Site icon InMarathi

धडापासून मस्तक वेगळं झाल्यावरही हा कोंबडा तब्बल १८ महिने जिवंत राहिला !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मस्तक धडापासून वेगळं झाल्यावर एखादा कोंबडा जिवंत राहू शकतो का? हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणालं मुर्खासारखे प्रश्न विचारू नका. असं होण शक्यचं नाही. पण जाऊ दे, यावर वाद नको घालूया. ही पुढची घटना वाचा आणि तुम्हीच ठरवा मस्तक धडापासून वेगळं झाल्यावर कोंबडा जिवंत राहू शकतो की नाही…!

स्रोत

१९४५ सालची ही घटना आहे. कोलाराडो मधील फ्रूटो या गावी लॉयल ओलेन्स हे आपली पत्नी क्लारा हिच्यासह आपल्या फार्म हाउसवर कोंबडे-कोंबड्या कापत होते. ४०-५० कोंबडे-कोंबड्या कापल्यानंतर त्यांना एक कोंबडा मस्तकाशिवाय धावताना दिसला.

लॉयल ओलेन्स यांचा नातू ट्रोय वॉटर्स यांनी ही गोष्ट खरी आहे हे स्पष्ट करताना ती कहाणी पूर्ण कथन केली,

आजोबांनी मस्तक नसलेला कोंबडा धावताना पाहिला. त्यांना हा प्रकार अजब वाटला. त्यांनी त्या कोंबड्याला एका बॉक्समध्ये बंद करून ठेवले, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी बॉक्स उघडला, तेव्हा देखील त्यांना तो कोंबडा जिवंत असल्याचे आढळले. ते त्या कोंबड्याला घेऊन बाजारात गेले. तोवर ही घटना संपूर्ण भागात वाऱ्यासारखी पसरली होती. लोकांना या गोष्टीवर विश्वास बसतंच नव्हता. सर्वांनी या मस्तक नसलेल्या जिवंत कोंबड्याला बघायला एकच गर्दी केली. हळूहळू संपूर्ण कोलाराडोममधील प्रसारमाध्यमे ही बातमी जाणून घेण्यासाठी आजोबा लॉयल ओलेन्स यांच्या मागे पडली.

स्रोत

हा मस्तक नसलेला कोंबडा जिवंत कसा राहू शकतो? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ या कोंबड्याला घेऊन युटो विश्वविद्यालयामध्ये घेऊन गेले. या मस्तक नसलेल्या कोंबड्यावर खुद्द टाईम्स मासिकाने देखील विशेष लेख प्रकाशित केला होता. हा लेख लिहिणाऱ्या होप वेड या लेखकाने कोंबड्याला ‘मिरॅकल माईक’ असे नाव दिले होते. जवळपास १८ महिने जिवंत राहिल्यानंतर १९४७ मध्ये ‘मिरॅकल माईक’चा अखेर मूत्यू झाला.

या १८ महिन्यांच्या काळात ‘मिरॅकल माईक’ अन्न कसे खात असेल हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आला असेल. या कोंबड्याला सिरींजच्या माध्यमातून लिक्विड फूड दिले जायचे, तसेच त्याला श्वास घेताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्याचा गळा वेळोवेळी साफ केला जायचा. पण त्याची काळजी घेणारे एक दिवस या गोष्टी करण्यास विसरले आणि दुसऱ्याच दिवशी ‘मिरॅकल माईक’ने अखेरचा श्वास घेतला. त्या गावात त्याच्या स्मरणार्थ एक पुतळाही उभारण्यात आला आहे.

स्रोत

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ‘मिरॅकल माईक’च्या मस्तकाचा ८० टक्के हिस्सा अगदी सुस्थितीत होता. त्यामुळेच तो १८ महिने जिवंत राहू शकला.

अजूनही विश्वास बसत नसेल तर हा व्हिडियो तुम्ही पाहायलाचं हवा !!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version