होईल हे देखील पाहावे.

शेवटी समारंभ हा एक कौटुंबिक सोहळा आहे ज्यात आपल्यांनी आपल्यांमध्ये सामावून आपल्यांचा आनंद साजरा केला पाहिजे.. येतंय का काही ‘आपल्या’ ध्यानात?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version