Site icon InMarathi

प्राचीन काळी नाणी सोनं – चांदीचीच का असायची? वाचा रसायनशास्त्रातील कारण!

coins inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की प्राचीन काळापासून चलन म्हणून सोने व चांदीची नाणी वापरात होती.

ह्या नाण्यांचा मुद्रा म्हणून उपयोग होत असे.

राजे – महाराजे सोने चांदीची नाणी चलनात आणत असत. सोने व चांदी हे मौल्यवान धातू आहेत म्हणूनच कदाचित ह्या धातूंपासून नाणी बनवण्यात येत असावीत!

परंतु हे कारण सोडल्यास मुद्रा म्हणून सोने व चांदीची नाणी का वापरण्यात येत असावीत? ह्या संदर्भात अनेक संशोधक व इतिहासकारांनी अभ्यास केला आहे, व काही तर्क मांडले आहेत.

इतिहासात जवळजवळ ३००० वर्षांपासून नाण्यांचा उपयोग सुरु झालेला दिसून येतो. रसायनशास्त्राच्या दृष्टीने बघायचे झाल्यास हा मानवाच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.

लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील केमिस्ट्रीचे प्रोफेसर आंद्रिया ह्यांनी आवर्तसारणी म्हणजेच पिरियॉडिक टेबलच्या आधारावर एक सिद्धांत मांडला आहे.

 

chemistry.com

पिरियॉडिक टेबलचा आपण सर्वांनीच शाळेत असताना विज्ञानाच्या तासाला अभ्यास केलेला आहे.

त्यामुळे सर्वांना माहिती असेलच की आवर्तसारणी ही रासायनिक मूलद्रव्यांना एका तक्त्याच्या रूपात दर्शविण्याची एक पद्धत आहे.

पूर्वी मूलद्रव्यांना कोष्टकस्वरूपात दाखवण्याच्या न्यूलँडची अष्टके किंवा डोबेरायनरची त्रिके अश्या पद्धती होत्या परंतु ह्या पद्धतींद्वारे केलेली मांडणी सर्व्ह मूलद्रव्यांना लागू होत नव्हती.

म्हणूनच रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिव्ह ह्याने १८६९ साली ही आधुनिक पद्धतीची आवर्त सारणी तयार केली.

या सारणीत मूलद्रव्ये त्यांच्या ऍटोमिक नंबरच्या अनुसार चढत्या क्रमाने मांडण्यात आली आहेत. तसेच त्यांचे आवर्त, प्राथमिक समूह, द्वितीयक समूह ह्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे.

सध्याच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ११८ ज्ञात मूलद्रव्ये आहेत.

प्रोफेसर आंद्रिया ह्यांचे असे म्हणणे आहे की जर आपण पिरियॉडिक टेबलच्या शेवटची उजव्या बाजूची मूलद्रव्ये बघितले तर असे लक्षात येते की ह्या सर्व मूलद्रव्यांचे “चकाकणे” हे एक वैशिष्ट्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तसेच ह्या सर्व मूलद्रव्यांना निळ्या रंगाच्या चौकोनात ठेवले आहे.

हे सर्व मूलद्रव्ये स्थिर प्रकारची आहेत. ज्यांना आपण इनर्ट असे म्हणतो. म्हणजेच ह्या मूलद्रव्यांमध्ये सहसा परिवर्तन होत नाही. या मूलद्रव्यांना आपण नोबल गॅसेस असेही म्हणतो.

हीलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टोन, झिनॉन, व रेडॉन हे गॅसेस रिऍक्ट होत नाहीत कारण ह्यांची रासायनिक प्रक्रियेची क्षमता कमी असते हेच ह्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

तसेच ही मूलद्रव्ये रंगहीन व गंधहीन असतात. म्हणूनच ह्यांचा मुद्रा म्हणून उपयोग करणे अशक्य आहे. ह्या मूलद्रव्यांपासून बनवलेली नाणी आपण पाकिटे, पर्स ह्यात ठेवू शकत नाही.

