' सायटिकाच्या असह्य वेदना; उपाय तुमच्याच घरात दडलाय, जाणून घ्या! – InMarathi

सायटिकाच्या असह्य वेदना; उपाय तुमच्याच घरात दडलाय, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शारीरिक दुखणं हे खूप त्रासदायक असतं! मग ती डोकेदुखी असो, सांधेदुखी असो, किंवा पाठदुखी! या अशा दुखण्यावर आपण जालीम असा काहीच उपाय करू शकत नाही!

काही जणांना ही दुखणी आनुवंशिक पणे येतात, तर काहींच्या जीवनशैली किंवा कामाच्या पद्धतीमुळे ही दुखणी मागे लागतात!

आजकाल तर तरुण मुलांना सुद्धा या व्याधींनी ग्रासलेलं आहे, सतत बैठे काम आणि व्यायामाचा आभाव यामुळेच ही गोष्ट वाढीस लागली आहे! काहींना ही दुखणी वयोमानानुसार चालू होतातच!

कमरेच्या आसपास असणाऱ्या सायटीक नस दुखावल्याने कमरेखालील भागात असह्य वेदना होऊ लागतात. यालाच सायटिका असं म्हणतात.

या वेदना काही तास ते काही दिवसांपर्यंत होऊ शकतात. हा आजार शक्यतो वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर सुरु होतो.

सायटिका कशामुळे होतो?

आपल्या शरीरात दोन हाडांच्या मध्ये त्यांना जोडणारा एक नाजूक भाग असतो. शरीराच्या हालचाली करताना या भागाचीही हालचाल होत असते.

जेव्हा आपण वजन उचलतो तेव्हा या नाजूक भागातील नसांवर दाब पडत असतो. अनेक वर्ष ही क्रिया सुरु असते.

 

 

वयानुरूप सततच्या दबावाने आणि हालचालीने या भागात कोरडेपणा येतो. त्यामुळे त्याचे घर्षण होऊ लागते.

या घर्षणाचाच वाईट परिणाम हाडांवर होतो आणि असह्य वेदना होऊ लागतात.

नेहमी कष्टाची कामे करणाऱ्यांना सायटिका होण्याची शक्यता जास्त असते.

ही समस्या शक्यतो कमरेच्या आसपासच्या अशा भागात निर्माण होते ज्याचा संबंध पायाशी असतो. म्हणूनच या आजारात पायात अचानक वेदना सुरु होतात.

या वेदना कमरेपासून सुरु होऊन हळू हळू पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचतात. कधी कधी तर वेदनांची तीव्रता एवढी असते की पाय निर्जीव भासू लागतो.

अशा परिस्थितीत या वेदना थांबवण्यासाठी वेदनाशामक औषधे दिली जातात. बरेचदा त्यांचा फायदा होत नाही एवढ्या जास्त वेदना असतात. मग कधी कधी स्टीरॉइड्स तर कधी कमरेच्या आतपर्यंत औषधे पोहोचवण्यासाठी इंजेक्शन दिले जाते.

या वेदना सहन करणाऱ्या व्यक्तीची त्या थांबवण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते.

 

pain-inmarathi

===

हे ही वाचा – हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास टाळण्यासाठी या ६ टिप्स फॉलो करा!

===

फिजीओथेरपीच्या आधारानेही काही उपचार केले जातात. परंतु हे सगळे उपाय करूनही मूळ समस्येवर तोडगा निघत नाही. यांचा फायदा फक्त वेदना थांबवण्यापुरता तात्पुरत्या स्वरूपाचा असतो.

ज्यांच्या वेदना कुठल्याच उपायाने थांबत नाहीत त्यांना मात्र शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

मात्र या कठीण उपचाराला पर्याय म्हणून आयुर्वेदात एक उपचार उपलब्ध आहे जो अगदी प्राचीन काळापासून आहे. अगदीच साधा आणि घरगुती असलेला हा उपचार सायटिका सोबतच अजून अनेक प्रकारे शरीरास फायदेशीर ठरतो.

हा उपाय म्हणजे लसूण घातलेले दूध.

लसूण आणि ते ही दुधात हे म्हटल्यावर नक्कीच कपाळावर आठ्या आल्या असतील. कारण हा प्रकार काही तितकासा चवदार नसणार याची कल्पना वाचूनच येते.

पण लसूण हे वेदनाशामक आणि जन्तुरोधक असल्याचं तुम्हाला माहितीच असेल. त्याचबरोबर लसूण रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराची वेदना सहन करण्याची शक्ती वाढवते. दूध सुद्धा आरोग्यदायी समजलं जातं.

म्हणूनच दुधामध्ये लसूण घेणे हा सायटिकावरील तत्काळ आणि अत्यंत सोपा उपाय आहे.

 

cancer-garlic-inmarathi

 

शिवाय याचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होण्याचा धोका नाही.

स्टेप टू हेल्थ या आरोग्याशी संबंधित माहिती देणाऱ्या वेबसाईटने या उपायाची योग्य पद्धत व प्रमाण सांगितले आहे.

ते पुढीलप्रमाणे-

  • चार लसणाच्या पाकळ्या
  • २०० मिली दूध
  •  मध

लसणाच्या पाकळ्या आधी व्यवस्थित बारीक करून त्याची पेस्ट करावी. त्यानंतर दूध तापायला ठेवून त्यात ही पेस्ट घालावी. दूध मध्यम आचेवर उकळेपर्यंत तापवावे. नंतर ते गोड व्हावे म्हणून त्यात मध घालावा.

चांगल्या परिणामांसाठी हे दूध रोज २०० मिली प्यावे.

या वेबसाईटवर या दुधाचे अजूनही काही महत्त्वाचे फायदे सांगितले आहेत.

१. आतड्यात होणाऱ्या जंतूंचा नायनाट करण्यासाठी सलग दहा दिवस रिकाम्या पोटी हे दूध प्यायलास आतडे निरोगी होतात.

२. कोरडा कफ असल्यास रात्री असे दूध घेतल्याने तो कमी होतो.

३. दम, श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचे विकार यांवर सुद्धा हे दुध उपयुक्त ठरते.

त्यासाठी जेवढे गरम पिता येईल तेवढे अधिक गरम दूध झोपण्यापूर्वी प्यावे.

४. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे लसणाचे दुध मदत करते.

 

milk featured inmarathi

===

हे ही वाचा – “एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

===

५. बद्धकोष्ठता, मलावरोध व पचनाच्या समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

६. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवून कुठल्याही प्रकारच्या संसर्गास बळी पडण्यापासून आपली लांब ठेवते.

अत्यंत साधा असणारा हा घरगुती उपाय असा विविध प्रकारे आपल्याला मदत करतो.

आरोग्य खूप बिघडल्यानंतर मोठमोठे उपचार करण्यापेक्षा हा उपाय सोप्पाच म्हणता येईल नाही का! म्हणून तुम्हाला सायटिका असो वा नसो पण हे लसूण घातलेले दुध नक्की प्या आणि सुदृढ राहा!

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?