' काँग्रेसचा आमदार : ‘मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू’ – InMarathi

काँग्रेसचा आमदार : ‘मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय लोकशाहीचं महत्वपूर्ण अंग म्हणजे निवडणूक. जनता दर पाच वर्षांनी मत देऊन ‘लोकनिर्वाचित’ सेवक ठरवते. ह्या सेवकाने संपूर्ण देशाचा विचार करून, अख्ख्या समाजाची सेवा करावी, हित साधावं अशी अपेक्षा असते. अर्थात, लोकशाहीच्या खेळात, “निवडून” येण्याच्या सर्कशीत गुंतून पडलेले राजकीय दावेदार  ठेवतातच असं नाही.

ह्याच दुर्दैवी वस्तुस्थितीचं धडधडीत उदाहरण नुकतंच पहावयास मिळालं आहे.

राजस्थानमधील बेंगु सीटवरून निवडून आलेल्या राजेंद्र सिंह बिधुरी ह्यांनी टीव्ही नाईन च्या पत्रकाराच्या, ‘पुढे आपली रणनीती काय असेल?’, ह्या प्रश्नाला उत्तर देताना धक्कादायक विधान केलं आहे.

बिधुडी म्हणतात :

रणनीती काय? जिंकून काम करू, विकास करू. ज्यांनी मत दिलं, त्यांचा विकास करू. जिथून मतं मिळाली नाहीत त्या बूथ ना सोडून देऊ. त्यात काये? पुढची ५ वर्ष निवडणूक नाहीये…राहू द्या तसेच!

इतकंच बोलून बिधुडी थांबत नाहीत. ते काँग्रेस कार्यकर्त्यांनासुद्धा दम भरतात! पुढे म्हणतात –

ज्या कार्यकर्त्याने काम केलं त्याची “मदत” करू. ज्यांनी धोखा दिलाय त्यांना इग्नोअर करू!

 

rajendra singh bidhuri inmarathi

 

ह्या ‘मदत करणे’ आणि ‘इग्नोर करणे’ चा अर्थपूर्ण संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला असेलच. पण एका लोकनिर्वाचित आमदाराने “ज्यांनी मत दिलं नाही त्यांचा विकास करणार नाही” असं म्हणणं अत्यंत अशोभनीय आहे. नेहरू-गांधींची लोकशाहीवादी परंपरा असणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षाच्या आमदाराने असं म्हणणं तर अधिकच दुःखद आहे.

वरकरणी असं वाटू शकतं की बोलता बोलता बोलून गेलेलं हे विधान आहे. पण, बिधुडींनी हे असं सहज बोलून दिलेलं नाही. हे ठामपणे सांगता येऊ शकेल, कारण, निवडणुकी आधी प्रचारादरम्यान बिधुडींनी मतदारांनी हीच तंबी दिली होती.

तेव्हा ते स्पष्टपणे म्हणाले होते की :

‘जर मला मत दिलं नाहीत, जर भाजपला मत दिलंत तर मी तुमचं काम करणार नाही. ऐका! जर २५% मत जरी भाजपला पडलं तर मी तुमचं ७५%च काम करेन!’

 

 

बिधुडी साहेब तेवढ्यावरच नं थांबता, आपली “ओळख” सुद्धा पटवून देतात.

“बिधुड़ी संजय गांधी के समय से नेतागिरी कर रहा है। आप लाेग टीवी देखते हो, मैं राहुल गांधी के परिवार से जुड़ा हूं और मुझे राहुल गांधी और सोनिया गांधी ने टिकट दिया है। ये नेता तो मेरे पॉकेट में रहते हैं।

ही अशी मानसिकता असलेले लोक जर सत्तेत येऊन बसणार असतील तर सर्वसमावेशक विकास होणं हे स्वप्नरंजनच ठरेल. गांधींना हवा असलेला ‘सर्वोदय’ ह्या अश्या संकुचित मानसिकतेच्या लोकांकडून कसा घडून येऊ शकेल हा यक्षप्रश्न ह्या निमित्ताने उभा रहातो.

थोडक्यात…परिस्थिती चिंताजनक आहे.

ज्या व्हिडिओमध्ये बिधुडी साहेब वरील “मत नं देणाऱ्या भागांचा विकास करणार नाही” असं म्हणत आहेत – तो व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?