ह्या नाण्यांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेने सुद्धा कठीण असते कारण हे रंगहीन असतात व हे ओळखणे सुद्धा अत्यंत कठीण असते. तसेच ही मूलद्रव्ये हवेच्या संपर्कात आली तर विलुप्त होऊ शकतील.

 

तसेच मर्क्युरी आणि ब्रोमीन ह्या दोन धातूंची नाणी बनवणे सुद्धा शक्य नाही कारण रूम टेम्परेचरला हे दोन्ही धातू द्रव स्वरूपात असतात तसेच हे दोन्ही धातू अत्यंत विषारी आहेत.

आपल्यापैकी ज्यांनी केमिस्ट्रीचा अभ्यास केला असेल त्यांना माहितीच असेल की जे मेटॅलॉइड्स असतात ते एकतर रूम टेम्परेचरला द्रव स्वरूपात असतात किंवा मऊ असतात किंवा विषारी असतात.

म्हणूनच गॅसेस , द्रव स्वरूप असलेली मूलद्रव्ये किंवा विषारी मूलद्रव्ये ह्यांपासून नाणी बनवता येणार नाहीत.

आता राहता राहिले नॉन मेटल्स! हे नॉन मेटल्स पिरियॉडिक टेबलमध्ये गॅस किंवा द्रव स्वरूप मूलद्रव्यांच्या आसपासच ठेवलेली आहेत.

आता ह्या नॉन मेटल्सचे हे वैशिष्ट्य आहे की ह्या नॉन मेटल्सना वितळवणे आणि नंतर नाण्यांचा आकार देणे कठीण असते. तसेच ह्या मूलद्रव्यांना कुठलाही आकार देणे कठीण असते म्हणूनच ह्या मूलद्रव्यांपासून नाणी बनवली गेली नाहीत.

पिरियॉडिक टेबल मध्ये अशीही काही मूलद्रव्ये आहेत ज्यांना नाण्याचा आकार देता येऊ शकतो परंतु ह्या मूलद्रव्यांची रासायनिक प्रतिक्रिया करण्याची क्षमता अत्यंत जास्त असल्याने ही मूलद्रव्ये जर हवेच्या संपर्कात आली तर धोका उद्भवू शकतो.

उदाहरणार्थ लिथियम हे मेटल इतके जास्त प्रतिक्रियाशील आहे की ते हवेच्या संपर्कात आले तर त्वरित रासायनिक प्रक्रिया घडून आग सुद्धा लागू शकते. म्हणूनच ह्या मूलद्रव्यांपासून नाणी तयार करू शकत नाही.

 

origins.net

 

पिरियॉडिक टेबलमध्ये आणखी काही मूलद्रव्ये आहेत जी अल्कलाईन म्हणजेच क्षार तत्वे आहेत.

ही तत्वे कुठेही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. म्हणूनच ह्यापासून जर नाणी बनवली तर कुणीही कितीही प्रमाणात मुद्रा तयार करू शकेल आणि त्यावर अंकुश ठेवता येणार नाही.

राहता राहिली रेडियोऍक्टिव मूलद्रव्ये तर सर्वांनाच माहिती आहेत की ही मूलद्रव्ये अतिशय घातक असतात म्हणूनच ह्यापासून नाणी किंवा मुद्रा तयार करणे अशक्य आहे.

लोखंडापासून नाणी तयार करायची म्हटले तर लोखंड मुबलक प्रमाणात मिळत असल्याने कुणीही नाणी तयार करू शकेल म्हणूनच लोखंडाचाही नाणी बनवण्यासाठी उपयोग करता आला नाही.

आता उरली सोने, प्लॅटिनम, रेडियम प्लेडियम आणि चांदी! ही मूलद्रव्ये दुर्मिळ आहेत म्हणून ह्यांची किंमत सुद्धा जास्त आहे, प्रत्येकाला ही उपलब्ध होऊ शकत नाहीत.

