Site icon InMarathi

तुमच्याकडेही पाळीव प्राणी आहे? मग या गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अनेकांना प्राण्यांची आवड असते. जरा खोडकर, गोंडस पण वेळ आली तर मालकासाठी प्राणांची बाजी लावणारा एखादा तरी प्राणी आपल्याकडे असावा असे सगळ्यांनाच वाटते.

परंतु प्राण्यांची काळजी, सोय, त्यांना द्यावा लागणारा वेळ यामुळे बहुतांशी लोक पाळीव प्राणी घरी ठेवण्याचे टाळतात. असे लोक इतरांच्या प्राण्यांचे, बाहेर नजरेस पडणाऱ्या प्राण्यांचे मात्र भरपूर लाड करतात.

काही हौशी लोक मात्र प्राण्यांसाठी कितीही तडजोडी करायला तयार असतात. वेळात वेळ काढून जमेल तसे ते प्राण्यांची काळजी घेतातच. घरात एखादा पाळलेला प्राणी नसेल तर यांना करमत नाही.

या प्राणी वेड्यांना तर कुत्रा, मांजर असं म्हटलेलं सुद्धा चालत नाही.त्यांच्या लाडो बाचं जे नाव असेल त्याच नावाने हाक मारावी लागते. थोडक्यात हे प्राणी म्हणजे कुटुंबाचा एक भाग झालेले असतात.

आपल्या मुलाला जसं कुणी त्रास दिलेला आवडत नाही तसेच यांनाही कुणी काही म्हटलेलं चालत नाही.

 

BlogCatalog.com

पण कुटुंबातील हे सदस्य पाळणे जेवढे मजेशीर वाटते तेवढीच त्यांची काळजी सुद्धा घ्यावी लागते. त्यातल्या त्यात जर तुम्ही पहिल्यांदाच प्राणी घरात आणत असाल तर तुम्हाला खूप गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. हे जीव मुके असल्याने त्यांना काय हवे काय नको हे ओळखणे अवघड असते. त्यामुळे आपली जबाबदारी अधिकच वाढते.

जर तुमच्याकडेही हे सदस्य असतील किंवा नवीन सदस्य आणण्याचा तुमचा विचार असेल तर पुढील गोष्टींची खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे.

व्यवस्थित माहिती घ्या

 

revistaapolice.com.br

घरात प्राणी आणण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्या. प्रत्येक प्रजातीच्या सवयी, आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुद्धा विविधता असते.

त्यामुळे तुमच्या कुटुंबाशी मिळते जुळते वाटणारेच प्राणी आणा. म्हणजे त्यांना आणि तुम्हालाही जुळवून घ्यायला सोपे होईल.

प्राणी विकत घेणे टाळा

 

natureswaypethealth.com

तुम्ही जर कुत्रा, मांजर असे मोठे प्राणी घरात ठेवण्याच्या विचारात असाल तर ते दुकानातून विकत घेणे टाळा. दुकानदार त्यांची भरपूर किंमत वसूल करणारच. पण तो प्राणी खात्रीलायक असेलच असे नाही.

फायद्यासाठी बरेच व्यावसायिक काही धोकादायक प्रजाती सुद्धा ठेवतात. ज्या कुटुंबात पाळण्यासाठी सुरक्षित नसतात.

त्यापेक्षा अशा प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना संपर्क करा. त्यांच्याकडील प्राणी गरजू आणि कुटुंबाच्या शोधात असतात.

यात त्या संस्थेचा काहीच स्वार्थ नसल्याने त्यांनी तुम्हाला फसवण्याचाही विषय येत नाही. आणि इथून जर प्राणी दत्तक घेतले तर तुम्हालाही त्याला घर दिल्याचे समाधान नक्कीच मिळेल

विश्वासू डॉक्टरची निवड करा

खास प्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्य म्हणजेच व्हेटर्निटी डॉक्टर असतात. हे डॉक्टर निवडताना शक्यतो ओळखीचे किंवा जवळच्या कुणाच्या तरी माहितीतलेच निवडा.

 

indianpariahdog.blogspot.in

कारण तुम्हाला प्राण्यांची भाषा कळत नसल्याने त्याला काहीही झाले की डॉक्टर कडे न्यावे लागणार. डॉक्टर जे सांगतील त्याप्रमाणेच तुम्ही करणार.

पण जर डॉक्टर अनुभवी नसतील आणि त्यांच्या सांगण्यात काही गडबड झाली तर तुमच्या प्राण्याला त्रास होऊ शकतो. प्राणी अतिशय संवेदनशील असतात. छोट्याशा गोष्टीने ही ते दुखावतात. याने त्यांना आणि प्रसंगी तुम्हालाही धोका उत्पन्न होऊ शकतो.

