Site icon InMarathi

२१०० वर्षांपूर्वीची ही ‘ममी’ आजही अगदी सुरक्षित, असं कसं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हॉलीवूडच्या ‘ममी’ या चित्रपटाची सिरीज तुमच्यापैकी अनेकांनी पहिली असेल. त्यात दाखवलेल्या एकाहून एक भयानक ममीज पाहून क्षणभर अंगावर काटा येतो. आपल्याकडे हे ममी प्रकरण बरेचजन भूत प्रेतांच्या श्रेणीमधलं आहे असे मानतात. त्यांच्या मते ममी मध्ये आत्मांचा वगैरे वावर असतो.

जर तुम्हालाही अश्या गोष्टी कोणी सांगितल्या असतील तर त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका, कारण हे सगळं थोतांड आहे. मुळात आपल्याला ममीचा मूळ इतिहास माहिती नाही, म्हणून ही अंधश्रद्धा माजली आहे, बाकी काही नाही.

 

स्रोत

इजिप्त आणि इतर अनेक देशांमध्ये प्राचीन काळी ममी दफन करण्याची परंपरा होती. प्राचीन काळी आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लोक त्या मृत शरीराला रसायने आणि मसाल्यांनी युक्त अश्या शवपेटीमध्ये ठेवायचे.

ही कृती यासाठी केली जायची, कारण या लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता आणि त्यांच्या मते मृत शरीर हे सांभाळून ठेवले जावे, त्यामुळे मेलेला व्यक्ति पुन्हा तेच शरीर धारण करून पुनर्जन्म घेईल. याच एका भावनेने मृत शरीर ममीच्या स्वरुपात चिरकाल टिकून राहावे म्हणून जमिनीत दफन केले जायचे.

एका उत्खननावेळी हे ममी प्रकरण जगासमोर आले आणि उत्खाननात जी ममी संशोधकांना मिळाली ती पाहून त्यांना विश्वासचं बसला नाही कारण ते मृत शरीर अजिबात सडले नव्हते की त्याला वास येत नव्हता. या उत्खननानंतर सुरु झाली ममीची शोधयात्रा !

इजिप्त आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन केले जाऊ लागले आणि त्यावर अभ्यास करून ममी कोणत्या शतकातील असावी याचा अंदाज बांधता येऊ लागला.

आजवर शेकडो ममीज जगभरातील संशोधकांनी शोधून काढल्या आहेत. त्यात अजून एका ममीची भर पडली आहे. या ममीबद्दल विशेष गोष्ट म्हणजे ही ममी तब्बल २१०० वर्षांपूर्वीची आहे.

 

स्रोत

 

ही ममी १९७१ च्या उत्खननात मावंगदुईच्या झांगशा भागात मिळाली होती. संशोधक ही आजवरची सर्वात आगळीवेगळी ममी आहे असे म्हणतात.

२१०० वर्षे एखादे मृत शरीर टिकेल या गोष्टीवर विश्वास बसणे तसे कठीणचं, पण या ममीकडे पाहिल्यावर मात्र या गोष्टीवर विश्वास ठेवावाचं लागतो. २१०० वर्षांनतरही या ममीचे शरीर अगदी सुस्थितीत आहे. ही ममी हान साम्राज्याची महाराणी दाई हीची आहे. सुमारे २१०० वर्षांपूर्वी लिवरच्या आजारामुळे मृत पावलेल्या तिच्या शरीराला ममीच्या रुपात दफन करण्यात आले होते.

तिच्या शरीराची त्वचा खूपच मऊ आहे तसेच हात आणि पाय आजही वळतात हे विशेष ! एवढेचं नाही तर तिच्या शरीराचे सर्व अवयव अगदी जिवंत माणसासारखे सुस्थितीत आहेत.

 

स्रोत

 

या ममीचे Receation पाहिल्यावर तुम्हाला या ममीचा अंदाज येईल.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi


आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version