ह्यातील रेडियम आणि प्लेडियम ह्यांचा शोधच मुळात एकोणिसाव्या शतकात लागला त्यामुळे प्राचीन त्यांचा नाणी बनवण्यासाठी उपयोग केला गेला नाही.

प्राचीन काळी सोने व चांदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते म्हणूनच ह्या दोन धातूंचा उपयोग नाणी बनवण्यासाठी झाला.

प्राचीन भारतात इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून नाणी वापरण्याची सुरुवात झाली. त्या काळी सुद्धा नाणी म्हणजे पैसे अशीच धारणा होती.

सुरुवातीला इलेक्ट्रम पासून नाणी तयार केली जात असत. इलेक्ट्रम म्हणजे सोने व चांदी ह्यांचे मिश्रण (अलॉय) होय!

काही नाणी चांदी व तांबे एकत्र करून तयार करत असत. ह्या नाण्यांचा रंग पिवळसर होता. जगात नाणी वापरण्याची सुरुवात प्राचीन भारतीय, चिनी व मध्य पूर्व भागातील लिडियन लोकांनी केली.

 

Historic UK

 

पहिली भारतीय नाणी चिन्हांकित केली गेली होती. ह्या नाण्यांना पुराणाज, करशपानाज आणि पानाज असे संबोधले जात असे.

ह्या नाण्यांची निर्मिती इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील गांधार, कुंतल, कुरु,पांचाल, शक्य, सुरसेना आणि सौराष्ट्र ह्या महाजनपदांनी केली होती.

पूर्वी धातूंची संयुगे वेगळी करण्याची प्रक्रिया प्राचीन लोकांना ज्ञात नव्हती तरी त्या लोकांना सोने व चांदी ह्यांना वेगळे करण्यात यश मिळाले होते.

प्राचीन काळी जी सोन्याची नाणी तयार करण्यात आली होती त्यावर वातावरणाचा काहीही परिणाम झाला नाही असे संशोधनात दिसून आले.

अनेक शतकांपासून Cu , Ni , Zn ,Al ,Fe , Sn आणि Pb ह्या धातूंचा नाणी बनवण्यासाठी आधारभूत धातू म्हणून उपयोग होत आला आहे. ब्रिटिशांच्या काळात सोने व तांबे ह्यांचे मिश्रण करण्यात येत असे.

प्लॅटिनम मात्र अतिशयच दुर्मिळ असल्याने त्याचा नाणी बनवण्यासाठी फारसा उपयोग झाला नाही.

कार्बन, सल्फर व फॉस्फरस जर धातूमध्ये थोड्याही प्रमाणात असले तरी नाणी तुटू शकतात म्हणूनच आता आधुनिक पद्धतीने नाणी तयार करताना धातू शुद्ध प्रमाणात असणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रोप्लेटेड लोखंड आणि इस्पातपासून बनवलेली नाणी अनेक देशांत चलनात आली. कारण ही नाणी बनवण्यासाठी कमी खर्च होतो. १९९२ पासून ब्रिटिश कांस्य नाणी कॉपर प्लेटेड स्टील पासून बनवण्यात आली.

youtube.com

 

ह्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की सोने व चांदीची नाणी प्राचीन काळापासून चलनात होती परंतु त्या काळी इतर धातूंपासून नाणी तयार करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते.

तसेच सोने व चांदी सहज उपलब्ध होते आणि ह्यापासून तयार केलेली नाणी खराब होत नाहीत म्हणूनच ह्या धातूंचा नाणी तयार करण्यासाठी उपयोग होऊ लागला.

त्यानंतर तंत्रज्ञानात अनेक प्रगती झाली व रसायनशास्त्रात सुद्धा अनेक शोध लागले, अनेक धातूंची संयुगे करणे सोपे झाले.

म्हणूनच आता आपण इतर धातूंपासून बनवलेले चलन वापरतो. पूर्वी सोने व चांदी मौल्यवान म्हणून त्यांचा चलनासाठी उपयोग केला जात असला तरी त्यामागचे शास्त्रीय कारण काय असू शकेल हे आपण आज बघितले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version