प्राण्यांचे डोस आणि लसीकरण

 

nextdaypets.com

प्राणी जिथून घेताय त्यांना आजवर काय काय उपचार केले आहेत हे विचारून ठेवा. घेतल्यानंतरही डॉक्टरकडे जाऊन यापुढे कधी काय काय डोस देणे गरजेचे आहेत याची माहिती घ्या. सगळ्या डोसेसचे व्यवस्थित वेळापत्रक बनवा.

एकही डोस चुकावणे खूप धोकादायक ठरू शकते. त्यातल्या त्यात प्राणी लहान असेल तर ते लवकर आजारी पडतात.

अन्न आणि खाद्यपदार्थ

 

mypet.com

आपल्याकडील प्रजातीला कोणत्या प्रकारचे अन्न द्यायला हवे हे तुम्हाला माहितीच असायला हवे. शिवाय याबाबत डॉक्टारचाही सल्ला घ्यायला हवा. अन्न खरेदी करताना कमी किंमतीचे असलेले, किंवा कुणीतरी काहीतरी नवीन सांगितले म्हणून घेऊ नका.

सुरक्षितच अन्न घ्या, आणि प्राण्याला काहीतरी आवडले म्हणून कितीही खाऊ देऊ नका. ते ठरलेल्या प्रमाणातच द्या. शिवाय त्यांच्या खाण्याच्या वेळा पाळा. त्यांना वेळेतच जेवण हवे असते.

कन्फर्ट झोन

 

dnaindia.com

जशी घरात तुमची रूम असते तशीच प्रण्यालही त्याची ठराविक जागा असावी. तिथे त्याच्या झोपण्याची आणि खाण्याची ही सोय असावी.

एकदा की सवय लागली की त्यांना त्या जागेवर सुरक्षित वाटते. आणि ज्यावेळी तुम्हाला त्यांचा इतरत्र वावर नको असेल त्यावेळी ते या जागी थांबू शकतात. अशी काही जागा असेल तर प्राण्यांना जास्त सुरक्षित वाटते.

त्यांना फिरायला नेण्याच्या वेळा

 

thebark.com

तुमच्या सोयीनुसार या वेळा ठरवून घ्या. त्यांना नियमित फिरायला न्या. कारण एवढाच काय त्यांचा बाह्य जगाशी संपर्क येतो. या वेळेत ते ताजेतवाने होतात. जर अधिक काळ प्राण्यांना बाहेर नेले नाही तर ते आक्रमक होण्याचीही भीती असते.

प्रशिक्षण कसे द्यावे

हे तुम्ही शिकुनाच घ्यायला हवे. तरच प्राण्यांचा घरातील वावर सुसह्य वाटतो. ते लहान मुलाप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांची भाषा शिकून घ्या.

 

bestfriends.org

त्यांना योग्य सवयी कशा लावायच्या हे ही शिका. जेणेकरून तो प्राणी तुमच्या सूचना समजू शकेल. गरज पडल्यास तुम्हीही योग्य प्रकारे त्याला समजावून सांगू शकत.

सुरक्षित घर

 

india.com

जर प्राणी ठेवत असाल तर लहान बाळ घरात येताना जेवढी तयारी आपण करतो तेवढीच यासाठीही करावी लागते. तुमची नजर चुकवून ते घराबाहेर पडू शकणार नाहीत याची खबरदारी घ्या.

त्या दृष्टीने दरवाजा खिडक्या असाव्यात. कपाट, मोठी भांडी, ड्रॉवर यात त्यांनी जाऊ नये म्हणून ते सतत बंद असतील अशी काळजी घ्या.

खाद्यपदार्थ आणि औषधे

 

happydogfood.com

या गोष्टी कटाक्षाने उंचावर ठेवा किंवा उघड्यावर ठेवूच नका. आपले बरेच अन्नपदार्थ प्राण्यांना हानीकारक असतात. वर पडलेली औषधेही त्यांनी खाल्ली तर धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही अन्नपदार्थ, औषधे, स्वच्छतेची उत्पादने त्यांच्या संपर्कात येऊ देऊ नका.

स्वच्छतसाठी उत्पादने

 

groomingcentredevon.co.uk

ज्याप्रमाणे आपले साबण, शाम्पू, कंगवा ठरलेले असते तसेच प्राण्यांच्या बाबतीतही असावे. त्यांना योग्य ती उत्पादने खरेदी करा. त्यांचा योग्य आणि नियमित वापर करा जेणेकरून त्यांचे आरोग्यही चांगले राहील

या काही कटाक्षाने पाळण्याच्या गोष्टी आहेत. यांचे पालन करून जर तुम्ही प्राणी पाळले तर निश्चितच ते अधिक सोपे आणि आनंददायी बनेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version