Site icon InMarathi

भारतीय रेल्वेचा श्वास असलेल्या किचकट सिग्नलिंग यंत्रणेचं काम असं चालतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लहानपणी ‘झुक झुक अगीनगाडी’ हे गाणं गाताना आणि ऐकताना खूप आनंद वाटत असे. त्या गाडीत बसल्यावर किती मज्जा येईल याची कल्पना करूनच अंगावर रोमांच उमटतं.

अशी ही रेल्वे मोठे झाल्यावर मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

कोणत्याही ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास, पहिल्यांदा रेल्वेचाच विचार मनामध्ये येतो.

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

रेल्वे ही गतिमान प्रवासाचे साधन म्हणून ओळखली जाते. औद्योगिक क्रांतीमध्ये रेल्वेचा प्रमुख वाटा आहे. आताच्या फास्ट जगात आरामदायक तसेच जलद प्रवासाचे साधन म्हणून जवळपास सगळेच लोक रेल्वेला पसंती देतात.

 

dubeat.com

 

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचे आकर्षण वाटते. रेल्वेची सुरुवात वाफेच्या इंजिनापासून झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत रेल्वे मध्ये अनेक बदल व सुधारणा झाल्या आहेत.

रेल्वेतुन प्रवास करताना आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की रेल्वेची यंत्रणा कशी काम करते, दिवसभर होणाऱ्या शंभरहून अधिक फेऱ्या हे रेल्वे कर्मचारी कश्या प्रकारे हाताळतात?

विविध मार्गावरून चालणाऱ्या शेकडो गाड्यांची वाहतूक कश्या प्रकारे केली जाते? एवढी मोठी भारतीय रेल्वे व तिची वाहतूक कशाप्रकारे सांभाळली जाते, नियंत्रित केली जाते?

 

livemint.com

 

तर ह्या प्रश्नाचं उत्तरं आहे “रेल्वेची सिग्नलींग यंत्रणा”, होय. रेल्वे मार्ग वाहतुकीच्या नियंत्रणात सिग्नलिंग व्यवस्थेचा मोठा वाटा असतो. ह्या व्यवस्थेमुळे रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत पणे चालू राहत असते.

ही सिग्नलींग यंत्रणा बऱ्याचदा प्रवासादरम्यान आपण बघत असतो. त्यामुळे ती कशी कार्य करते हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यात असते.

तर ह्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगू की रेल्वे वाहतूक यंत्रणा कशी कार्य करते.

रेल्वे सिग्नलिंगचा इतिहास

पूर्वीचा काळी रेल्वेला सिग्नल नव्हते त्याकाळी स्टेशन मास्तर नाहीतर गार्ड रेल्वेला हिरवा/लाल झेंडा दाखवत पुढील प्रवासासाठी सूचना द्यायच्या.

पण त्याकाळी एका स्टेशन ते दुसऱ्या स्टेशन दरम्यान सिग्नल यंत्रणा कार्यरत नव्हत्या.

त्यामुळे पुढील परिस्थितीची वेळेआधीच रेल्वेला सूचना केली जायची. बऱ्याचदा यामुळे अपघात घडायचा.

 

train.com

 

दोन स्टेशन मधील अंतर रेल्वे बरोबर कापतेय का नाही हे जाणून घेण्यासाठी टाईम लावला जायचा. परंतु जसा काळ पुढे लोटला तस तसा बदल घडत गेला आणि रेल्वेचं आधुनिकीकरण झालं.

मेकॅनिकल सिग्नलिंग यंत्रणा अस्तित्वात आली. ह्या यंत्रणेद्वारे सिग्नल मन एकमेकांशी बेल्स आणि लॅम्पस च्या माध्यमातून सूचनावहन करू लागले.

१९६० सालापासून, ट्रॅफिक सिग्नलचा वापर सिग्नलिंग यंत्रणेत करण्यात येऊ लागला. ह्यातून लाल , पिवळा आणि हिरवा हे सुचनार्थक सिग्नल देऊ लागला.

ते कॉम्प्युटर आणि इतर आधुनिक साधनांच्या माध्यमातून नियंत्रित केले जात असल्याने निदर्शनाला लवकर येत असत.

२१ व्या शतकात आता अजून प्रगती होऊन मॉडर्न टेक्नॉलॉजिचा वापराने सिग्नलिंग यंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागली आहे.

 

 

रेल्वेच्या नव्या डिटेक्शन सिस्टम नुसार सिग्नलिंग यंत्रणेतून रेल्वेची वेगमर्यादा व दोन रेल्वेतील अंतर जपता येते.

आशा नवीन स्वयंचलीत ट्रेन्सचा समावेश देखील करण्यात आला आहे, ज्या वेगमर्यादा वाढल्यावर आपोआप थांबवता येऊ शकतात.

 

clevelandpostgazette.com

रेल्वे सिग्नलिंगची प्रक्रिया

“हायवे कोड” पद्धतीने रेल्वेचा प्रवास कँट्रोल केला जातो. त्यातून दोन रेल्वेत सुरक्षित अंतर ठेवलं जातं. प्रत्येक रेल्वे लाईनच विविध सेक्शन आणि ब्लॉक मध्ये वर्गीकरण करून ट्रेनला तो ब्लॉक क्रॉस करायला विशिष्ट कालावधी दिला जातो.

सिग्नलिंग यंत्रणेमध्ये असलेल्या किटच्या माध्यमातून रेल्वे त्या सेक्शन मध्ये आहे की नाही याचा पत्ता लागतो.

हे किट रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेतील विद्युतीय बलावर कार्यान्वित होतं. त्याचात असलेल्या एक्सेल काउंटर्स मुळे त्याचा व्हील्सचा वेग त्या सेक्शनचा आत मध्ये व बाहेर मोजण सोपं जातं ज्याने रेल्वेच्या वेगाची कल्पना येते.

रेल्वे ट्रॅकच्या शेजारच्या सिग्नलिंग यंत्रणा याने कार्यान्वित होत, सिग्नलचा माध्यमातून रेल्वे मोटरमन पर्यंत वेग मर्यादे संदर्भात आणि थांबण्यासंदर्भातल्या सूचना वेगवेगळ्या रंगाच्या माध्यमातून पोहचवते.

 

indiaclimatedialogue.net

 

अश्याप्रकारे रेल्वे सिग्नलिंगची प्रक्रिया होते. अर्थात ती इतकी सोपी नसते. त्यात डिझास्टर मॅनेजमेंट आणि इतर अनेक विषय असतात, ज्यांची काळजी घ्यावी लागते.

अनेक मेजर्स असतात ज्यांचा अवलंब केला जातो. मोठ्या जंक्शन वर रेल्वे ट्रॅक बदलणे, अशा सर्व ठिकाणी सिग्नलिंग यंत्रणा प्रचंड गुंतागुंतीची असते. त्यासाठी विशेष टीम कार्यरत असते.

पण सध्या पुरता तरी रेल्वे सिग्नलिंग बद्दल इतकी माहिती पुरेशी आहे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version